PM Kisan Samman Nidhi Yojana 16 वा हप्ता : जाणून घ्या केव्हा मिळणार PM किसान चा 16 वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Yojana : नमस्कार मित्रानो, आपल्या देशाची विस्तृत क्षेत्राची कल्पना करा, जिथे शेतकरी आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून खरोखर कठोर परिश्रम करतो. आपल्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न आहे यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हि त्या शेतकऱ्याची आहे जो दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करत असतो. याच शेतकऱ्याला मदत करणारा हात देण्यासाठी केंद्र सरकारने PM किसान महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. याच योजनेची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचवा.

केंद्र सरकारने PM किसान महासान्मान निधी योजना २४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यास एका वर्षात ६०००/- रुपये दिले जातात. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. यानुसार शेतकऱ्यांना दर वर्षाला १२०००/- रुपये मिळणार आहेत.

PM Kisan Samman Nidhi Yojana उद्देश

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कृषी क्षेत्र आणि या कृषी क्षेत्रात राबणारा व्यक्ती म्हणजे शेतकरी. परंतु शेतकऱ्याला शेती करताना बऱ्याच आव्हानांन सामोरे जावे लागते त्यामध्ये पिकांच्या चढ-उताराच्या किमती, हवामानातील अनिश्चीतता आणि वाढत जाणारी महागाई. या आव्हानांमुळे शेतकऱ्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच आर्थिक अडचण काही प्रमाणत दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने PM किसान महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्याला वर्षाला ६०००/- रुपये रक्कम मिळेल. हे 6000/- रुपये दर ४ महिन्याला 2000/- याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

PM Kisan Samman Nidhi Yojana पात्रता

  • अर्जदार शेतकरी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे गरजेची आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार ला लिंक असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्यास ई-केवायसी करणे गरजेचे आहे.
  • रेशनकार्ड ऑनलाईन असणे गरजेचे आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana अर्ज कसा करावा?

PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेस अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट : Click Here

अर्ज करण्याची Direct Link : Click Here

PM Kisan Samman Nidhi Yojana पुढील हप्ता केव्हा मिळणार?

PM Kisan चा १५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. शेतकरी आता १६ व्या हप्त्याची वाट पाहत आहे. शेतकऱ्यांना १६ वा हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like :

Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance : Click Here

Leave a Reply