MPSC Geography Exam Pattern and Syllabus : जाणून घ्या MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत भूगोल विषयाचे विचारले जाणारे प्रश्न आणि भूगोल विषयाचा अभ्यासक्रम

MPSC Geography Exam Pattern and Syllabus

MPSC Geography Exam Pattern and Syllabus: भूगोल हा विषय सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. या विषयावर MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षा जसे की MPSC पूर्व परीक्षा, MPSC मुख्य परीक्षा, Combine Class B आणि C परीक्षा यानंतर तलाठी, जिल्हा परिषदेच्या परीक्षा एकंदरीत सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी भूदोल विषयावर १०-१५ प्रश्न विसरले जातात. या लेखात आपण भूगोल या विषयाचा परीक्षेनुसार अभ्यासक्रम कोणता आहे? यावर चर्चा करणार आहोत.

MPSC Geography Exam Pattern and Syllabus

 • MPSC पूर्व परीक्षा अभ्यासक्रम : भूगोल हा विषय तीन भागात म्हणजेच प्राकृतिक भूगोल, आर्थिक भूगोल आणि सामाजिक भूगोल विभागल्याचे आपल्याला आढळून येते. भूगोल या विषयावर या परीक्षेत साधारणतः १०-१२ प्रश्न विचारले जातात. सर्वात जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. १-२ प्रश्न हे भारता आणि जगाच्या भोगोलावर विचारले जातात. प्रश्न खाली दिलेलेल्या टॉपिक वर विचारले जातात:
  • Maharashtra, India and World Geography
  • Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World.
 • MPSC मुख्य परीक्षा अभ्यासक्रम : MPSC च्या मुख्य परीक्षा एकूण २०२५ दुनांची होते. यामध्ये लेखी परीक्षेसाठी १७५० गुण तर मुलाखतीसाठी २७५ गुण असतात. लेखी परीक्षा जी १७५० गुणांसाठी घेतली जाते त्या परीक्षेसाठी एकूण ९ पेपर असतात. त्यांपैकी ७ compulsory असतात टी बाकी २ पेपर हे वैकल्पिक असतात. Compulsory पेपरपैकी पेपर नंबर -४ या पेपर मध्ये इतिहास आणि भूगोल या विषयांवर प्रश्न विचारले जातात. या पेपरसाठी भूगोल विषयाचा अभ्यासक्रम खाली दिल्याप्रमाणे आहे:
  • जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये
  • जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यासह)
  • जगातील विविध भागातील प्राथमिक,द्वितीय व तृतीय औद्योगिक शेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतसह)
  • भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रीय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या बुप्रकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्या बदल व अशा बदलांचा परिणाम
 • तसेच वैकल्पिक विषयांमध्ये ही भूगोल हा एक विषय स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा aspirant निवडू शकतो. या विषयामध्ये भूगोल विषयाचे दोन पेपर असतात. त्या पेपर साठी असलेला अभ्यासक्रम खाली देण्यात आलेला आहे:
  • भूगोल विषयाची तत्वे : (पेपर – १)
  • प्राकृतिक भूगोल
