शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी : सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान मिळणार

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान

महाराष्ट्र सरकार || महाराष्ट्र सरकार योजना || महाराष्ट्र सरकार योजना 2023 || सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान || सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान 2022 || सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान 2023 || अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. १०/०८/२०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयान्वये शासनाने जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी, पूर यासारख्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकारिता बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास मान्यता दिली.

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान निकष:

 1. अतिवृष्टी हि राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती आहे. महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. नुकसान जर ३३% पेक्षा जास्त असेल तर नुदन देण्यात येते.
 2. महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही अतिवृष्टी होऊ शकते व पिकांचे नुकसान होऊ शकते. यासाठी अतिवृष्टीसाठी ठरवून देण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही नुकसान झाले असेल तर मदतीसाठी जिल्हाधिकारी शासनास प्रस्ताव पाठवू शकतात आणि या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना मदत मिळू शकते.

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान शासन निर्णय:

दि. १३ जुन २०२३ रोजी मंत्रिमंडळात बैठक झाली या बैठकीत २०२२ च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टी निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीस मदत देण्याचे शासनाने मंजूर केले आहे.

सन २०२२ च्या पावसाळी हंगामातीअतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानिकारिता विशेष बाबा म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावातील बाधित शेतकऱ्यांना देण्याकरिता शासनाने निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या शिधारित दराने व निकषानुसार एकूण रु. १५०००० लाख इतका निधी जिल्हानिहाय वितारीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

सदर शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचा संकेतांक क्रमांक २०२३०६२०१३०७१०३९१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीस अनुदान अटी:

अतिवृष्टी मुळे होणारे नुकसानीसाठी मिळणारे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याने E-KYC करून घेणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी E-KYC केलेली आहे त्या शेकऱ्यांच्या अश्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २१० कोटी ३० लाख रुपयांच्या मदतीचा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.

E-KYC करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्यात :

 1. E-KYC करण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 2. संकेतस्थळावर गेल्या नंतर VLE login वर क्लिक करावे.
 3. तिथे तुमचा User ID आणि पासवर्ड टाकावा.
 4. त्यानंतर आधार प्रमाणीकरण वर क्लिक करावे.
 5. यानंतर नैसर्गिक आपत्ती-शेती पिके नुकसान मदत वर क्लिककरावे.
 6. यानंतर एक विशिष्ट क्रमांक टाकणे गरजेचे आहे. हा क्रमांक ज्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे त्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे. त्या याद्या तहसील कार्यालयाने ग्रामपंचायतीत उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तम्ही घेऊ शकता. क्रमांक टाकल्यानंतर सर्च वर क्लिक करावे.
 7. यानंतर त्या शेतकऱ्याची सर्व माहिती समोर येते जसे की नाव, गट क्र., तोटा प्रकार, बाधित क्षेत्र, वितरीत रक्कम, आधार नंबर, बँक नाव, अकौंट नंबर, मोबाईल नंबर इ.
 8. शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक माहिती पाहून घ्यावी. माहिती मध्ये काही चुका असतील तर खाली दिलेल्या Grievance Selection मध्ये बदल करु शकतात.
 9. सर्व माहिती बरोबर असेल तर No Grievance वर क्लिक करावे.
 10. E-KYC करण्यासाठी तुमची मंजुरी घेण्यासाठी एक मेसेज असेल तिथे टिक करायची आहे.
 11. यानंतर तुम्हाला Adhar E-KYC option दिसेल तिथे तुमचा मोबाईल नंबर व आधार नंबर टाकावा. तुम्ही E-KYC दोन प्रकारे करू शकता OTP किंवा Biometric. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्याने करावा.
 12. Biometric साठी तुम्हाला device गरजेचे आहे. Biometric वर क्लिक केल्यानंतर select device वर क्लिक करून device निवडायचे आहे. त्यानंतर validate the UID वर क्लिक करायचे आहे.
 13. अशा प्रकारे तुमची E-KYC पूर्ण होईल. त्या document ची तुम्ही प्रिंट काढू शकता.
 14. या प्रक्रियेनंतरच अनुदान मिळणार आहे.
 15. ज्यांनी हि प्रक्रिया करून घेतली आहे त्यांच्या खात्यावर अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे.

महत्वाच्या लिंक्स :

Posts You May Like :

 • कांदा चाळ अनुदान योजना 2023 : Click Here
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Click Here
 • पॉली हाऊस शेडनेट योजना : Click Here

Leave a Reply