Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, वृद्धापकाळात मिळणार 1500/- दरमहा

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana : नमस्कार मित्र आणि मैत्रिणो, आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र सरकार हे नेहमी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. मग त्यामधे सर्व योजनांचा समावेश होतो जसे की शाळकरी मुले/मुली असतील, तरुणवर्ग असेल, वृद्ध असतील या सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना सरकारने राबवल्या आहेत. आज अपाण अश्याच एका योजनेची इथे माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana) या योजनेमध्ये काय लाभ मिळेल? पात्रता काय आहे? अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा? कोणती कागदपत्रे लागतील? याची सर्व माहिती आज आपण आजच्या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख अगदी काळजीपूर्वक वाचावा.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana म्हणजे काय?

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana महाराष्ट्र शासनाने ६५ वर्ष व ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या वयस्कर स्त्री व पुरुषांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन वयस्कर स्त्री आणि पुरुषांना दरमहा आर्थिक मदत करणार आहे जेणेकरुन वृद्ध व्यक्ती आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनतील.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana ही २ गटात विभागण्यात आलेली आहे:

 • गट अ : या गटामध्ये दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नसलेल्या वयस्कर स्त्री आणि पुरुषांचा समावेश होतो. तसेच या गटातील समावेश होणाऱ्या व्यक्तींचे किंवा त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- च्या वर नसावे. या गटातील व्यक्तींना दरमहा ६००/- रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
 • गट ब : या गटामध्ये दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड असलेल्या वयस्कर स्त्री आणि पुरुषांचा समावेश होतो. या गटातील व्यक्तींना राज्य सरकारकडून ४००/- आणि केंद्र सरकारकडून २००/- रुपये दरमहा आर्थिक मदत मिळते.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana उद्दिष्ट

 • राज्यातील सर्व वृद्धांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविणे.
 • वृद्धांना वृद्धापकाळात कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
 • वृद्धांचा आर्थिक विकास घडवून आणणे.
 • वृद्धांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana पात्रता आणि लाभ

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana या योजनेसाठी अर्जदाराचे वय ६५ व ६५ वर्षापेक्षा जास्त असायला हवे.

या योजनेअंतर्गत खालील प्रमाणे लाभ मिळणार आहेत:

 • गट अ : या गटामध्ये दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड नसलेल्या वयस्कर स्त्री आणि पुरुषांचा समावेश होतो. तसेच या गटातील समावेश होणाऱ्या व्यक्तींचे किंवा त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- च्या वर नसावे. या गटातील व्यक्तींना दरमहा ६००/- रुपये आर्थिक मदत देण्यात येते.
 • गट ब : या गटामध्ये दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड असलेल्या वयस्कर स्त्री आणि पुरुषांचा समावेश होतो. या गटातील व्यक्तींना राज्य सरकारकडून ४००/- आणि केंद्र सरकारकडून २००/- रुपये दरमहा आर्थिक मदत मिळते.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana अटी

 • अर्जदार महाराष्ट्राचा स्थायिक असावा.
 • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- पेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदाराचे वय ६५ व ६५ वर्षापेक्षा जास्त असावे.
 • अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
 • अर्जदाराकडे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड असावे.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana कागदपत्रे

 • आधारकार्ड/पॅनकार्ड 
 • मोबाईल नंबर 
 • मतदानकार्ड 
 • दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड 
 • पासपोर्ट फोटो 
 • वीजबिल 
 • जन्माचा दाखला 
 • रहिवासी दाखला 
 • उत्पन्नाचा दाखला 

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana अर्ज कसा करावा?

 • Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रकारे करू शकता.
 • ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करु शकता. अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्याच कार्यालयात अर्ज सादर करु शकता.
 • ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला “आपले सरकार” या पोर्टल ला भेट देणे गरजेचे आहे. 
 • अर्ज कसा करावा याचा सविस्तर व्हिडीओ काहली देण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज करताना खाली दिलेल्या व्हिडिओ ची मदत घ्यावी.

Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana फायदे

 • वृद्धांना आर्थिक सहाय्य मिळेल.
 • वृद्धांना वृद्धापकाळात कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
 • या योजनेमुळे वृद्ध आत्मनिर्भर होतील.
 • वृद्धांचा आर्थिक व सामाजिक विकास होईल. 

महत्त्वाच्या लिंक्स

Posts You May Like

 • Online Application for New Ration Card: Click Here
 • Lek Ladaki Scheme : Click Here
 • आयुष्यमान भारत योजना : Click Here

Leave a Reply