Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana : संजय गांधी निराधार पेन्शन योजना, मिळणार प्रतिमहा 1500/- रुपये

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana : केंद्र तसेच महाराष्ट्र सरकार देशातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. जेणेकरून देशातील आणि राज्यातील नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. आज आपण अश्याच एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती योजना म्हणजे संजय गांधी निराधार पेन्शन योजना. ही माहिती पाहताना योजना काय आहे, योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळणार आहेत, पात्रता काय आहे, कागदपत्रे काय आहेत इ. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचावा.

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana काय आहे?

संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही महाराष्ट्र सरकारच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाने सुरु केलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटीत महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला या सर्वांना प्रतिमह १५००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करते.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra उद्देश

 • राज्यातील निराधार व्यक्तींना प्रतिमह आर्थिक मदत करणे हा Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारणे.
 • राज्यातील निराधार व्यक्तींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविणे.
 • निराधार व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
 • निराधार व्यक्तींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana लाभ

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला प्रतिमह १५००/- रुपये ची आर्थिक मदत केली जाणार आहे.

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana लाभार्थी

 • ६५ वर्षाखालील निराधार स्त्री आणि पुरुष
 • अपंग स्त्री आणि पुरुष (अस्थीव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद ई.)
 • अनाथ मुले
 • क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजार असलेले स्त्री आणि पुरुष
 • निराधार महिला (विधवा, शेतमजूर, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा)
 • अत्याचारीत महिला
 • वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
 • ३५ वर्षाखालील अविवाहित महिला
 • तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana पात्रता व अटी

 • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
 • लाभार्थ्याचे वय ६५ वर्षाखालील असावे.
 • अर्जदाराकडे उत्पन्नाचा स्रोत नसावा तसेच अर्जदार जमिनीचा मालक नसावा.
 • अर्जदारचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असावे.
 • अर्ज करणाऱ्या सर्व अर्जदारांचे व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,०००/- पेक्षा जास्त नसावे.
 • अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर मतीमंद यांचे अपंगत्व किमान 40% असावे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र गरजेचे.
 • लाभार्थ्यांची मुले 21 वर्षाची होईपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी व मुलांना लाभ देण्यात येईल. मुलाला नोकरी मिळाल्यानंतर मुलाचे व कुटुंबाचे उत्पन्न विचारात घेऊन पात्रता ठरविण्यात येईल.
 • मुलींच्या बाबतीत लग्न होईपर्यंत किंवा तीला नोकर मिळेपर्यंत लाभ मिळेल. तसेच नोकरी लागल्यानंतर अविवाहीत मुलीचे उत्पन्न व कुटुंबाचे उत्पन्न याचा विचार करुन पात्रता ठरविण्यात येईल.
 • मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या पालक कुटूंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येईल.
 • शारिरीक छळवणुक / बलात्कार झालेल्या अत्याचारीत स्त्रीयांच्या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन) व महिला बालविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र गरजेचे तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • घटस्फोट प्रक्रीयेतील स्त्रीया, ज्या पती-पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या  राहणाऱ्या स्त्रीयांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलची संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेले व तहसिलदारांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 • घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहतील. घटस्फोट झाल्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
 • वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत, महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
 • विधवा ज्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील. पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत/नगरपरिषदेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे आवश्यक राहील.
 • अनाथ मुले-मुली म्हणजे आई-वडील मृत्यूमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुले-मुली यांना लाभ मिळेल. अश्या अनाथ मूलांना लाभ मिळण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांचे व संबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • अनाथ मुले/मुलींना देय असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी सज्ञान होईपर्यंत त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल.

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana इतर अटी

 • जर अर्ज उत्पन्न २१,०००/- पेक्षा कमी असेल तर त्या अर्जदाराकडे जमीन आहे किवा नाही याचा विचार न करता त्याला पत्र ठरवले जाईल.
 • लाभार्थी जर मरण पावला तर त्याला मिळणारे आर्थिक सहाय्य बंद केले जाईल.
 • लाभार्थी जर मृत्यू पावला असेल आणि त्याचे आर्थिक सहाय्य देणे बाकी असेल तर त्याच्या मृत्यू दिनांकापर्यंत हिशोब करुन त्याच्या वारसास आर्थिक मदत देण्यात येईल.

Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents in Marathi (कागदपत्रे)

