PM Kisan Samman Nidhi Yojana 16 वा हप्ता झाला जमा : जर झाला नसेल तर करा हे काम

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Yojana : नमस्कार मित्रानो, आपल्या देशाची विस्तृत क्षेत्राची कल्पना करा, जिथे शेतकरी आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून खरोखर कठोर परिश्रम करतो. आपल्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न आहे यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हि त्या शेतकऱ्याची आहे जो दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करत असतो. याच शेतकऱ्याला मदत करणारा हात देण्यासाठी केंद्र सरकारने PM किसान महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आहे. याच योजनेची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचवा.

केंद्र सरकारने PM किसान महासान्मान निधी योजना २४ फेब्रुवारी २०१९ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यास एका वर्षात ६०००/- रुपये दिले जातात. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. यानुसार शेतकऱ्यांना दर वर्षाला १२०००/- रुपये मिळणार आहेत.

PM Kisan Samman Nidhi Yojana उद्देश

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कृषी क्षेत्र आणि या कृषी क्षेत्रात राबणारा व्यक्ती म्हणजे शेतकरी. परंतु शेतकऱ्याला शेती करताना बऱ्याच आव्हानांन सामोरे जावे लागते त्यामध्ये पिकांच्या चढ-उताराच्या किमती, हवामानातील अनिश्चीतता आणि वाढत जाणारी महागाई. या आव्हानांमुळे शेतकऱ्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच आर्थिक अडचण काही प्रमाणत दूर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने PM किसान महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्याला वर्षाला ६०००/- रुपये रक्कम मिळेल. हे 6000/- रुपये दर ४ महिन्याला 2000/- याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

PM Kisan Samman Nidhi Yojana १६ वा हप्ता झाला जमा

शेतकरी बंधू बऱ्याच दिवसापासून १६ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला गेला आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ही हप्ता लवकरच जमा करण्यात येणार आहे. आज ज्यांच्या खात्यावर हप्ता आला नसेल त्यांचा हप्ता उद्यापर्यंत खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परंतु त्याअगोदर खाली दिलेल्या गोष्टी तपासून पाहा आणि त्या गोष्टी पूर्ण नसतील तर पूर्ण करुन घ्या तरच तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.

  • EKYC केली आहे की नाही ते तपासून पहा.
  • आधार कार्डला बँक लिंक आहे की नाही ते तपासून पहा. जर नसेल तर ते लिंक करून घ्या तरच पैसे जमा होतील.

महत्त्वाच्या लिंक्स

EKYC तपासण्यासाठी : Click Here

अधिकृत वेबसाईट: Click Here

Posts You May Like:

Pradhanmantri Fasal Bima Yojana Crop Insurance : Click Here

Leave a Reply