MSEDCL Vidyut Sahhayak Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भरती, विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण ५३४७ जागा

MSEDCL Vidyut Sahhayak Recruitment 2023

MSEDCL Vidyut Sahhayak Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मर्यादीत विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहायक” पदाची वेतगट-४ मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरसेवा भरती द्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पधतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या समाधानकारक काम पाहून त्या उमेदवाराला कायमस्वरूपी विभागात सामावून घेण्यात येणार आहे.

MSEDCL Vidyut Sahhayak Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

 • SSC, HSC उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सेलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेला २ वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तरतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र

वयोमर्यदा :

 • खुला वर्ग : १८ ते 27 वर्ष
 • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/खेळाडू/अनाथ : ५ वर्ष शिथिलता
 • दिव्यांग/माजी सैनिक : कमाल ४५ वर्ष
 • महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाही.

महत्वाच्या तारखा :

 • अर्ज करण्याची तारीख जानेवारी २०२४ मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल.
 • ऑनलाइन तांत्रिक क्षमता चाची फेब्रुवारी/मार्च २०२४ मध्ये घेण्यात येईल.

परीक्षेचे स्वरूप :

विषय प्रश्न गुण
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge)५०११०
तर्कशक्ती (Reasoning)४०२०
संख्यात्मक (Quantitative Aptitude)२०१०
मराठी भाषा (Marathi Language)२०१०
 • परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे
 • चुकीच्या उत्तरासाठी एकूण गुणाच्या १/४ (0.२५%) इतके गुण वजा केले जातील.

अर्ज करण्याची पद्धत

 • अर्ज करण्यासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
 • अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती भरावी.
 • त्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करावे.
 • त्यानंतर अर्ज submit करावा.
 • त्यासोबतच online परीक्षा शुल्क भरून टाकावा.

परीक्षा शुल्क

 • खुला वर्ग : 250 + GST
 • मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ : 125 + GST

मानधन

 • प्रथम वर्ष : १५०००/-
 • द्वितीय वर्ष : १६०००/-
 • तृतीय वर्ष : १७०००/-
 • तीन वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यास त्या उमेदवारास कायमस्वरूपी म्हणून रुजू करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक:

 • महावितरण अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like :

Leave a Reply