   • भूरुपशास्त्र: भूरूप विकासावर नियंत्रण ठेवणारे घटक; अंतर्जात आणि बहिर्जात बले; पृथ्वीच्या कवचाची उत्पत्ती आणि उत्क्रांती; भू-चुंबकत्वाची मुलभूत तत्वे; पृथ्वीच्या अंतरंगातील प्राकृतिक स्थिती; भूअभीनती; भूखंड वहन; समस्थायित्व; भूपट्ट वीवर्तनिकी; पर्वत निर्माणावरील अलीकडची मते; ज्वालामुखी क्रिया, भूकंप आणि त्सुनामी; भूरूपिक चक्र आणि विकासाची संकल्पना; अनाच्छादन कालानुक्रम; प्रवाह रूपिकी; अपरक्षण पृष्ठभाग; उतार विकास; उपयोजित भूरुपशास्त्र; आर्थिक भूशास्त्र आणि पर्यावरण
   • हवामानशास्त्र: तापमान आणि जागतिक दाब पट्टे; पृथ्वीचा औष्णिक ताळेबंद; वातावरणीय अभिसरण; वातावरणीय स्थिरता आणि अस्थिरता; ग्राहीय आणि स्थानिक वारे; मान्सून आणि जेट प्रवाह; वायुराशी आणि आघाडी / सीमा समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय चक्रीय वादळे; वृष्टीचे प्रकार आणि वितरण; हवा आणि हवामान; कोपेन, Tharnthvet आणि त्रिवार्थ यांचे जागतिक हवामान विषयक वर्गीकरण; जलचक्र; जागतिक हवामानातील बदल आणि हवामानातील बदल संबंधात मानवाची भूमिका आणि प्रतिसाद; उपयोजित हवामानशास्त्र आणि नागरीक हवामान
   • सागरविज्ञान: अटलांटिक, हिंदी आणि पॅसीपीक महासाग्रांची तळरचना; महासागरांचे तापमान आणि क्षारता; उष्णता आणि क्षार ताळेबंद; सागरीय निक्षेप; लाटा, प्रवाह आणि बहर्ती-ओहोटी; सागरी साधनसंपत्ती; जैव, खनिज आणि उर्जा साधनसंपत्ती; प्रवाळ, प्रवाळ विरंजन; सागर-पातळीतील बदल; सागरी कायदे आणि सागरी प्रदूषण
   • जीवभूगोलशास्त्र: मृदांची उत्पत्ती; मृदांचे वर्गीकरण आणि वितरण; मृदाछेद, मृदेची धूप, ऱ्हास व संधारण वनस्पती आणि प्राण्यांच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक; निर्वणीकरण समस्या आणि संधारणाचे उपाय; सामाजिक वनीकरण; कृषी वनीकरण; वन्यजीव; प्रमुख जीन संचय केंद्रे
   • पर्यावरण भूगोल: परिस्थितिकी तत्वे; मानवी परिस्थितिकीय अनुकूलन: परिस्थितिकी आणि पर्यावरणावर मानवाचा प्रभाव; वैश्विक आणि प्रादेशिक परिस्थितिकीतील बदल आणि असंतुलन; परिसंस्था आणि त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन; पर्यावरणीय ऱ्हास; व्यवस्थापन आणि संवर्धन; जैव विविधता आणि शाश्वत विकाई, पर्यावरणीय धोरण, पर्यावरणीय धोके आणि सुधरात्मक उपाययोजना; पर्यावरणीय शिक्षण आणि कायदे
  • मानवी भूगोल :
   • मानवी भूगोलातील पारीप्रेक्ष्य: क्षेत्रीय विभिन्नता; प्रादेशिक संश्लेषण; द्विभाजन आणि द्वैतवाद, पर्यावरणवाद; सांखिकी क्रांती आणि स्थानीय विश्लेषण; मुलगानी, वर्तनाधिष्टीत मानवी आणि कल्याणकारी दृष्टिकोन; भाषा, धर्म आणि धर्मनिरपेक्षता; जागतिक सांस्कृतिक प्रदेश; मानव विकास निर्देशांक
   • आर्थिक भूगोल: जागतिक आर्थिक विकास; मापन आणि समस्या; जागतिक साधनसंपत्ती आणि तिचे वितरण; ऊर्जा संकट; वृद्धी मर्यादा; जागतिक कृषी, कृषी प्रदेशांचे प्रकारनिष्ठ वर्गीकरण, कृषी निविष्ठा आणि उत्पादकता; अन्न व पोषण समस्त्य; दुष्काळ: कारणे, परिणाम आणि उपाययोजना: जागतिक उद्योग; स्थानीय प्रारूप आणि समस्या; जागतिक व्यापाराचा आकृतिबंध
