Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM Get 3000/- per month: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना दरमहा मानधन 3000/-

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM : केंद्र सरकार ने असंघटीत क्षेत्रातील मजूर किंवा कामगारांसाठी अतिशय महत्वाची योजना सुरु केलेली आहे. ती योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. आजच्या लेखात आपण या योजनेविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणजेच योजना काय आहे? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते? योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे? कागदपत्रे कुठली लागतात? योजनेसाठी अर्ज कुठे व कसा करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळतील. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचावा.

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM योजना काय आहे?

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM योजनेंतर्गत देशातील सुमारे 42 कोटी असंघटित कामगार (घरकाम कामगार, रस्त्यावर विक्री करणारे, मध्यान्न भोजन कामगार, माथाडी कामगार, वीटभट्टी कामगार, शेती कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, शेती नसणारे मजूर,हातगाडी ओढणारे कामगार, दृकश्राव्य कामगार किंवा तत्सम इतर व्यवसायातील कामगार) ज्यांचे उत्पन्न 15000/- किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा 3000/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे. नोकरदारांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते परंतु असंघटीत क्षेत्रातील कामगारांना पेन्शन ची सुविधा मिळत नाही. असंघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेंतर्गत अर्ज करून वृद्धापकाळात पेन्शन ची सुविधा घेऊ शकतात.

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM पात्रता

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी खालील पात्रता दिलेली आहे:

 • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा असंघटीत क्षेत्रातील असावा.
 • कामगारचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
 • उत्पन्न 15000/- किवा त्यापेक्षा कमी असावे.

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM योजनेंतर्गत प्राप्त होणारे फायदे

 • या योजनेंतर्गत लाभार्थ्याला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000/- रुपये मिळणार आहेत.
 • 18 ते 40 वर्षे वयोगटातील अर्जदारांना 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंतचे मासिक योगदान द्यावे लागेल.
 • जर अर्जदाराचा मृत्यू झाला तर अर्जदाराच्या पत्नील आयुष्यभरासाठी दीड हजार रुपये पेन्शन मिळते.

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM योजनेंतर्गत अर्ज कसा करावा?

 • या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईट वर गेल्यावर login असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.
 • त्यानंतर तुमच्या समोर जे पेज येईल त्या पेजवरील Self Enrollment या पर्यायावर क्लिक करावे.
 • तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा. त्या नंबरवर तुम्हाला OTP येईल. OTP टाकून login करावे.
 • Login केल्यानंतर तुमच्यासमोर एक dashboard येईल. त्यावरील Service हा पर्याय निवडावा.
 • यानंतर Enrollment या पर्यायावर क्लिक करावे. तिथे तुम्हाला 3 पर्याय दिसतील त्यातील पहिला पर्याय निवडावा.
 • तुम्ही जर e-Shram अंतर्गत registered नसाल तर No वर क्लिक करावे व खाली दिल्या लिंक वर क्लिक करून registration करून घ्यावे. e-Shram registration link
 • जर e-Shram अंतर्गत registered असाल तर yes वर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर जे पेज येईल त्यामध्ये सर्व माहिती भरवी कागदपत्रे अपलोड करावे.
 • जे पात्र आहेत त्यानी आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी सेंटर) वर जावे व नोंदणी करावी.
 •  कॉमन सर्व्हिस सेंटर ऑपरेटर आवश्यक माहितीसह फॉर्म भरेल आणि प्रधानमंत्री मानधन पेन्शन योजनेची ऑनलाइन नोंदणी करेल. लाभार्थीची पात्रता तपासल्यानंतर प्रधान मंत्री श्रम योगी पेन्शन (PMKMY) कार्ड अद्वितीय पेन्शन खाते क्रमांकासह तयार केले जाईल.

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पासबुक
 • मोबाईल नंबर

Pradhanmantri Shram Yogi Maandhan Yojana PMSYM योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

वरील योजनेचा लाभ जे आयकर भारतात ते घेऊ शकत नाहीत तसेच जर तुम्ही EPFO, NPS आणि ESIC अंतर्गत समाविष्ट असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

महत्वाच्या लिंक्स:

Leave a Reply