Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : नमस्कार मित्र आणि मैत्रिणो, आपल्याला माहितच आहे की केंद्र तसेच महाराष्ट्र सरकार हे नेहमी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. आज अपाण अश्याच एका योजनेची इथे माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना योजना (Sukanya Samriddhi Yojana) या योजनेमध्ये काय लाभ मिळेल? पात्रता काय आहे? अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा? कोणती कागदपत्रे लागतील? याची सर्व माहिती आज आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख अगदी काळजीपूर्वक वाचावा.

Sukanya Samriddhi Yojana काय आहे?

Sukanya Samriddhi Yojana ही योजनाना “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत सुरु करण्यात आलेली योजना आहे. Sukanya Samriddhi Yojana केंद्र सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी मुलींसाठी सुरु केलेली योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी निधी तयार करण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेमध्ये मुलीच्या नावे बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून तिच्या नावे पालक ठेव ठेवू शकतात आणि या ठेवीवर बँक किंवा पोस्ट ऑफिस ठरवल्याप्रमाणे व्याज ही देणार आहे.

Sukanya Samriddhi Yojana उद्देश

Sukanya Samriddhi Yojana मुलींसाठी सुरू करण्यात आली. पालकांनी मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ठेवीची तरतूद करावी या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. यामध्ये पालक कमीत कमी २५० आणि जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये प्रतिवर्ष भरू शकतात.

Sukanya Samriddhi Yojana फायदे

 • सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षाखालील मुलींसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे.
 • या योजनेसाठी कमीत कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
 • या योजनेमध्ये किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
 • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षाचा आहे.
 • मॅच्युरिटी नंतर खाते बंद झाल्यास मुदतीनंतर ही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
 • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम पालक काढू शकतात.
 • खाते चालू केले की पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.

Sukanya Samriddhi Yojana पात्रता

 • Sukanya Samriddhi Yojana या योजनेसाठी पात्र होण्याकरिता मुलीचे वय १० वर्षापेक्षा कमी असावे.
 • मुलीचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते असावे.
 • ही योजना कुटुंबातील दोन मुलींसाठी लागू आहे. परंतु पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या किंवा जर पहिल्या प्रसूतीच्या वेळी तीळ्या मुली झाल्या तर तिन्ही मुलींना ही योजना लागू होते.

Sukanya Samrudhi Yojana Post Office/Bank अर्ज कसा करावा?

सुकन्या समृद्धी योजनेसाठी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी या योजनेमध्ये ज्या बँका सहभागी आहेत किंवा पोस्ट ऑफिस ला मुलीच्या पालकांना भेट द्यावी लागेल.

 • ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे त्या ठिकाणी भेट द्यावी लागेल.
 • तिथून सुकन्या समृद्धी योजनेसाठीचा अर्ज घेऊन तो अर्ज काळजीपूर्वक भरुन सोबत त्या अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
 • खाते उघडताना तुम्ही कमीत कमी २५० तर जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रक्कम भरू शकता.
 • अर्ज आणि पैसे जमा केल्यानंतर मुलीच्या नावे बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते सुरु होईल.
 • तुम्हाला त्या खात्याचे एक पासबुक ही दिले जाईल.

Sukanya Samrudhi Yojana कागदपत्रे

 • मुलीचं जन्माचा दाखला
 • पालकांचे आधारकार्ड/ पॅनकार्ड
 • रेशनकार्ड/लाइटबिल(पत्त्याचा पुरावा)
 • जर जुळ्या किंवा तीळ्या मुलींचा जन्म झालं असेल टी वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकांचे प्रतिज्ञापत्र

Sukanya Samrudhi Yojana व्याजदर

Sukanya Samrudhi Yojana या योजनेअंतर्गत तुम्ही जी रक्कम भरणार आहात त्या रकमेवर तुम्हाला व्याज दिला जाणार आहे. हे व्याजदर कमी-जास्त होत असते. हे व्याजदर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. २०२३-२०२४ या वर्षासाठी या योजनेसाठी ८% व्याजदर ठरविण्यात आले आहे. व्याजदर १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

 • सुकन्या समृद्धी योजना फॉर्म : Click Here
 • सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस फॉर्म : Click Here

Posts You May Like

 • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana : Click Here
 • Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana : Click Here

Leave a Reply