MIDC Recruitment 2023 Notification : Apply Online, Vacancies 802 (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२३ )

MIDC Recruitment 2023 Notification

MIDC Recruitment 2023 Notification : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी संरचनाकार, उप रचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत किंवा यांत्रिकी), लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखपाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – 2), वीजतंत्री (श्रेणी – 2), पंपचालक (श्रेणी – 2), जोडारी (श्रेणी – 2), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहाय्यक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्रचालक, अग्निशमन विमोचक व विजतंत्री (श्रेणी – 2) ऑटोमोबाईल ही पदे सरळ सेवेने भरण्याकरिता उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांनी अर्ज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. अर्ज करण्याची तारीख ०२ सप्टेंबर २०२३ ते २५ सप्टेंबर २०२३ आहे.

MIDC Recruitment 2023 Notification परीक्षा तपशील :

परीक्षेचे नाव महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ गट अ, ब आणि क भरती
एकूण पदे ८०२
अर्ज करण्याची तारीख०२ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची अंतिम तारीख२५ सप्टेंबर २०२३
प्रवेशपत्रपरीक्षेच्या ७ दिवस आधी
Official Websitewww.midcindia.org

MIDC Recruitment 2023 Notification भरली जाणारी पदे :

कार्यकारी अभियंता (स्थापत्य)3
उपअभियंता (स्थापत्य)13
उपअभियंता (विद्युत/यांत्रिकी)3
सहयोगी रचनाकार2
उप रचनाकार2
उपमुख्यलेखा अधिकारी2
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)107
सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)21
सहाय्यक रचनाकार7
सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ2
लेखा अधिकारी3
क्षेत्र व्यवस्थापक8
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)17
कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)2
लघुलेखक उच्च श्रेणी 14
लघुलेखक निम्न श्रेणी 20
लघु टंकलेखक7
सहायक3
लिपिक टंकलेखक66
वरिष्ठ लेखपाल6
तांत्रिक सहाय्यक (श्रेणी – २)32
विज्ञान द्विजतंत्री (श्रेणी – २)18
पंपचालक (श्रेणी – २)103
जोडारी (श्रेणी – २)34
सहाय्यक आरेखक9
अनुरेख49
गाळणी निरीक्षक2
भूमापक26
विभागीय अग्निशमन अधिकारी1
सहाय्यक अग्निशमन अधिकारी8
कनिष्ठ संरचना अधिकारी2
वीजतंत्री (श्रेणी – २) ऑटोमोबाईल1
चालक यंत्र चालक22
अग्निशामन विमोचक१८७
MIDC Recruitment 2023 Notification

MIDC Recruitment 2023 Notification वयोमर्यादा :

 • खुला वर्ग :
  • गट अ व ब : किमान वय २१ वर्षे ते कमाल वय ३८ वर्षे
  • गट क : किमान वय १८ वर्षे ते कमाल वय ३८ वर्षे
 • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/अराखीव खुला (प्राविण्य प्राप्त खेळाडू) :
  • गट अ व ब : किमान वय २१ वर्षे ते कमाल वय ४३ वर्षे
  • गट क : किमान वय १८ वर्षे ते कमाल वय ४३ वर्षे
 • माजी सैनिक (अराखीव खुला) – ३८+ सशस्त्र दलातील सेवा कालावधी + 3 वर्षे
 • माजी सैनिक (मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग) – ४३+ सशस्त्र दलातील सेवा कालावधी + 3 वर्षे
 • दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/पदवीधर अंशकालीन – कमाल वय : ५५ वर्षे

खालील पदांसाठी वयोमर्यादा वेगळी देण्यात आलेली आहे.

पदाचे नाव किंमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ २१४५
सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क१८४०
कनिष्ठ संचार अधिकारी गट क १८४०
वीजतंत्री – श्रेणी २ (ऑटोमोबाईल) गट क१८२८
चालक यंत्र चालक गट क१८४०
अग्निशमन विमोचक गट क१८२५

MIDC Recruitment 2023 Notification अर्ज कसा करावा?

