Post Office Insurance Scheme 2023 : पोस्ट ऑफिस मध्ये भरा 399 आणि मिळवा १० लाखाचा अपघाती विमा

Post Office Insurance Scheme 2023

Post Office Insurance Scheme 2023 : भारतीय डाक विभागाने देशातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेमार्फत गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीला तो व त्याच्या कुटुंबासाठी अपघात संरक्षण विमा मिळू शकतो. आजच्या लेखात आपण या अपघात विम्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. या लेखात तुम्हाला प्रीमियम किती भरायचा? पात्रता काय आहे? योजनेच्या अटी काय आहेत? योजनेसाठी अर्ज कुठे करावा? याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा लेख सविस्तर वाचावा.

Post Office Insurance Scheme 2023

या योजनेत नागरिकांना दरवर्षी फक्त 299/- आणि 399/- रुपये एव्हढा प्रीमियम भरायचा आहे. या बदल्यात नागरिकांना १० लाखाचा अपघात विमा प्राप्त होणार आहे. ही योजना भारतीय डाक विभाग आणि टाटा एआयजी यांच्यातील करारानुसार सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिक घेऊ शकतात. या योजनेत दोन प्रकारचे प्रीमियम देण्यात आलेले आहेत. त्या दोन्ही प्रीमियम मध्ये नागरिकांना मिळणारे लाभ आपण पाहूयात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस ला भेट देणे गरजेचे आहे.

Post Office Insurance Scheme 2023 : 399 प्रीमियम भरल्यानंतर मिळणारे फायदे

 1. जर अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला १० लाखाचा विमा प्राप्त होईल.
 2. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तरी देखील १० लाख रुपये विमा प्राप्त होईल.
 3. दवाखान्याचा ६० हजारापर्यंत होणारा खर्च देखील दिला जाणार आहे.
 4. रुग्णालयात दाखल न होता जर घरीच उपचार केला तरी देखील या योजनेंतर्गत ३० हजारापर्यंत क्लेम करू शकतो.
 5. मुलांच्या शिक्षणावर होणारा खर्च देखील दिला जाणार आहे. जर घरामध्ये एकूण दोन मुले असतील तर दोघांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाखापर्यंत खर्च दिला जाईल. जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 6. जर दहा दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी दवाखान्यात दाखल झाले असाल तर दहा दिवसांसाठी दररोज हजार रुपये प्रमाणे दवाखान्याचा खर्च दिला जाईल. जर दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस दवाखान्यात दाखल असाल तर तुम्हाला खर्च मिळणार नाही.
 7. या योजनेंतर्गत ३० हजारापर्यंतचा OPD चा खर्च ही दिला जाणार आहे.
 8. अपघातामुळे जर पँरलाईज(पक्षपात) झालात तर १० लाखाचा विमा मिळणार आहे.
 9. दवाखान्याचा प्रवास खर्च सर्व कुटुंबाला मिळून २५ हजारापर्यंत दिला जाणार आहे.
 10. विमा धारकाचा जर अपघातात मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा पाच हजार दिले जाणार आहे.

Post Office Insurance Scheme 2023 : 299 प्रीमियम भरल्यानंतर मिळणारे फायदे

 1. जर अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबाला १० लाखाचा विमा प्राप्त होईल.
 2. अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तरी देखील १० लाख रुपये विमा प्राप्त होईल.
 3. दवाखान्याचा खर्च जर ६० हजारापर्यंत होणारा खर्च देखील दिला जाणार आहे.
 4. रुग्णालयात दाखल न होता जर घरीच उपचार केला तरी देखील या योजनेंतर्गत ३० हजारापर्यंत क्लेम करू शकतो.
 5. या योजनेंतर्गत ३० हजारापर्यंतचा OPD चा खर्च ही दिला जाणार आहे.
 6. अपघातामुळे जर पँरलाईज झालात तर १० लाखाचा विमा मिळणार आहे.

Post Office Insurance Scheme 2023 : 299 प्रीमियम भरल्यानंतर न मिळणारे फायदे

 1. मुलांच्या शिक्षणसाठी दिला जाणारा १ लाखाचा खर्च दिला जाणार नाही.
 2. दवाखान्यात असल्यावर दिला जाणारा एक हजार चा खर्च दिला जाणार नाही.
 3. कुटुंबाला दिला जाणारा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
 4. अंत्यसंस्कारासाठी दिला जाणारा पाच हजार रुपयाचा खर्च दिला जाणार नाही.

Post Office Insurance Scheme 2023 पात्रता आणि अटी

 1. या योजनेसाठी वयोमर्यादा १८ ते ६५ वर्ष असणे गरजेचे आहे.
 2. अर्जदाराचे खाते हे पोस्ट ऑफिस मध्ये असणे गरजेचे आहे. खाते नसेल तर नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून खाते open करून घ्यावे.

Post Office Insurance Scheme 2023 या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही?

 1. नौदल, हवाई दल आणि पोलीस दलातील व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या योजनेचा लाभ फक्त श्री आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय नागरिक घेऊ शकतात.

Post Office Insurance Scheme 2023 कोणत्या परिस्थिती लाभ घेता येणार नाही?

 1. अयोग्य संदर्भात कुठलीही पूर्व विद्यमान स्थिती असलेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. जसे कि अपंगत्वामुळे अपघात झाला असेल तर विमा मिळणार नाही.
 2. विमा धारकाने आत्महत्या केली असेल तर लाभ मिळणार नाही.
 3. अपघात मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर अपघात झाला असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 4. विमाधारकाचा मृत्यू जर बाळंतपनात किवा गर्भधारणेमुळे नुकसान झाले असेल तर लाभ मिळणार नाही.
 5. खाण कामगार, बांधकाम कामगार, ड्रायव्हिंगचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही.
 6. स्फोटक आणि विषारी औषध तयार करणाऱ्या कंपनीमधील कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Post Office Insurance Scheme 2023 या योजनेचा कालावधी आणि अर्ज कुठे करावा?

या योजनेचा कालावधी एक वर्षासाठी असेल एक वर्ष पूर्ण झाल्यावर या विम्याचे पुन्हा नुतनीकरण करावे लागेल. या विम्यासाठी अर्ज तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन करू शकता किवा पोस्टमन च्या मार्फत हि करू शकता.

महत्वाच्या लिंक्स

विचारले जाणारे प्रश्न

पोस्ट ऑफिस ची योजना कोणासाठी लागू आहे?

ही योजना वयोमर्यादा १८ ते ६५ वर्षे व्यक्तींसाठी लागू आहे.

योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

या योजनेसाठी अर्जदार नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावून अर्ज करू शकतो किंवा पोस्टमन मार्फत हि अर्ज करू शकतो.

या योजनेसाठी प्रीमियम किती भरायचा आहे?

या योजनेसाठी 299/- आणि 399/- असे दोन प्रीमियम आहेत. 399/- प्रीमियम साठी जास्त लाभ देण्यात आलेले आहेत.

Posts You May Like To Read

 1. Ujjwala Yojana 2.0 (उज्ज्वला योजना २०२३) : Click Here
 2. खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र : Click Here
 3. आयुष्यमान भारत योजना : Click Here
 4. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 : Click Here

Leave a Reply