   • लोकसंख्या आणि वसाहत भूगोल: जागतिक लोकसंख्या वाढ आणि वितरण; लोकसंख्यास्त्रीय वैशिष्ठे; स्थानातरणाची कारणे आणि परिणाम; अतिरिक्त-न्यूनतम आणि पर्याप्त लोकसंख्या संकल्पना, लोकसंख्या सिधांत, जागतिक लोकसंखेच्या समस्या आणि धोरणे; सामाजिक स्वास्थ्य आणि जीवनमानाचा दर्जा; लोकसंख्या एक सामाजिक भांडवल, ग्रामीण वसाहतीचे प्रकार आणि आकृतीबंध; ग्रामीण वसाहतींमधील पर्यावरणीय समस्या; नागरी वसाहतीचे प्रकार व पर्यावरणीय समस्या; नागरी वसाहतीचे श्रेणीक्रम; नागरी भूरूपवर्णन; अग्रेसर सहारांची संकल्पना आणि श्रेणी- आकार नियम; नगरांचे कार्य वर्गीकरण; नागरी प्रभाव क्षेत्र, ग्रामीण-नागरी पत्ते, उपग्रह नागरे, नागरीकरणाच्या समस्या आणि उपाययोजना; शहरांचा शाश्वत विकास
   • प्रादेशिक नियोजन: प्रदेशची संकल्पना, प्रदेशांचे प्रकार आणि प्रदेशिकीकरणाच्या पद्धती; वृष्दही केंद्रे आणि वर्धन केंद्रे; प्रादेशिक असमतोल; प्रादेशिक विकासाचू व्यूहरचना; प्रादेशिक नियोजनामधील पर्यावरणीय समस्या; शाश्वत विकासासाठी नियोजन
   • मानवी भूगोलातील प्रतिमाने, सिधांत आणि कायदे: मानवी भूगोलातील संस्थात्मक विश्लेषण, माल्थस, मार्क्स आणि लोकसंख्यस्त्रीय संक्रमण प्रतिमाने; ख्रिस्तीलर आणि लॉश याचे केंद्रस्थान सिधांत; पेरॉक्स आणि बॉडविले यांचे सिध्दांत; वॉन थूनेनचे कृषी स्थान प्रतिमान; वेबरचे औद्योगिक स्थान प्रतिमान, ओस्टॉव्हचे वृद्धी टप्प्यांचे प्रतिमान, मर्मभूमी व परिधिभूमी सिध्दांत; आंतरराष्ट्रीय सीमा आणि सीमा प्रदेश संबंधातील कायदे
  • भारताचा भूगोल: ( पेपर-दोन)
   • प्राकृतिक रचना :  भारताचे शेजारील देशाशी स्थलीय संबंध,  संरचना आणि उठाव;  जल निसर्ग प्रणाली आणि पाणलोट क्षेत्र;  प्राकृतिक प्रदेश;  भारतीय मानसून यंत्रणा आणि पर्जन्यमान स्वरूप;  उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि पश्चिम विक्षोप;  पूर आणि अवर्षण;  हवामान प्रदेश,  नैसर्गिक वनस्पती;  मृदांचे प्रकार आणि वितरण.
   • साधन संपत्ती:  जमीन, पृष्ठभाग आणि भूजल;  ऊर्जा खनिजे,  जैविक आणि सागरी साधन संपत्ती,  वन व वन्यजीव साधन संपत्ती आणि त्यांचे संवर्धन,  ऊर्जा संकटे
   • कृषी:  पायाभूत सुविधा;  जलसिंचन,  बी-बियाणे,  खते, वीज,  संस्थात्मक घटक;  जमीन धारणा,  भूपट्टेदारी आणि जमीन सुधारणा;  पीक पद्धती,  कृषी उत्पादकता,  कृषी तीव्रता,  पीक संयोजन,  जमीन क्षमता;  कृषी सामाजिक वनीकरण;  हरितक्रांती आणि तिचे सामाजिक आर्थिक पर्यावरणीय परिणाम;  कोरडवाहू शेतीचे महत्व;  पशुधन साधनसंपत्ती आणि श्वेतक्रांती;  जलीय संवर्धन,  रेशीम उत्पादन,  कृषी आणि कुक्कुटपालन;  कृषी प्रादेशिकीकरण;  कृषी हवामान क्षेत्र;  कृषी परिस्थितीकीय प्रदेश
