Advertisement for MPSC Combine Class-B Main Exam-2022: महाराष्ट्र दुय्यम अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२२ जाहिरात

MPSC Combine Class-B

MPSC Combine Class-B Advertisement 2023 || MPSC Combine Class-B Main Exam 2023 Application Forms || MPSC Combine Class-B Apply Online || MPSC Exams 2023 || MPSC Exam Syllabus || MPSC Combine Class-B Main Exam Syllabus 2023

MPSC दुय्यम अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा २०२२ || महाराष्ट्र दुय्यम अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा जाहिरात || MPSC दुय्यम गट ब Apply Online || MPSC परीक्षा Syllabus || MPSC दुय्यम गट ब मुख्य परीक्षा Syllabus 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना १ मे १९६० रोजी भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य करते. आयोग राजपत्रित अ अराजपत्रित अश्या दोन प्रकारच्या अधिकाऱ्यांची भरती करते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ जुन २०२२ रोजी दुय्यम अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा जाहीर केली होती. त्यानुसार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल ११ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर करण्यात आला असून १८ ऑगस्ट २०२३ पासून मुख्य परीक्षेसाठीचे अर्ज मागवण्यात येत आहेत. या परीक्षेमार्फत सहायक कक्ष अधिकारी, राज्यकाश कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-१/मुद्रांक निरीक्षक संवर्ग पदासाठी ८२३ उमेदवार भरले जाणार आहेत.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा तपशील:

तपशील कालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१८ ऑगस्ट २०२३ ते ०१ सप्टेंबर २०२३
परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक०१ सप्टेंबर २०२३
स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक०३ सप्टेंबर २०२३
चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी चा अंतिम दिनांक०४ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा वयोमर्यादा:

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा वयोमर्यादा हि पदानुसार व प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. त्याचा तपशील खाली दिल्या प्रमाणे आहे.

 1. मंत्रालयीन व आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी :
  • अमागास : किमान – १८ वर्षे, कमाल – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./प्राविण्य प्राप्त खेळाडू/माजी सैनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी : किमान – १८ वर्षे, कमाल – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार : किमान – १८ वर्षे, कमाल – ४५ वर्षे
 2. राज्य कर अधिकारी :
  • अमागास : किमान – १९ वर्षे, कमाल – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./प्राविण्य प्राप्त खेळाडू/माजी सैनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी : किमान – १८ वर्षे, कमाल – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार : किमान – १८ वर्षे, कमाल – ४५ वर्षे
 3. पोलीस उप निरीक्षक :
  • अमागास : किमान – १९ वर्षे, कमाल – ३१ वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ. : किमान – १८ वर्षे, कमाल – ३४ वर्षे
  • माजी सैनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी : किमान – १८ वर्षे, कमाल – ३६ वर्षे
 4. दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक :
  • अमागास : किमान – १८ वर्षे, कमाल – ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./प्राविण्य प्राप्त खेळाडू/माजी सैनिक/आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी : किमान – १८ वर्षे, कमाल – ४३ वर्षे
  • दिव्यांग उमेदवार : किमान – १८ वर्षे, कमाल – ४५ वर्षे

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब (MPSC Combine Class-B) मुख्य परीक्षा शैक्षणिक पात्रता :

 1. संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
 2. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
 3. मुख्य परीक्षेकरिता अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांक उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
 4. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवारांची किमान शारीरिक अर्हता खालील प्रमाणे आहे.
  • पुरुष :
   • उंची – १६५ सें. मी.(अनवाणी)(कमीत कमी)
   • छाती – न फुगीवता ७९ सें. मी. फुगविण्याची क्षमता
  • महिला :
   • उंची – १५७ सें.मी. (अनवाणी)(कमीत कमी)

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा शुल्क:

 • अमागास : रु. ५४४/-
 • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ दिव्यांग – रु. ३४४/-

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षेचे टप्पे:

 • मुख्य परीक्षा – ४०० गुण
 • फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी – १०० गुण, मुलाखत – ४० गुण

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी:

फक्त पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाईल. शारीरिक चाचणी मध्ये ६० % गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. मुलाखत हि ४० गुणांची असेल. शारीरिक चाचणी साठीच तपशील खाली दिल्या प्रमाणे असेल :

पुरुषमहिला
गोळाफेक – ७.२६० KG कमाल गुण – १५गोळाफेक – ४ KG कमाल गुण – २०
पूल अप्स – कमाल गुण – २०धावणे (४०० मी ) – कमाल गुण – ५०
लांब उडी – कमाल गुण – १५लांब उडी – कमाल गुण – ३०
धावणे० (८०० मी ) – कमाल गुण – ५०

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा :

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा खालील प्रमाणे घेण्यात येणार आहे.

परीक्षावार व दिनांकजिल्हा केंद्र
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२२ संयुक्त पेपर क्रमांक – १ रविवार, ०१ ऑक्टोबर २०२३ अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२२ पेपर क्रमांक – २ दुय्यम निबंधक श्रेणी – १ /मुद्रांक निरीक्षक शनिवार, ०७ ऑक्टोबर २०२३अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२२ पेपर क्रमांक – २ राज्य कर निरीक्षकशनिवार, १४ ऑक्टोबर २०२३अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२२ पेपर क्रमांक – २ सहायक कक्ष अधिकारीरविवार, २२ ऑक्टोबर २०२३ अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२२ पेपर क्रमांक – २ पोलीस उप निरीक्षकरविवार, २९ ऑक्टोबर २०२३ अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे

महत्वाच्या लिंक्स :

Posts You May Like :

 • महाराष्ट्र कृषी सेवक पदभरती २०२३ : Click Here
 • महाराष्ट्र नगरपरिषद पदभरती २०२३ : Click Here
 • महाराष्ट्र ZP भरती २०२३ : Click Here

Leave a Reply