तलाठी भरती २०२३ वेळापत्रक जाहीर, परीक्षा होणार ३ टप्प्यामध्ये : १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर परीक्षा कालावधी

तलाठी भरती २०२३

तलाठी भरती वेळापत्रक २०२३ || तलाठी परीक्षा वेळापत्रक || तलाठी भरती time table || तलाठी भरती २०२३ वेळापत्रक ||

Talathi Bharti 2023 || Talathi Exam Time Table || Talathi Bharati 2023 Timetable

तलाठी भरती २०२३ परीक्षा (गट-क) या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा भूमी अभीलेख विभागाने जाहीर केले आहे.

Talathi Recruitment Exam 2023 या परीक्षेसाठी राज्यभरातून ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार ४४६६ पदांसाठी बसणार आहेत. परीक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र असेल असे सांगण्यात आले आहे. तलाठी भरती परीक्षा हि तीन टप्प्यात होणार आहे.

तलाठी भरती परीक्षा टप्पे:

तलाठी भरती २०२३ या परीक्षेसाठी ११ लाख दहा हजार ५३ अर्ज आल्या कारणाने परीक्षा हि ३ टप्प्यांमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते टप्पे खालील प्रमाणे असतील.

  • पहिला टप्पा: १७,१८,१९,२०,२१,२२ ऑगस्ट
  • दुसरा टप्पा: २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
  • तिसरा टप्पा: ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

२३, २४, २५ ऑगस्ट आणि २, ३, ७, ९, ११, १२, १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाही.

तलाठी भरती परीक्षा सत्रे :

तलाठी भरती परीक्षा हि तीन टप्प्यांमध्ये ३ सत्रा मध्ये होणार आहे. ते सत्रे खाली दिलेले आहेत.

  • पहिले सत्र: सकाळी ९ ते ११
  • दुसरे सत्र: दुपारी १२:३० ते २:३०
  • तिसरे सत्र : सायंकाळी ४:३० ते ६:३०

तलाठी भरती परीक्षा प्रवेशपत्रक :

तलाठी भरती परीक्षेचे गाव अगोदर समजणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्र मात्र ३ दिवस अगोदर प्रवेशपत्रिकेवर दिसणार आहे.

तलाठी भरती परीक्षे बद्दल इतर माहिती:

तलाठी भरती २०२३ हि परीक्षा TCS कडून घेण्यात येणार आहे. परीक्षा हि एकूण २०० गुणांची असेल आणि परीक्षा हि online घेण्यात येणार आहे. गुणवत्ता यातीत समावेश होण्यासाठी किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.

Important links:

Posts You May Like To Read:

Leave a Reply