MIDC Recruitment 2023 Notification
 • अर्ज करण्यासाठी www.midcindia.org या संकेतस्थळाला भेट द्या.
 • उमेदवारांनी “सरळसेवा भरती २०२३/ Recruitment 2023” यावर क्लिक करावे.
 • नवीन नोंदणी करावी.
 • उमेदवारांनी login करून अर्ज काळजीपूर्वक भरावा.
 • शेवटी सर्व भरलेल्या माहितीची पडताळणी करून घ्यावी.
 • यानंतर पुर्ण नोंदणी वर क्लिक करावे.
 • अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे.
 • आपला फॉर्म आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावती जतन करून ठेवावी.

MIDC Recruitment 2023 Notification परीक्षा शुल्क:

MIDC Recruitment 2023 Notification साठी खालील प्रमाणे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.

 • खुला वर्ग : १०००/-
 • इतर : ९००/-
 • माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक : शुल्क आकारले जाणार नाही.

MIDC Recruitment 2023 Notification पात्रता व वेतनश्रेणी:

MIDC Recruitment 2023 Notification

MIDC Recruitment 2023 Notification पात्रता:

 1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट अ : S-२३ : ६७७००-२०८७००
  • पात्रता:
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने
   • स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान 3 वर्षाचा अनुभव तसेच पदवीधारकासाठी 7 वर्षाचा अनुभव
 2. उपअभियंता (स्थापत्य) गट-अ : S-२० : ५६१००-१७७५००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
   • स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदाविधाराकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव
 3. उपअभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट-अ : S-२० : ५६१००-१७७५००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
   • विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी विषयातील पदाविधाराकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव
 4. सहयोगी रचनाकार गट-अ : S-२3 : ६७७००-२०८७००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता
   • नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (Town Planning) किंवा Industrial Town Planning मधील पदवी/पदविका
 5. उप रचनाकार गट – अ : S-२० : ५६१००-१७७५००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता
   • नगररचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा किमान 3 वर्षाचा अनुभव
 6. उप मुख्य लेख अधिकारी गट अ : S-२० : ५६१००-१७७५००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वित्तीय व्यवस्थापनेतील (MBA)(Finance) किमान B+ किंवा तत्सम श्रेणी
 7. स्थापत्य सहाय्यक अभियंता गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी
 8. विद्युत/यांत्रिकी सहाय्यक अभियंता गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी मधील पदवी
 9. सहाय्यक रचनाकार गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तूशास्त्र/नगररचना/ या विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून
 10. सहाय्यक वास्तूशास्त्रज्ञ गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तूशास्त्र या विषयातील पदवी
 11. लेख अधिकारी गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण
 12. क्षेत्र व्यवस्थापक गट – ब : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
 13. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट – क : S – १४ : ३८६०० – १२२८००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
 14. कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) गट – क : S – १४ : ३८६०० – १२२८००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण मंडळाची विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता
 15. उच्च श्रेणी लघुलेखक गट – क : S – १५ : ४१८०० – १३२३००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर
   • राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०२ श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण
 16. उच्च श्रेणी लघुलेखक गट – क : S – १४ : ३८६०० – १२२८००
  • पात्रता :
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर
   • राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ८० श.प्र.मि. तसेच इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची १०० श.प्र.मि. तसेच इंग्रजी टंकलेखनाची ४० श.प्र.मि. व मराठी ४० श.प्र.मि. टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण
 17. लघु टंकलेखक गट क : S – ६ : १९९००-६३२००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
   • राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची ६० शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी शब्द लेखनाची ४० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी शब्द लेखनाची ४० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण
