Pradhanmantri Matru Vandana Yojana : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत महिलांना मिळणार 6000/- रुपये

secrets 2 1

Pradhanmantri Matru Vandana Yojana : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमी नागरिकांसाठी योजना राबवत असते. जेणेकरून नागरिकांची सामाजिक, आर्थिक व वैयक्तिक प्रगती व्हावी. या योजना नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी, त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागू केलेल्या असतात. आज आपण अश्याच एका योजनेची माहिती इथे पाहणार आहोत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर महिला आणि स्तनदा मातांसाठी राबवली जाते. ज्यामध्ये त्यांना आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री मातृ वंदना ही योजना केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ ला सुरु केलेली योजना आहे. या योजनेंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ५००० रुपयाची आर्थिक मदत केली जाते. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे.

Pradhanmantri Matru Vandana Yojana लाभ

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत गरोदर महिला व स्तनदा मातांना ५००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. जर महिला जननी सुरक्षा योजनेला पात्र असेल तर तीला अतिरिक्त १००० रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच त्या महिलेला एकूण ६००० रुपये या योजनेंतर्गत दिले जातील. गरोदर महिला आणि स्तनदा माता या योजनेचा लाभ जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्राला भेट देऊन घेऊ शकता.

Pradhanmantri Matru Vandana Yojana लाभ कसा मिळणार?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत महिलांना जी रक्कम दिली जाते ती रक्कम हप्त्याद्वारे पात्र महिलेला वितरीत केली जाते. ते हप्ते खाली दिल्याप्रमाणे आहेत:

 • पहिला हप्ता : पहिला हप्ता महिलांना नोंदणी करण्यासाठी दिले जातात. अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी १००० रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
 • दुसरा हप्ता : महिलांना दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर २००० रुपयांचा हप्ता दिला जातो.
 • तिसरा हप्ता : महिलांना तिसरा हप्ता म्हणजेच २००० रुपये मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.

Pradhanmantri Matru Vandana Yojana अर्ज कसा करावा?

 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी फॉर्म मिळवावा लागेल.
 • फॉर्म महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मिळवावा लागेल.
 • किंवा नजीकच्या आरोग्य केंद्र किवा अंगणवाडी केंद्र मध्ये जावून मिळवावा लागेल.
 • त्या फॉर्म वरील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
 • फॉर्म ला आवश्यक सर्व कागदपत्रे जोडावीत.
 • तो अर्ज अंगणवाडी किवा आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याकडे जमा करावीत.
 • अंगणवाडी केंद्र किवा आरोग्य केंद्राकडून तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल. ती पावती भविष्यासाठी उपयोगी पडेल.
 • अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

Pradhanmantri Matru Vandana Yojana कागदपत्रे

 • योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र किंवा संमतीपत्र द्यावे लागेल.
 • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
 • बँक पासबुक
 • माता-बाल संरक्षण कार्ड (MCP कार्ड)
 • योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व पती याचे ओळखपत्र
 • दुसरा हप्ता मिळवण्यासाठी गर्भधारणेच्या 6 महिन्यानंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची झेरॉक्स
 • तिसरा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थीकडून बाळाच्या जन्माच्या नोंदणीची प्रत आणि बाळाची लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड

Pradhanmantri Matru Vandana Yojana पेमेंट स्टेटस कसा पाहणार?

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत जो लाभ मिळाला आहे त्याचा स्टेटस पाहण्यासाठी खालील पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता.

 • सर्वात अगोदर अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
 • तुमच्यासमोर वेबपेज ओपन होईल तिथे ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
 • यानंतर पुढील पेज वर पात्र महिलेची स्थिती जाणून घेण्याचा पर्याय असेल त्याठिकाणी पात्र महिलेचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे.
 • यानंतर तुमच्या पेमेंटचा स्टेटस तुमच्या समोर येईल. त्यामध्ये सर्व हप्त्याची संपूर्ण माहिती असेल.
 • तो रिपोर्ट तुम्ही तपासू शकता आणि डाऊनलोड ही करू शकता.

महत्वाच्या लिंक्स

 • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अधिकृत वेबसाईट : Click Here
 • प्रधानमंत्री मातृ वंदना पेमेंट स्टेटस : Click Here
 • To Know More : Click Here

Posts You May Like

Leave a Reply