 1. ओळखीचा पुरावा
  • अर्जदाराचा फोटो
  • (ओळखीचा पुरावा) पारपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदाता ओळखपत्र
  • निमशासकीय ओळखपत्र
  • आर एस बी वाय कार्ड
  • म्रारोहयो जोब कार्ड
  • वाहन चालक अनुज्ञप्ती
 2. पत्त्याचा पुरावा
  • रहिवाशी दाखला) ग्रामसेवक/तलाठी/मंडळ निरिक्षक यांनी दिलेला रहिवाशी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवाशी दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल
 3. इतर दस्तऐवज
  • (प्रवर्गाचा दाखला) शिक्षा झाल्याबध्दल मा न्यायालयाच्या आदेशाची प्रत
  • (प्रवर्गाचा दाखला) विधवा असल्यास, मोठ्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र, असल्यास
  • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोटित महिलेसंदर्भात, पोटगी न मिळणाऱ्या महिला -घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश
  • (प्रवर्गाचा दाखला) जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हिल सर्जन), शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिलेला दाखला
  • (प्रवर्गाचा दाखला) पतीचेनिधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगरपालिकेच्या मृत्यु नोंदवहीतील उतारा
  • (प्रवर्गाचा दाखला) तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका/महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र
  • (प्रवर्गाचा दाखला) या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला -घटस्फोटासाठी न्यायालयीन आदेश आणि पतीने द्यावयाच्या देखभाल रकमेचा पुरावा
  • (प्रवर्गाचा दाखला) अस्थिव्यंग, अंध, मुकबधिर, कर्णबधिर, मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत अपंग व्यक्ति अधिनियम 1995 मधील तरतूदीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन) यांचे प्रमाणपत्र
  • (प्रवर्गाचा दाखला) अनाथ असल्याचा दाखला – ग्रामसेवक / मुख्याधिकारी / प्रभाग अधिकारी यांनी दिलेला व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांक्षाकित केलेला दाखला
  • (प्रवर्गाचा दाखला) कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा शासन अनुदानित निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबत तहसीलदार किंवा ग्रामसेवक / तलाठी यांच्या शिफारशीवरुन दिलेला दाखला व महिला व बाल कल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला
  • (प्रवर्गाचा दाखला) शारीरिक छळवणूक झालेल्या / बलात्कार झालेल्या अत्याचारित महिलेच्या बाबतीत जिल्हा शल्यचिकित्सक (सिविल सर्जन) व महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र
  • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोटित मुस्लीम महिलेसंदर्भात तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जीदमधील काझीने त्या स्त्रीच्या घटस्फोटासंदर्भात तहसीलदारासमोर शपथपत्र अथवा गावामध्ये / शहरामध्ये मुस्लीम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी नोंदणीकृत संस्था असेल, त्या संस्थेने ठराव करून दिल्यास प्रमाणपत्र
  • (प्रवर्गाचा दाखला) घटस्फोट प्रक्रियेतील स्त्रिया, ज्या पती- पत्नीने कायदेशीर घटस्फोट मिळण्यासाठी न्यायायालयाकडे अर्ज केला आहे, परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही, अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणान्या स्त्रियांनी रितसर घटस्फोट मिळण्यासाठी नायायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्य प्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबद्दलचे संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या दिलेले प्रमाणपत्र तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका/महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र
 4. वयाचा पुरावा
  • (वयाचा दाखला) शाळा सोडल्याचा दाखला
  • (वयाचा दाखला) शिधापत्रिकेमध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा
  • (वयाचा दाखला) ग्रामपंचायतीच्या / नगरपालिकेच्या / महानगरपालिकेच्या जन्मनोंद वहीतील उता-याची साक्षांकित प्रत
  • (वयाचा दाखला) ग्रामीण/नागरी रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकिय अधिका-याने दिलेला वयाचा दाखला
 5. उत्पन्नाचा पुरावा
  • (उत्पन्नाचा पुरावा) तहसिलदार किंवा उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला दाखला (अर्जदारकडून रु ५/- च्या Court Fee Stamp वर प्राप्त झालेल्या अर्जानुसार)
 6. जातीचा दाखला
  • (बँक/पोस्ट खात्याच्या पुरावा) बँक/पोस्ट खात्याच्या तपशिलाची स्कॅन केलेली प्रत
 7. कायदेशीर दस्तऐवज
  • (पालकांचा रहिवाशी दाखला) पालकांचा रहिवाशी दाखला
 8. अर्जाची प्रत
  • (दारिद्र्य रेषेखालील पुरावा) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये त्या व्यक्ती / कुटुंबाचा समावेश असल्याबद्दलचा साक्षांकित उतारा

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana अर्ज कसा करावा?

 • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रकारे करू शकता.
 • ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करु शकता. अर्जाला आवश्यक ती कागदपत्रे जोडून त्याच कार्यालयात अर्ज सादर करु शकता.
 • ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला “आपले सरकार” या पोर्टल ला भेट देणे गरजेचे आहे. 
 • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana अर्ज कसा करावा याचा सविस्तर व्हिडीओ काहली देण्यात आलेला आहे. ऑनलाईन अर्ज करताना खाली दिलेल्या व्हिडिओ ची मदत घ्यावी.

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana फायदे

 • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रतिमहिना 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामुळे त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
 • राज्यातील निराधार व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील निराधार व्यक्तींचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी व उपजीविकेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.
 • निराधार व्यक्ती कुठल्याही आर्थिक अडचणींशिवाय त्यांचे जीवन जगण्यासाठी सक्षम बनतील.

महत्त्वाच्या लिंक्स

 • आपले सरकार पोर्टल : Click Here

Posts You May Like

 • Online Application for New Ration Card: Click Here
 • Lek Ladaki Scheme : Click Here
 • आयुष्यमान भारत योजना : Click Here
 • Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana : Click Here

Leave a Reply