Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24, जाणून संपूर्ण माहिती

Pradhanmantri Fasal Bima Yojana

Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेस लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

रब्बी हंगाम २०२३-२४ या वर्षामध्ये या योजनेतील सभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेसाथी अर्ज करण्याची शेवटच्या तारखा खाली दिल्या प्रमाणे आहेत.

 • ब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) – 30 नोव्हेंबर 2023
 • गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा – 15 डिसेंबर, 2023
 • उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग – 31 मार्च, 2024

Pradhanmantri Fasal Bima Yojana पिके

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (६ पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

Pradhanmantri Fasal Bima Yojana अर्ज कुठे करावा?

Pradhanmantri Fasal Bima Yojana या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक  पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया रुपया भरून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. प्रधानमंत्री फसल बिम योजना या पोर्टल च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज कारणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी शेतकरी स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत ननोंदणी करू शकतात.

कागदपत्रे

 • पासबुक
 • जमिनीचा ७/१२
 • पीक पेरा प्रमाणपत्र
 • जर भाडे तत्वावर शेती करत असताल तर भाडेकरू प्रमाणपत्र

Pradhanmantri Fasal Bima Yojana महत्त्वाची माहिती

 • प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये 40 देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ 1 रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी.
 • कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.
 • योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, नजिकची बँक, तहसीलदार/तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Pradhanmantri Fasal Bima Yojana कार्यान्वित यंत्रणा

 • ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. – अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा
 • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि. – परभणी, वर्धा, नागपूर
 • युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि. – जालना, गोंदिया, कोल्हापूर
 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि. – नांदेड,  ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
 • चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि. – छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड
 • भारतीय कृषी विमा कंपनी – वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदूरबार, बीड
 • एचडीएफसी जनरल इं. कं. लि. – हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, धाराशीव
 • रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स – यवतमाळ, अमरावती, गडचिरोली
 • एस. बी. आय. जनरल इं. कं. लि. – लातूर

महत्त्वाच्या लिंक्स

 • PMFBY अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like

 • How to Apply Online For Ayushyaman Bharat Card: Click Here
 • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana: Click Here

Leave a Reply