Pradhanmantri Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder Connections 2023: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२३ आता मिळणार फ्री गैस कनेक्शन आणि रिफिल ला सबसिडी

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder : उज्ज्वला योजना २.0 या योजने अंतर्गत ७५ लाख महिलांना नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे. पुढील तीन वर्षात म्हणजेच २०२३-२०२४ ते २०२५-२०२६ या वर्षात ही जोडणी देण्यात येणार आहे. अशा प्रकारे देशातील PM उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १0.३५ कोटी होणार आहे.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder उज्ज्वला योजना

Ujjwala Yojana Free Gas Cylinder : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना १ मे २०१६ ला सुरु करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मार्च २०२० पर्यंत ८ करोड LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. उज्ज्वला योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आली होती. ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी पारंपारिक इंधनाचा स्वयंपाकासाठी वापर केला जातो. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे हा हेतू नजरेसमोर ठेवून “पेट्रोलियम आणि प्राकृतिक गैस मंत्रालय” ने उज्ज्वला योजना सुरु केली होती.

Ujjwala Yojana Free Gas Cylinder (उज्ज्वला योजना) मुख्य उद्देश

 • महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे.
 • पारंपारिक इंधनाचा वापर केल्यावर जो धूर निघतो त्याने होणारे प्रदूषण टाळणे.
 • स्वयंपाक घरातून निर्माण होणाऱ्या धुराच्या परिणामामुळे होणारे मृत्यूच प्रमाण कमी करणे.
 • महिलांसोबतच लहान मुलांच्या ही आरोग्यावर परिणाम होत होते ते ही कमी करणे.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder उज्ज्वला योजना २.0

केंद्र सरकारने नुकतीच उज्ज्वला योजना २.0 ची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत ७५ लाख महिलांना फ्री गैस कनेक्शन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने १६५० कोटी रुपयांचा फंड मंजूर केला आहे. या योजनेवर होणारा पूर्ण खर्च सरकार उचलणार आहे. या योजनेची घोषणा करण्याअगोदर राखीपौर्णिमा आणि ओणम च्या शुभमुहूर्तावर LPG सिलिंडर स्वस्तात देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार सर्वसामान्य ग्राहकांसाठी सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त होणार आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना २०० रुपयांव्यतिरिक्त अजून २०० रुपयांनी म्हणजे एकूण ४०० रुपयांनी सिलिंडर स्वस्त होणार.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder कोणाला मिळणार लाभ ?

उज्ज्वला योजना ही महिलांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ फक्त BPL कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. यासोबतच कुटुंबाचे उत्त्पन्न २७,०००/- पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder पात्रता

 • महिला असणे गरजेचे.
 • अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी १८ वर्षे असायला हवे.
 • अर्ज करणाऱ्या महिला BPL कुटुंबातील असणे गरजेचे.
 • अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावावर सिलिंडर नसायला हवा.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder कागदपत्रे

 1. आधार कार्ड
 2. BPL कार्ड
 3. रेशन कार्ड
 4. बँक पासबुक
 5. वयाचा दाखला
 6. फोटो
 7. BPL यादीत नाव असलेले प्रिंट
 8. स्व-घोषणा प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याच्या सहीनिशी

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder अर्ज कुठे करावा?

 1. Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder अर्ज करण्यासाठी https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html या संकेतस्थळाला भेट द्या.
 2. तिथे Click Here वर क्लीक करावे.
 3. या नंतर तुम्हाला ज्या कंपनीचा गैस सिलिंडर हव असेल त्याची निवड करावी.(Indane, Bharatgas, HP Gas)
 4. यानंतर open झालेला फॉर्म भरून द्यावा.
 5. अर्ज हा महिलेच्या नावे करणे गरजेचे आहे.
 6. महिलेच वय हे १८ वर्षे असणे गरजेचे आहे.
 7. महिलेकडे BPL कार्ड असणे गरजेचे आहे.

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder अर्ज कोण करू शकते?

