Pradhan Mantri Fasal Bima Yojana : लवकरच जमा होणार विम्याची रक्कम, आला सरकारचा जीआर झाले 61,52,35,981/- रुपये मंजूर

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. यादरम्यान, ६१ कोटी ५२ लाख ३५ हजार ९८१ रुपये रक्कम शासनाने विमा कंपन्यांना वितरीत केली आहे ज्यातून शेतकऱ्यांना उर्वरित हप्ता दिला जाणार आहे. त्यामुळे राहिलेला हप्ता कंपन्या लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरीत करतील.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ शासन निर्णय दि.0१/0७/२०२२ अन्वये भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., बजाज अलियांझ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाच विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने आयुक्त (कृषी) यांचे मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ अंतर्गत उपरोक्त ५ कंपन्याचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. या मागणीला अनुसरून खरीप हंगाम २०२२ करिता रुपये ६१,५२,३५,९८१/- इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana शासन निर्णय

भारतीय कृषी विमा कंपनीने सदर केलेली मागणी आणि तदनुषंगाने कृषी आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२२ अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., बजाज अलियांझ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या ५ विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रुपये ६१,५२,३५,९८१/- इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

विमा कंपनी एकूण देय राज्य हिस्सा विमा हप्ता रक्कम (रु.)विमा कंपन्यांनी यापूर्वी वितरीत राज्य हिस्सा अनुदान (रु.)सदर शासन निर्णयानुसार वितरीत करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम (रु.)
भारतीय कृषी विमा कंपनी 899342709589731142604164839
बजाज अलियांझ इन्शुरन्स कंपनी21479067971619158241525238837
एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी2110558553205582587552399493
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.2700561720266493172322674988
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी2814204000280252712010757824
एकूण खरीप हंगाम २०२२1876671816518115557219615235981

सदरची रक्कम खरीप हंगाम २०२२ करिता वितरीत करणायत येत असून त्याचा वापर यापूर्वीच्या इतर हंगामाकरिता अनुज्ञेय असणार नाही.

महत्वाच्या लिंक्स

Leave a Reply