Online Application for New Ration card in 30 day’s: नवीन रेशनकार्ड काढायचं आहे किंवा नाव कमी करायच अथवा वाढवायचं आहे तर करू शकता ऑनलाईन अर्ज

Online Application for New Ration card

Online Application for New Ration card : सरकार सतत नागरिकांसाठी त्यांची काम सोपी व्हावी याची काळजी घेत असते. आज अश्याच एका सुविधेविषयी आपण बोलणार आहोत. आपण एखाद्या एजंटकडे रेशनकार्ड काढण्यासाठी देतो तसेच ते मागतील तेवढे पैसे ही द्यायला तयार होतो परंतु बऱ्याचदा आपल्याला वेळेवर रेशनकार्ड उपलब्ध होत नाही. यासाठीच अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांच्या या तक्रारींना पूर्णविराम देण्यासाठी रेशनकार्ड काढण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की नवीन रेशनकार्डसाठी कुठे अर्ज करायचा? नाव कमी करायचं असेल अथवा वाढवायचे असेल तर त्यासाठी कुठली पद्धत आहे? यासाठी आजचा लेख काळजीपूर्वक वाचावा

Online Application for New Ration card

Online Application for New Ration card : रेशन कार्डसाठी ऑनलाईन application करण्यासाठी खालील स्टेप्स चा वापर करणे गरजेचे आहे:

 • नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला www.rcms.mahafood.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
 • वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तिथे Sign In/Register असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करुन Public Login वर क्लिक करावे.
 • जर तुम्ही अगोदरच लॉगिन केलेला असेल तर Register User वर क्लिक करावे आणि जर नवीन असताल तर New User वर क्लिक करावे.
 • यानंतर तुम्हाला ३ options दिसतील:
  • I have valid Ration Card and I am a HoF/HoFN.
  • I have valid Ration Card and I am a member other than HoF/HoFN.
  • I want to apply for New Ration card.
 • जर तुम्हाला नवीन रेशनकार्ड काढायचे असेल तर तुम्ही ३ नंबर चा option निवडावा.
 • ३ नंबरच्या option वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक अर्ज open होईल त्यातील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. यासाठी तुमचा आधारकार्ड तुमच्या फोन नंबर ला लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येईल.
 • तुमचा फॉर्म submit झाल्यानंतर तुम्हाला तुमचे रेशनकार्ड 30 दिवसात मिळून जाईल.

Online Application for New Ration card : नाव कमी करणे अथवा वाढवणे

 • जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मधील नाव कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल टीआर तुम्हाला वरती दिलेल्या ३ option मधील पहिल्या option वर क्लिक करावे लागेल परंतु त्यासाठी Head of Family(HoF) चे आधारकार्ड हे व्हेरिफाइड असणे गरजेचे आहे. जर असेल तर तुम्ही रेशनकार्ड नंबर टाकून तुमचे रेशनकार्ड चेक करू शकता.
 • तुम्हाला जे चेंजेस करायचे असतील ते चेंजेस फक्त HoFN (Head of family as per NFSA, generally the eldest adult female member of Ration Card) करू शकतो आणि बाकी जे सदस्य असतील त्या फक्त रेशन कार्ड पाहू शकता बाकी सर्व चेंजेस करण्याचे अधिकार HoFN ला देण्यात आलेले आहेत.

Online Application for New Ration card महत्त्वाची माहिती:

 • वरती दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही बऱ्याच गोष्टींची माहिती मिळेल.
 • जसे की रेशनकार्ड ची प्रिंट तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तुमच्या रेशनकार्डचा नंबर टाकून काढू शकता.

महत्त्वाच्या लिंक्स:

Posts You May Like :

Leave a Reply