नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojna) :

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना || नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संपूर्ण माहिती || महारष्ट्र सरकारी योजना || महारष्ट्र सरकार शेतकरी योजना || प्रधानमंत्रीकिसान कृषी सन्मान योजना

Namo Shetkari Mahasanman Yojna || Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme || Maharashtra Government Scheme || Maharshtra Government Scheme for Farmers

नमस्कार मित्रानो, आपल्या महाराष्ट्रातील विस्तृत क्षेत्राची कल्पना करा, जिथे शेतकरी आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून खरोखर कठोर परिश्रम करतो. आपल्याकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न आहे यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका हि त्या शेतकऱ्याची आहे जो दिवसरात्र शेतामध्ये कष्ट करत असतो. याच शेतकऱ्याला मदत करणारा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरुवात केली आहे. याच योजनेची आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचवा.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यास एका वर्षात ६०००/- रुपये दिले जातात. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. यानुसार शेतकऱ्यांना दर वर्षाला १२०००/- रुपये मिळणार आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उद्देश:

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे कृषी क्षेत्र आणि या कृषी क्षेत्रात राबणारा व्यक्ती म्हणजे शेतकरी. परंतु शेतकऱ्याला शेती करताना बऱ्याच आव्हानांन सामोरे जावे लागते त्यामध्ये पिकांच्या चढ-उताराच्या किमती, हवामानातील अनिश्चीतता आणि वाढत जाणारी महागाई. या आव्हानांमुळे शेतकऱ्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच आर्थिक अडचण काही प्रमाणत दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजने नुसार मिळणाऱ्या ६०००/- रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार हि ६०००/- रुपये देणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला वर्षाला १२०००/- रुपये रक्कम मिळेल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्रता:

 1. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असावा.
 2. अर्जदार शेतकरी असणे गरजेचे आहे.
 3. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे गरजेची आहे.
 4. अर्जदाराचे बँक खाते आधार ला लिंक असणे गरजेचे आहे.
 5. लाभार्थ्यास ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत:

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्याच शेतकऱ्यांना लागू होणार आहे जे शेतकरी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी साठी पात्र आहेत. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषामध्ये केलेले बदल हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजून वाट पहावी लागणार आहे कारण official website अजून सुरु झालेली नाही परंतु लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. Website सुरु झाल्यानंतर अर्ज कसा भरावा याबद्दल माहिती सांगितली जाईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये मिळणारा लाभ:

 1. या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्यास प्रत्येक वर्षी ६०००/- रुपये राज्य सरकार देणार आहे.
 2. केंद्र सरकारचे ६०००/- रुपये आणि राज्य सरकारचे ६०००/- अश्या प्रकारे प्रतिवर्षी शेतकऱ्यास १२०००/- रुपये मिळणार आहेत.
 3. हि रक्कम राज्य सरकार केंद्र सरकार प्रमाणेच दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर २०००/- रुपये जमा करेल.
 4. या योजनेचा लाभ १५ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
 5. लाभार्थी शेतकऱ्यांना हि रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा केली जाईल. बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअवसाठी आवश्यक कागदपत्रे:

 1. आधार कार्ड
 2. बँक खाते क्रमांक
 3. ७/१२ उतारा
 4. मतदान कार्ड
 5. पासपोर्ट साईझ फोटो
 6. पत्याचा दाखला
 7. मोबाईल नंबर

महत्वाच्या लिंक्स:

 1. Mharashtra Government Official Website : Click Here
 2. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना : Click Here
 3. To know more : www.mahajobs.org.in

Posts You May Like:

 • MPSC Combine Class-B Main Exam – Click Here
 • Maharashtra Krushi Sevak Recruitment 2023 – Click Here
 • Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 : Click Here
 • Maharshtra Nagarparishad Class-C Eaxm 2023 – Click Here
 • माझी कन्या भाग्यश्री योजना – Click Here

Leave a Reply