PM Vishwakarma Yojana 2023 :PM विश्वकर्मा योजना संपूर्ण माहिती

PM Vishwakarma Yojana 2023

PM Vishwakarma Yojana : केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०२३ रोजी PM विश्वकर्मा योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी पाच वर्षाच्या कालावधीसाठी १३,०००/- कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ही योजना पारंपरिक कौशल्य असणाऱ्या लोकांना त्याचा व्यवसाय उभारण्यास मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्जासोबत कौशल्य प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये १८ पारंपरिक कामाचा समावेश करण्यात आलेला आहे.

PM Vishwakarma Yojana उद्देश

PM विश्वकर्मा योजनेचा उद्देश कारागीर लोकांना सहाय्य करणे, त्याचा उत्पादनांचा दर्जा सुधारणे आणि कारागिरांचे उत्पादने देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर पोहचवण्यास मदत करणे.

PM Vishwakarma Yojana मिळणारे लाभ

या योजनेअंतर्गत कारागिरांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कर्ज हे ३ लाखांचे असेल त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १ लाख रुपये दिले जातील जे व्यवसाय सुरू करण्यासाठी असतील. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी २ लाख रुपये दिले जातील. या कर्जावरील व्याजदर हा ५% असेल.

कर्जासोबतच कौशल्य प्रशिक्षण ही दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये ५-७ दिवसांचे म्हणजेच ४० तासांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यान प्रत्येक दिवशी ५०० रुपये स्टायपेंड दिले जाणार आहे. तसेच लाभार्थी १५ दिवसाचे ही ट्रेनिंग घेऊ शकतो. यासोबतच PM विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षणाशी संबंधित कौशल्य अपग्रेड, १५,०००/- रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन ही दिले जाईल.

PM Vishwakarma Yojana पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
 • अर्जदार १८ व्यापारांपैकी कोणत्याही एका व्यापाराशी संबंधित असावा.
 • लाभार्थ्याने स्वयंरोजगार किंवा व्यवसाय विकासासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या क्रेडिट आधारित योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे.
 • या योजनेसाठी १८-५० वर्ष वयोमर्यादा आहे.
 • या योजनेसाठी कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
 • शासकीय नोकरीत असणारा व्यक्ती व त्याचे कुटुंब या योजनेसाठी पात्र नसेल.

१८ व्यवसाय क्षेत्रे

 • सुतार
 • बोट बनवणारे
 • लोहार
 • कुलुपे बनवणारा व दुरुस्त करणारा
 • हातोडा बनवणारे
 • मूर्तीकर
 • सोनार
 • कुंभार
 • चांभार
 • गवंडी
 • चप्पला/बुटे बनवणारा
 • न्हावी
 • झाडू/बास्केट बनवणारा
 • विणकर
 • हार बनवणारा
 • धोबी
 • बाहुल्या/खेळणी बनवणारा
 • धोबी
 • मासे पकडण्याचे जाळे बनवणारा

आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड
 • पॅनकार्ड
 • उत्पन्नाचा दाखला
 • जातीचा दाखला
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • पासपोर्ट फोटो
 • बँक पासबुक

अर्ज कसा करावा?

 • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/ वर जावे.
 • येथे APPLY ONLINE वर क्लिक करावे.
 • PM विश्वकर्मा योजनेत नोंदणी करावी.
 • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वर एसएमएस द्वारे येईल.
 • यानंतर नोंदणी फॉर्म पूर्णपणे भरावा.
 • फॉर्म भरल्यावर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. यानंतर फॉर्म सबमिट करावा.

Leave a Reply