पॉली हाऊस शेडनेट सबसिडी महाराष्ट्र २०२३ : Polyhouse and Shadenet Subsidy upto Rupees 23/- lakh

पॉली हाऊस शेडनेट

पॉली हाऊस शेडनेट योजना || पॉली हाऊस आणि शेडनेट योजना २०२३ || पॉली हाऊस आणि शेडनेट योजना अर्ज || महाराष्ट्र पॉली हाऊस आणि शेडनेट योजना २०२३

Polyhouse and Shadenet Subsidy Scheme || Polyhouse and Shadenet Subsidy Scheme 2023 || Polyhouse and Shadenet Subsidy Scheme Apply || Polyhouse and Shadenet Subsidy Scheme Maharashtra

आपल्या देशात दिवसेंदिवस शेती मध्ये विकास होत आहे.शेतीच्या सतत विकसित होत असलेल्या जगात जास्ती जास्त उत्पादन, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि शाश्वत शेती पद्धतीनं प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या नवीन कल्पनांचा शोध लागत आहे. या नवीन कल्पना शेती विकासातखूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. पारंपारिक शेती पद्धती, हवामान बदल, संसाधनांची कमतरता आणि बाजरील चढउतार यांसारख्या आव्हानांना सामोरे जात असताना, पॉली हाऊस आणि शेडनेट यांसारखे आधुनिक उपाय महत्वाचा भाग ठरत आहेत. आज या लेखात आपण याच पॉली हाऊस आणि शेडनेट योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत. संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लेख काळजीपूर्वक वाचवा.

पॉली हाऊस शेडनेट म्हणजे काय?

पॉली हाऊस शेडनेट हे पिकांना ऊन, पाऊस, वादळ कठोर हवामान, उष्णता या सर्व परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी वापरले जाते. पॉली हाऊस शेडनेट कमी देखभाल, मजबूत रचना, जाडी, आणि टिकाऊपणाची हमी देते. पॉली हाऊस शेडनेट चा उपयोग हंगामी तसेच बिगर हंगामी पिकांची लागवड करण्यासाठी केला जातो. यासाठी जागाही कमी लागते आणि उत्पन्न हि मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे शेतकरी यासारख्या शेतीकडे वळत आहे. शेतकऱ्यांची हीच गरज पाहून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकार ने शेतकऱ्यांना अश्या प्रकारची शेती करण्यासाठी अनुदान देत आहे.

पॉली हाऊस शेडनेट अनुदान अटी :

 1. पॉली हाऊस शेडनेट अनुदान साठी अनुदान हे ४००० चौरस मीटर पर्यंत मिळेल. या हाऊस चे बांधकाम हे फक्त कंत्राटी फर्मच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.
 2. पॉली हाऊस शेडनेट बांधकामासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती नसेल. शेतकऱ्यांना जर कर्जाची आवश्यकता असेल तर सहाय्यक संचालक किंवा कृषी उपसंचालक यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल.
 3. शेतात जर उंचसखल जमीन असेल तर जागेचे सापटीकरन करणे गरजेचे आहे.
 4. भरपूर सूर्यप्रकाश असेल अशी जागा निवडावी. मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा आडोश्याची जागा निवडू नये.
 5. पॉली हाऊस च्या जवळ पाणीपुरवठ्याची सुविधा असणे गरजेचे आहे.
 6. पाण्याचा सामू (pH) ६ ते ७.५ असावा आणि क्षारतेचे प्रमाण कामी असावे.
 7. जमीन जर पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाच्या मातीचे वाफे करावे.
 8. विद्युत पुरवठा असणे गरजेचे आहे.
 9. पाणथळ जागा निवडू नये.
पॉली हाऊस शेडनेट

पॉली हाऊस शेडनेट साठी अर्ज कुठे करावा?

 1. पॉली हाऊस शेडनेट साठी अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या website ला भेट द्यावी.
 2. नवीन अर्जदार असताल तर “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करून नोंदणी करून घ्यावी. अगोदर नोंदणी केली असेल तर लॉगिन करावे.
 3. लॉगिन केल्यानंतर कृषी विभाग नाव दिसेल त्या समोरील अर्ज करा यावर क्लिक करावे.
 4. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेवर क्लिककरून संपूर्ण माहिती भरावी.
 5. त्यानंतर माहिती Save करावी.

पॉली हाऊस शेडनेट साठी कसा अर्ज करावा?

 1. पॉली हाऊस शेडनेट च्या बांधकामासाठी अनुदान अर्जासोबत जमीन मालकीचे कागदपत्र, अल्प-मार्जिन प्रमाणपत्र, माती पाणी चाचणी अहवाल आणि कंत्राटदार कोटेशन घेऊन वरती दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.
 2. केलेल्या अर्जाच्या आधारावर कार्यालय प्रशासकीय मान्यता देईल.
 3. यानंतर शेतकऱ्याने शेडनेटची रक्कम जिल्हा कार्यालयात जमा करावी.
 4. रक्कम जमा केल्यानंतर संबंधित फर्म ला कळविण्यात येईल. यानंतर १० दिवसाच्या आत फर्म ने वर्क ऑर्डर दिल्यानंतर जिल्ह्याच्या नियमानुसार किमतीत हमी दिली जाईल.

पॉली हाऊस शेडनेट अनुदान :

पॉली हाऊस शेडनेट चा फायदा हा आहे कि आपण बिगर हंगामी भाजीपाला व फळांचे उत्पादन घेऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांना एका निश्चित हंगामाची वाट पहावी लागणार नाही आणि उत्पनामध्ये हि भर पडेल. पॉली हाऊस शेडनेट साठी शासन २३ लाख रुपया पर्यंत अनुदान देणार आहे.

शेडनेटचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत भौतिक तपासणी केली जाईल. हाऊस वर शेतकऱ्याचे  नाव, स्थापना वर्ष, राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत अनुदानित असे लिहिलेले असावे. युनिट खर्चाच्या ५०% अनुदान देण्यात येईल. अल्प, अत्यल्प, SC/ST शेतकऱ्यांना 70% अनुदान मिळेल.

४००० स्क्वेअरमीटरचे पॉली हाऊस शेडनेट बांधण्यासाठी ८४४ रुपये प्रती चौरस मीटर दराने ३३ लाख ७६ हजार रुपये खर्च येणार आहे. या खर्चातील 70% रक्कम अनुदान मिळाल्यानंतर शासन २३ लाख रुपये रक्कम अनुदान म्हणून देईल. शेडनेट बांधण्यासाठी २८ लाख खर्च येतो. त्यापैकी १९ लाख रुपये अनुदान मिळेल.

महत्वाच्या लिंक :

अर्ज करण्यासाठी : https://mahadbt.maharashtra.gov.in/

अजून माहिती मिळवण्यासाठी : www.mahajobs.org.in

माझी कन्या भाग्यश्री योजना : https://mahajobs.org.in/majhi-kanya-bhagyashri-yojana-maharashtra-2023/

Leave a Reply