   • उद्योग:  औद्योगिक क्रांती;  कापूस,  ताग,  वस्त्र निर्माण,  लोह आणि पोलाद,  ॲल्युमिनियम,  खते,  कागद,  रसायने आणि औषध निर्माण,  स्वयंचलित,  कुटिरोदयोग  आणि कृषी आधारित उद्योग यांचे स्थान निश्चितीचे घटक;  सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह  उद्योगगृहे आणि संकुले;  औद्योगिक प्रादेशिकीकरण;  नवीन औद्योगिक नियम धोरण;  बहुराष्ट्रीय निगम आणि उदारीकीकरण;  विशेष आर्थिक क्षेत्रे;  पर्यावरण स्नेही पर्यटन
   • वाहतूक, दळणवळण आणि व्यापार:  रस्ते,  रेल्वे,  जलमार्ग,  हवाई मार्ग  आणि नलिका मार्गाचे जाळे आणि प्रादेशिक विकासामधील त्यांची पूरक भूमिका;  राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय व्यापाराबाबत बंदरांचे वाढते महत्त्व,  व्यापारशेष;  व्यापार धोरण;  निर्यात प्रक्रिया क्षेत्र,  दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानामधील विकास आणि अर्थव्यवस्था आणि समाजावर होणारे त्याचे परिणाम;  भारतीय अंतराळ कार्यक्रम
   •  सांस्कृतिक जडणघडण:  भारतीय समाजाचे ऐतिहासिक पैलू;  वांशिक,  भाषिक  आणि मानव वंशीय;  विभिन्नता;  धार्मिक अल्पसंख्यांक;  प्रमुख जमाती,  जमातींचे क्षेत्रे आणि त्यांच्या समस्या;  सांस्कृतिक प्रदेश;  लोकसंख्येची वाढ,  वितरण आणि घनता;  लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये:  लिंग गुणोत्तर,  वय संरचना,  साक्षरता दर,  श्रमिक पथक;  अवलंबता गुणोत्तर,  आयुर्मान,  स्थलांतर( आंतर प्रादेशिक, प्रदेशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय)  आणि  त्या संबंधित समस्या;  लोकसंख्येच्या समस्या आणि धोरणे,  आरोग्य निर्देशांक
   • वसाहती:  ग्रामीण वसाहतींचे प्रकार,  आकृतीबंध आणि भूरूप वर्णन;  नगर विकास;  भारतीय शहरांचे भूरूप वर्णन;  भारतीय शहरांचे कार्यात्मक वर्गीकरण;  बृहन महानगरी प्रदेश आणि महानगरी प्रदेश;  नागरी प्रसरण;  झोपडपट्टी आणि त्या संबंधित  समस्या;  नगर नियोजन;  नागरीकरणाच्या समस्या आणि उपाययोजना
   • प्रादेशिक विकास आणि नियोजन;  भारतातील प्रादेशिक नियोजनाचा अनुभव;  पंचवार्षिक योजना;   एकात्मिककृत ग्रामीण विकास कार्यक्रम;  पंचायती राज आणि विकेंद्रीत नियोजन;  लाभक्षेत्र विकास;  पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन,  मागास क्षेत्र,  वाळवंट,  अवर्षण प्रवन,  डोंगरी आदिवासी क्षेत्र विकासासाठी नियोजन;  बहुस्तरीय नियोजन;  बेट भूप्रदेशांचे प्रादेशिक नियोजन आणि विकास
   •  राजकीय पैलू:  भारतीय संघराज्यवादाचा भौगोलिक आधार;  राज्य पुनर्रचना;  नवीन राज्यांचा उदय;  प्रादेशिक जाणीव आणि आंतरराज्य समस्या;  भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्यांच्या संबंधातील समस्या;   सीमेपलीकडील दहशतवाद;  जागतिक कारभारामधील भारताची भूमिका,  दक्षिण आशिया आणि भारतीय महानगर भूराजनीती