 18. सहाय्यक गट क : S-१३ : ३५४००-११२४००
  • पात्रता
   • मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
   •  सेवेत दाखल झाल्यानंतर २ वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक
 19. लिपिक टंकलेखक  गट क : S – ६ : १९९००-६३२००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
   •  राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण
   • MSCIT परीक्षा उत्तीर्ण
 20. वरिष्ठ लेखपाल गट-क : S – १४ : ३८६०० – १२२८००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी
 21. तांत्रिक सहाय्यक श्रेणी – २ गट – क : S – ८ : २५५००-८११००
  • पात्रता
   • शासकीय  किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य / अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
 22. वीजतंत्री श्रेणी – २ गट क : S – ८ : २५५००-८११००
  • पात्रता
   • शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक
 23. पंपचालक श्रेणी – २ गट क : S – ६ : १९९००-६३२००
  • पात्रता
   • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
   •  शासकीय वा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
 24. जोडारी श्रेणी – २ गट क : S – ६ : १९९००-६३२००
  • पात्रता
   • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
   • शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
 25. सहाय्यक आरेखक गट क : S – ८ : २५५००-८११००
  • पात्रता
   • महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन बारावी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
   • संगणक प्रणालीतील ऑटोकॅड प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण
   •  अनुभवास प्राधान्य
 26. अनुरेखक गट क : S – ७ : २१७००-६९१००
  • पात्रता
   • शासकीय किंवा शासनमान्य प्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेतील स्थापत्य / विद्युत / यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण
   • संगणकातील ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण
 27. गाळणी निरीक्षक गट क : S – १० : २९२०० – ९२३००
  • पात्रता
   • मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी
 28. भूमापक गट क : S – ८ : २५५००-८११००
  • पात्रता
   • शासकीय किंवा शासनमान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण
   •  संगणकातील प्रणालीचा ऑटोकॅड अभ्यासक्रम पूर्ण
 29. विभागीय अग्निशमन अधिकारी गट-अ : S-२० : ५६१००-१७७५००
  • पात्रता
   • मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
   •  गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथील बॅचलर ऑफ फायर इंजीनियरिंग अथवा ऍडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजीनियरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअर या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर ऑफ फायर इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, केमिकल, कम्प्युटर यापैकी कोणतेही एक पदवी उत्तीर्ण आवश्यक
  • अनुभव
   •  उमेदवाराला शासकीय संस्थेतील इतर अग्निशमन सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा सहमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर काम केल्याचा अनुभव असावा. तसेच त्याच्या नियंत्रणाखाली किंवा 300 अग्निशमन अधिकाऱ्यांनी कार्य केलेले असावे.
   • किमान दहा अग्निशमन केंद्रे व 30 अग्नि वाहने ज्यामध्ये रुग्णवाहिका, रेस्क्यू वाहन, विशेष कार्य हेतू वाहन व हायड्रोलिक प्लॅटफॉर्म इत्यादीचा समावेश असणाऱ्या अग्निशमन सेवेत कामाचा अनुभव आवश्यक
   • उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
  • पाठ्यक्रम
   • मेदवाराची महामंडळाच्या अग्निशमन विभागात नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर,  गृहमंत्रालय, भारत सरकार यांचे कडून प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेस अधीन राहून बॅचलर ऑफ फायर इंजीनियरिंग अथवा ऍडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजीनियरिंग तीन वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील. सदर पाठ्यक्रम विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास उमेदवार अग्निशमन विभागातील सेवेतून कार्यमुक्त केला जाण्यास पात्र ठरेल.
  • शारीरिक पात्रता :
   •  पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य
 30. सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क : S – १४ : ३८६०० – १२२८००
  • पात्रता
   • बी.एससी. भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र विषय घेऊन किमान ५० टक्के मार्काने उत्तीर्ण असावा किंवा बी.एससी. आयटी किमान ५० टक्के मार्क किंवा बी.ई. सिव्हील, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा सिव्हील, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, केमिकल यामधील कोणतीही एक पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