 • महिला अर्ज करू शकते अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीतकमी १८ वर्षे असावे, ती गरीब कुटुंबातील असावी तसेच घरी गैस कनेक्शन नसावे.
 • त्या महिलेच नाव हे २०११ च्या आर्थिक जणगणना यादीमध्ये असावे.
 • जर SC/ST महिला पुढील योजनांची लाभार्थी असेल तर त्या संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जमा करावेत. योजना – प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, भटकी जमात, विशेष मागासवर्गीय, चहा मळे कामगार किंवा माजी चहा मले कामगार, नदीच्या पाणलोट (बेट) क्षेत्रात राहणारे
 • जर वरील दोन प्रकारांमध्ये महिलेचा समावेश होत नसेल तर, तर आपला दावा करण्यासाठी महिला १४ मुद्द्यांचे स्व-घोषणापत्र ज्यामध्ये ते कुटुंब गरीब कुटुंबामध्ये मोडते याची पुष्टी करण्यात येईल (दिलेल्या विहित नमुन्यामध्ये)

Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder १६०० रुपयांची आर्थिक मदत

सरकार Ujjwala Yojana 2.0 Free Gas Cylinder योजनेत प्रत्येक पात्र कुटुंबाला गैस खरेदी करण्यासाठी १६०० आर्थिक सहाय्य देते. तसेच गैस शेगडी आणि पहिल्यांदा सिलिंडर भरण्यासाठी येणारा खर्च करण्यासाठी हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महत्वाच्या लिंक्स

 1. Official Website : Click Here
 2. To know more: Click Here

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

उज्ज्वला २.० अंतर्गत पात्र लाभार्थी कोण आहेत ?

 • एसईसीसी सूची २०११ नुसार पात्र
 • जर आपण अनुसूचित जाती/जमाती, प्रधान मंत्री आवास योजना(पीएमएवाय) लाभार्थी असाल, अंत्योदय अन्न योजना (एएवाय), भटकी जमात, विशेष मागासवर्गीय (एमबीसी), चहा मळे कामगार किंवा माजी चहा मले कामगार, नदीच्या पाणलोट (बेट) क्षेत्रात राहणारे (लाभार्थींनी पुष्टी करण्यासाठी योग्य ते दस्तावेज सादर करावेत) असला तर
 • जर वरील दोन प्रकारांमध्ये महिलेचा समावेश होत नसेल तर, तर आपला दावा करण्यासाठी महिला १४ मुद्द्यांचे स्व-घोषणापत्र ज्यामध्ये ते कुटुंब गरीब कुटुंबामध्ये मोडते याची पुष्टी करण्यात येईल (दिलेल्या विहित नमुन्यामध्ये)

उज्ज्वला २.० मध्ये नोदणी करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • प्रमाणित नमुन्यामध्ये अर्जदाराचा फोटो आणि सही असलेले केवायसी.
 • पीओआय (ओळखपत्र दाखला)
 • पत्त्याचा दाखला
 • अर्जदाराचे आधारकार्ड प्रत,
 • शिधापत्रिकेत समावेश असलेल्या कुटुंबातील सर्व प्रौढ सदस्यांचे आधार कार्ड किंवा त्यासोबत असलेले समकक्ष असलेले दस्तऐवज.
 • अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील
 • रेशन कार्ड किंवा राज्य सरकारने जारी केलेले इतर कोणतेही कौटुंबिक दस्तऐवज. /जिल्हा प्रशासन (जसे की राजस्थानमधील भामाशाह कार्ड आणि मध्यप्रदेशातील समग्रा आयडी, उत्तर प्रदेशचे परिवार रजिस्टर, हरियाणातील परिवार पेहचान पत्र, आंध्र प्रदेशचे तांदूळ कार्ड किंवा नंतर जोडले जाणारे इतर कोणतेही राज्य विशिष्ट कार्ड) ओळखल्या गेलेल्या कुटुंबाची माहिती देणारे ज्यामध्ये तिचे नाव दिसते. राज्यांमध्ये, जेथे राज्य सरकारच्या पोर्टलने कौटुंबिक तपशील अद्यतनित केले आहेत, स्व या पोर्टलवरील प्रिंटआउटची स्वाक्षरी केलेली प्रत लाभार्थी शिधापत्रिकेच्या बदल्यात देखील सादर करू शकतो.
 • स्थलांतरीत झालेल्या अर्जदाराच्या प्रकारात परिशिष्ट-१ नुसार कौटुंबिक सदस्य पुष्टी करण्यासाठी अर्जदाराचे घोषणापत्र.
 • अतिरिक्त दस्तऐवज, जर कनेक्शन खालीलपैकी कोणत्याही एका योजनेंतर्गत घेतले असेल तर (उदाहरणार्थ अनुसूचित जाती/जमाती, प्रधान मंत्री आवास योजना(पीएमएवाय) (ग्रामीण), अंत्योदय अन्न योजना (एएवाय), भटकी जमात, विशेष मागासवर्गीय (एमबीसी), चहा मळे कामगार किंवा माजी चहा मले कामगार, नदीच्या पाणलोट (बेट) क्षेत्रात राहणारे (लाभार्थींनी पुष्टी करण्यासाठी योग्य ते दस्तऐवज सादर करावेत).
 • अर्जदाराच्या स्वाक्षरीसह १४ मुद्द्यांचे विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र ज्यामध्ये ते कुटुंब गरीब कुटुंबामध्ये मोडते याची पुष्टी करण्यात येईल.