   • समकालीन समस्या:  परिस्थितीकीय समस्या;  पर्यावरणीय धोके;  भूस्खलन,  भूकंप,  त्सुनामी,  पूर आणि दुष्काळ,  महामारी;  पर्यावरणीय प्रदूषणाशी संबंधित समस्या,  जमीन वापराच्या पद्धतीतील बदल;  पर्यावरणीय प्रभाव परीक्षणाची आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाची तत्वे;  जनसंख्या विस्फोट आणि अन्नसुरक्षा;  पर्यावरणीय  रहास;  निर्वणीकरण,  वाळवंटीकरण आणि मृदेची धूप;  शेतजमीन विषयक समस्या आणि औद्योगिक अशांतता;  आर्थिक विकासामधील प्रादेशिक विषमता;  शाश्वत वृद्धी आणि विकासाची संकल्पना;  पर्यावरणीय जागरूकता;  नद्यांची जोडणी;  जागतिकीकरण आणि भारतीय अर्थव्यवस्था 
 • MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा (गट-ब व गट-क) : MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा (गट-ब व गट-क) पूर्व परीक्षा ही १०० मार्कांसाठी घेतली जाते यापरीक्षेत भूगोल या विषयावर १२-१५ प्रश्न विचारले जातात. जास्त प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारले जातात. त्यासाठीच अभ्यासक्रम खाली देण्यात आलेला आहे:
  • महाराष्ट्राच्या भूगोलाचे विशेष अभ्यासासह-  पृथ्वी,  जगातील विभाग,  हवामान,  अक्षांश रेखांश,  महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,  पर्जन्यमान,  प्रमुख पिके,  शहरे,  नद्या,  उद्योगधंदे इत्यादी
 • MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा (गट-ब व गट-क) : MPSC अराजपत्रित सेवा परीक्षा (गट-ब व गट-क) मुख्य परीक्षेसाठी खालील अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले जातात:
  • महाराष्ट्राच्या भूगोलाचे विशेष अभ्यासासह-  पृथ्वी,  जगातील विभाग,  हवामान,  अक्षांश रेखांश,  महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,  पर्जन्यमान,  प्रमुख पिके,  शहरे,  नद्या,  उद्योगधंदे इत्यादी
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल-  भारतात महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल,  मुख्य प्राकृतिक विभाग,  हवामान शास्त्र,  पर्जन्यमान व तापमान,  पर्जन्यातील विभागावर बदल,  नद्या,  पर्वत व पठार,  विविध भूरूपे,  राजकीय  विभाग,  प्रशासकीय विभाग,  नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे,  मानवी व सामाजिक भूगोल,  लोकसंख्या,  लोकसंख्येचे स्थान अंतर व त्यांचे उगम  आणि इष्ट स्थानावरील परिणाम,  ग्रामीण वस्त्या व तांडे,  झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न
  •  पर्यावरण-  मानवी विकास व पर्यावरण,  पर्यावरण पूरक विकास,  नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण  विशेषतः वनसंधारण,  विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती,  पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र / जागतिक पातळीवरील संस्था व संघटना इत्यादी

महत्त्वाच्या लिंक्स:

MPSC official Website : Click Here

MPSC Syllabus : Click Here

To Know More : Click Here

Posts You May like:

MPSC Lecturer Recruitment : Click Here

MPSC Assistant Professor Recruitment : Click Here

Leave a Reply