MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 (महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ पदभरती 2023) : पदसंख्या 149, Online Application

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023

MPSC 2023 || MPSC Notification 2023 || MPSC Abiyantriki Shikshak Bharti 2023 || MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 || MPSC Engineering Services 2023 ||

महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ पदभरती 2023 || MPSC अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ पदभरती 2023 || MPSC जाहिरात 2023 || महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही राज्यातील सरकारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना कलम ३१५ नुसार करण्यात आली आहे. MPSC महाराष्ट्र राज्यात नागरी सेवा अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करते. या परीक्षेद्वारे प्रशासन, पोलीस, अभियांत्रिकी, मंत्रालय, वन यांसारख्या विविध पदांची भरती केली जाते. आज आपण अशाच एका परीक्षेच्या जाहिरातीविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचवा.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय अबियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट – अ MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 Class-A या संवर्गातील पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उपलब्ध पदसंख्या हि 149 इतकी आहे.

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 तपशील :

परीक्षेचे नाव महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट – अ ( MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 Class-A)
पदसंख्या 149
अर्ज भरण्यास सुरुवात 05 सप्टेंबर 2023
अर्ज भरण्यास शेवट 25 सप्टेंबर 2023
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 27 सप्टेंबर 2023
भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख29 सप्टेंबर 2023 (बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये)
Official Website https://mpsc.gov.in/

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 वयोमर्यादा :

 1. खुला वर्ग : किमान १९ वर्ष ते कमाल ३८ वर्ष
 2. मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ : किमान १९ वर्ष ते कमाल ४३ वर्ष
 3. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी अराखीव (खुला) आणि मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ : सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे
 4. दिव्यांग : किमान १९ वर्ष ते कमाल ४५ वर्ष

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 शैक्षणिक पात्रता :

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 या परीक्षेसाठी खाली दिल्या प्रमाणे पात्रतेची आवश्यकता आहे:

 1. B.E./B.Tech/B.S. and M.E./M.Tech/M.S. or Integrated M.Tech in relevant branch with first class or equivalent either in any one of the degrees.

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 परीक्षा शुल्क :

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 या परीक्षेसाठी खाली दिल्या प्रमाणे परीक्षा शुल्क आकारण्यात येईल:

 1. खुला वर्ग : रुपये ३९४/-
 2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग : रुपये २९४/-

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 अर्ज करण्याची पद्धत :

 1. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
 2. अर्ज करण्यासाठी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला https://mpsconline.gov.in/ भेट देणे आवश्यक आहे.
 3. ज्या उमेदवारांनी या अगोदर नोंदणी केली नसेल त्यांनी अगोदर नोंदणी करून घ्यावी.
 4. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी login ID आणि पासवर्ड टाकून login करावे.
 5. संबंधित परीक्षा निवडून फॉर्म सबमिट करावा.
 6. फॉर्म सबमिट झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणार असाल तर ते भरून घ्यावे.
 7. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे असल्यास चलनाची प्रिंट काढून घ्यावी व भारतीय स्टेट बँकेमध्ये जाऊन शुल्क विहित दिनांकाच्या अगोदर जमा करावे.

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 निवड प्रक्रिया :

 1. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये अगोदर चाळणी परीक्षा घेण्यात येईल.
 2. चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांवरून उमेद्वास मुलाखतीस बोलावण्यात येईल.
 3. चाळणी परीक्षा व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांवरून उमेदवाराची निवड केली जाईल.
 4. मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांची शिफारस केली जाईल.

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 वेतनश्रेणी :

वेतनस्तर रुपये ५७,७००/- (सुरुवातीचे वेतन) अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 भरली जाणारी पदे :

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 या परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे पदे व संख्येनुसार भरली जाणार आहेत :

 1. स्थापत्य अभियांत्रिकी – 36
 2. यंत्र अभियांत्रिकी – 08
 3. विद्युत अभियांत्रिकी – 18
 4. संगणक अभियांत्रिकी – 22
 5. अणुविद्युत व दुरसंचारण अभियांत्रिकी – 21
 6. उपयोजित यंत्रशास्त्र – 01
 7. पदार्थ विज्ञान – 07
 8. रसायन शास्त्र – 05
 9. गणित – 09
 10. इंग्रजी – 08
 11. Food Technology and Management – 02
 12. कर्मशाळा अधीक्षक – 06
 13. धातुशास्त्र – 04
 14. M.C.A. – 02

MPSC Engineering Lecturer Recruitment 2023 महत्वाच्या लिंक्स :

Official WebsiteClick Here
MPSC Online ApplicationClick Here
Notification PDFClick Here
To Know MoreClick Here

Posts You May Like:

 1. आरोग्य विभाग भरती 2023 : Click Here
 2. MAHATRANSCO Recruitment 2023 : Click Here
 3. Mumbai Municipal Corporation Junior Stenographer Recruitment 2023 : Click Here

Leave a Reply