रखडला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 पहिला हप्ता : सॉफ्टवेअर च्या चाचणीचा अभाव

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना || नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संपूर्ण माहिती || महारष्ट्र सरकारी योजना || महारष्ट्र सरकार शेतकरी योजना || प्रधानमंत्रीकिसान कृषी सन्मान योजना || नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पहिला हप्ता

Namo Shetkari Mahasanman Yojna || Namo Shetkari Mahasanman Nidhi Scheme || Maharashtra Government Scheme || Maharshtra Government Scheme for Farmers

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे ?

शेतकऱ्याला शेती पिकवताना खूप आव्हानांन तोंड द्यावे लागते जसे की पिकांच्या किंमती मध्ये होणारी चढ-उतार, हवामानातील अनिश्चीतता आणि वाढत चाललेली महागाई. या आव्हानांमुळे शेतकऱ्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हिच आर्थिक अडचण काही प्रमाणत दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजने नुसार मिळणाऱ्या ६०००/- रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार हि ६०००/- रुपये देणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला वर्षाला १२०००/- रुपये रक्कम मिळेल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहे पात्रता?

 • अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा निवासी असणे गरजेचे आहे.
 • अर्ज करणारा व्यक्ती शेतकरी असणे गरजेचे आहे.
 • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे गरजेची आहे.
 • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे बँक खाते आधार ला लिंक असणे गरजेचे आहे.
 • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यास ई-केवायसी करणे गरजेचे आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना काय आहेत आवश्यक कागदपत्रे?

 • आधार कार्ड
 • बँक खाते क्रमांक
 • ७/१२ उतारा
 • मतदान कार्ड
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • पत्याचा दाखला
 • मोबाईल नंबर

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कधी येणार योजनेचा पहिला हप्ता?

नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत जवळपास ८६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना दरवर्षी ६०००/- रुपयांची मदत मिळणार आहे. दर चार महिन्यानंतर प्रतीहप्ता दोन हजार रुपयांप्रमाणे तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत निधी जमा होईल. परंतु अद्यापही या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. हि योजना लवकरात लवकर अमलात आणण्याच्या सूचना शासनाकडून दिल्या गेल्या होत्या. पहिला हप्ता ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. सुरुवातीला आर्थिक तरतूद नव्हती आणि आता संगणक प्रणाली अपूर्ण आहे असे सांगण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हि योजना कार्यान्वित होईल असे धोरण ठरविण्यात आले आहे. यासाठीच “महाआयटी” सॉफ्टवेअर च्या अंतिम चाचण्यासाठी धावपळ करत आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कशी होणार अंमलबजावणी?

केंद्र सरकार ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ अंतर्गत प्रतिवर्षी ६०००/- रुपयांची मदत करते म्हणजेच दर चार महिन्याला प्रती दिन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्र शासनाने “नमो किसान” योजना राबविण्याचा निर्णय घेतला. “पीएम किसान” योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दर चार महिन्याला दोन हजार रुपयांची मदत दिली जाते. हि मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरातून जमा होते. तीच पद्धत राज्य शासन “नमो-किसान” योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. ज्यामध्ये योजनेचे निकष व संगणकीय प्रणाली वापरली जाणार आहे. त्यादृष्टीनेच संगणकीय प्रणाली तयार करण्याचा खटाटोप “महाआयटी” करीत आहे. हि प्रणाली तयार होताच [पुढील बँकिंग प्रणालीची जबाबदारी “बँक ऑफ महाराष्ट्र” सांभाळेल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कशी आहे हप्त्यांची तरतूद?

सर्व पात्र शेतकऱ्यांना “नमो-किसान ” चा लाभ द्यायचा असल्यास राज्याच्या तिजोरीतून किमान ६ हजार ६० हजार कोटी रुपये द्यावे लागतील. सध्या केवळ चार हजार कोटींची तरतूद केलेली आहे.सॉफ्टवेअर च्या चाचण्या पूर्ण झाल्यास सध्याच्या चार हजार कोटीच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरणास कुठलीच अडचण येणार नाही. तोपर्यंत राज्य शासन उर्वरित २०६० कोटी रुपये मिळू शकतील. ज्यामधून तिसरा हप्ता सरकार देवू शकेल.

महत्वाच्या लिंक्स :

 1. Mharashtra Government Official Website : Click Here
 2. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना : Click Here
 3. To know more : www.mahajobs.org.in

Posts You May Like:

 • कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र : Click Here
 • कांदा अनुदान 2023 : Click Here
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Click Here
 • पॉली हाऊस शेडनेट योजना : Click Here
 • माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३ : Click Here

Leave a Reply