Mini Tractor Anudan Yojana : मिनी ट्रॅक्टरसाठी  मिळणार तीन लाखाचे अनुदान, दरवर्षी 50 बचत गटांची होते निवड

Mini Tractor Anudan Yojana

Mini Tractor Anudan Yojana : राज्य सरकार नेहमी राज्यातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यापैकीच एका योजनेची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने 90% अनुदानावर वाटप केले जातात. दरवर्षी 50 बचत गटांची या योजनेसाठी निवड केली जाते. ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे.

Mini Tractor Anudan Yojana काय आहे?

अनुसूचित जाती व बौद्ध घटकातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर पॉवर टिलर चा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने(कल्टीव्हेटर) किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे.

Mini Tractor Anudan Yojana उद्देश

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे. त्यांचे राहणीमानात बदल व्हावा या उद्देशाने सदरची योजना 6 डिसेंबर 2012 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यात येते.

Mini Tractor Anudan Yojana लाभ कोणाला मिळणार

 • जे बचत गट नोंदणीकृत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
 • असे बचत गट ज्यामध्ये ८०१% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे असावेत.

Mini Tractor Anudan Yojana अटी

 • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
 • या योजनेचा लाभ  घेण्यासाठी बचत गट नोंदणीकृत असावा व नोंदणी प्रमाणपत्र जोडावे
 • बचत गटात किमान दहा सदस्य असावेत.
 • बचत गटातील सर्व सदस्य महाराष्ट्राचे रहिवासी असावेत  त्याबाबत स्वयंघोषणापत्र विहित नमुन्यात सादर करावे.
 • बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांचे असावेत त्याबाबत जातीचे दाखले सादर करावे.
 • मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमल मर्यादा रुपये 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख 50 हजार) इतकी राहील स्वयंसहायता बचत  गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या दहा टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90% म्हणजेच 3.15 लाख शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
 • ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटाची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल 

Mini Tractor Anudan Yojana कागदपत्रे

 • बचत गटाचे माविम, आत्मा कृषी विभाग, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अभियान अंतर्गत बचत गटाची नोंदणी झाल्याबाबत नोंदणी प्रमाणपत्र
 •  बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्याबाबत पासबुकची छायांकित प्रत
 •  बचत गटातील अध्यक्ष सचिवासह किमान 80 टक्के सदस्यांचे जातीचे दाखले
 •  बचत गटातील सदस्यांचे रहिवाशी दाखले किंवा स्वयंघोषणापत्र
 •  बचत गटातील सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड
 •  बचत गट स्थापनेचा ठराव तसेच मिनी ट्रॅक्टर मिळवण्यासाठी सर्व  सदस्यांचा ठराव
 •  बचत गटांची बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी
 •  बचत गटातील सर्व सदस्यांचा बैठकीचा एकत्रित छायाचित्र

Mini Tractor Anudan Yojana काय मिळणार

Mini Tractor Anudan योजनेंतर्गत नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने(कल्टीव्हेटर) किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर साठी 90% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाईल.

Mini Tractor Anudan Yojana अर्ज करण्याची पद्धत

Mini Tractor Anudan Yojana अंतर्गत बचत गट संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील.

महत्वाच्या लिंक्स

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Mini Tractor Anudan Yojana कोणी सुरु केली?

Mini Tractor Anudan Yojana राज्य सरकारने सुरु केली आहे

Mini Tractor Anudan Yojana केव्हा सुरु केली?

Mini Tractor Anudan Yojana राज्य सरकारने 6 डिसेंबर 2012 सुरु केली आहे

Mini Tractor Anudan Yojana योजना कोनासाठी सुरु करण्यात आली आहे?

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्यासाठी

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे?

 • जे बचत गट नोंदणीकृत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
 • असे बचत गट ज्यामध्ये ८०१% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे असावेत.

या योजनेंतर्गत काय लाभ मिळणार आहे?

Mini Tractor Anudan योजनेंतर्गत नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने(कल्टीव्हेटर) किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर साठी 90% अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाईल.

Posts You May Like

Leave a Reply