  • व्यावसायिक पाठ्यक्रम
   • उमेदवाराची नियुक्ती पदविका किंवा इतर पदवीच्या आधारे झाल्यास त्यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकार अथवा राज्य अग्निशमन अकादमी, महाराष्ट्र राज्य यांचे कडून प्रवेश मिळण्याच्या प्रक्रियेस अधीन राहून सब ऑफिसर्स पाठ्यक्रम ३ वर्षाच्या कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे बंधनकारक राहील सदर पाठ्यक्रम उमेदवारांनी विहीत कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण न केल्यास उमेदवार अग्निशमन विभागातील सेवेमधून कार्यमुक्त केला जाण्यास पात्र ठरेल किंवा गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांचा सब ऑफिसर्स अथवा राज्य अग्निशमन अकादमी, महाराष्ट्र राज्य यांचा सब ऑफिसर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
   • MSCIT परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • शारीरिक पात्रता :
   •  पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य
 31. कनिष्ठ संचार अधिकारी गट क : S-१३ : ३५४००-११२४००
  • पात्रता
   • बीई इलेक्ट्रिकल अँड टेलीकम्युनिकेशन किंवा बीई इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन किंवा बीई कम्प्युटर कम्युनिकेशन सह किंवा बीई रेडिओ इंजिनिअरिंग किंवा बीई इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमएससी इन्स्ट्रुमेंटेशन किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
  • अनुभव “II” गट :
   • अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास  पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट ऑथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यांसारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रेकिंग तात्रा व मल्टिपल चॅनेल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्ययावत नियंत्रण कक्ष प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर जीपीएस व्हेईकल ट्रेकिंग व तत्सम सिस्टीम उभारण्यासाठी सक्षम असावी उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • अनुभव “I” गट :
   • अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास  पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट ऑथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यांसारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रेकिंग तात्रा व मल्टिपल चॅनेल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्ययावत नियंत्रण कक्ष प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर जीपीएस व्हेईकल ट्रेकिंग व तत्सम सिस्टीम उभारण्यासाठी सक्षम असावी उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा ५ ते ७ वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • शारीरिक पात्रता :
   •  पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य
 32. वीजतंत्री श्रेणी २ ऑटोमोबाईल गट क : S – ८ : २५५००-८११००
  • पात्रता
   • माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण
   • शासनमान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियन चा कोर्स पूर्ण केलेला असावा.
   • वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये.
  • शारीरिक पात्रता :
   • पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य
 33. चालक यंत्रचालक गट क : S – ७ : २१७००-६९१००
  • पात्रता
   • माध्यमिक शाळात परीक्षा उत्तीर्ण.
   • वाहनचालक या पदावर 3 वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक.
   • व इतर जड वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक.
   • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • शारीरिक पात्रता :
   • पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य
 34. अग्निशमन विमोचक गट क : S – ६ : १९९००-६३२००
  • पात्रता
   • माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
   • राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
   • एम एस सी आय टी परीक्षा अथवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
   • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • शारीरिक पात्रता :
   • पुरुष उमेदवारासाठी किमान उंची १६५ सेंटीमीटर महिला उमेदवारंसाठी उंची १५७ सेंटीमीटर अनवाणी
   • छाती पुरुषांसाठी एक ८१ सेंटीमीटर न फुगवता ८६ सेंटीमीटर फुगवून महिला उमेदवारासाठी लागू नाही.
   • पुरुषांसाठी किमान वजन ५० किलोग्रॅम तर महिलांसाठी ४६ किलोग्रॅम
   • दृष्टी सामान्य

MIDC Recruitment 2023 Notification महत्वाच्या लिंक्स:

Posts You May Like :

 • NABARD Assistant Manager Grade A Recruitment 2023 : Click Here
 • Maharashtra Krushi Sevak Bharti : Click Here
 • आरोग्य विभाग भरती 2023 : Click Here

Leave a Reply