उज्ज्वला २.० योजनेंतर्गत अर्ज कोणत्या पद्धतीने करता येऊ शकतो?

अर्जदार ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने आपले आवेदन करू शकतो.

 • ऑनलाइन- ग्राहक नोंदणीकरण ऑनलाइन आवेदन देऊन करू शकतो, किंवा अर्जदार महिला आपल्या नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाइन आवेदनसाठी संपर्क साधू शकतात.
 • ऑफलाइन- ग्राहक थेट वितरककाकडे जाऊन अर्जाद्वारे नोंदणी करू शकतात.

गरीब कुटुंबामध्ये जर महिला प्रौढ सदस्य नसेल तर कनेक्शन दिले जाते का?

नाही. पीएमयुवाय कनेक्शन हे फक्त गरीब कुटुंबातील महिला सदस्यांच्या नावे जारी करता येते.

ग्राहकांना LPG आणि पहिले रिफील निशुल्क मिळेल का?

होय, उज्ज्वला-२.० अंतर्गत, ओएमसी एलपीजी स्टोव्ह आणि पहिले रिफिल ग्राहकांना निशुल्क प्रदान करे. तथापि, उज्ज्वला-२.० अंतर्गत ग्राहकांना एलपीजी कनेक्शन साठी कोणतीही रक्कम अदा करण्याची गरज नाही.

अर्जदाराने कोणत्या प्रकारची शिधापत्रिका सदर करणे आवश्यक आहे?

शिधापत्रिका हा लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून घेण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका उदा. एपील किंवा बीपीएल चा वापर करू शकतो.

उज्ज्वला २.० अंतर्गत गरीब कुटुंब निर्धारण करण्याचे मापदंड कोणते आहेत?

उज्ज्वला-२.० अंतर्गत अर्जदाराने सादर केलेले १४ मुद्द्यांचे स्वघोषणापत्र हा या योजनेसाठी पात्र होण्यासाठी मुख्य मापदंड आहे. तथापि, ते सर्व अर्जदारांसाठी अनिवार्य आहे.

उज्ज्वला २.० अंतर्गत किती रुपयाची आर्थिक मदत मिळते?

सरकार उज्ज्वला योजनेत प्रत्येक पात्र कुटुंबाला गैस खरेदी करण्यासाठी १६०० आर्थिक सहाय्य देते. तसेच गैस शेगडी आणि पहिल्यांदा सिलिंडर भरण्यासाठी येणारा खर्च करण्यासाठी हप्ता ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उज्वला २.० योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची वेबसाईट कोणती आहे?

https://www.pmuy.gov.in/ujjwala2.html या वेबसाईट वर अर्ज करू शकता.

उज्ज्वला २.० योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठीची पात्रता काय आहे?

महिला असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय कमीत कमी १८ वर्षे असायला हवे. अर्ज करणाऱ्या महिला BPL कुटुंबातील असणे गरजेचे. अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील दुसऱ्या कोणाच्या नावावर सिलिंडर नसायला हवा.

Leave a Reply