MGNREGA Yojana 2023 : मनरेगा योजना 2023, जाणून घ्या संपूर्ण माहिती, जॉब कार्ड कसे काढावे?

MGNREGA Yojana 2023

MGNREGA Yojana 2023 : मान्सून ची अनियमितता आणि वारंवार पडणारा दुष्काळ हा राज्यातील सरकारसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. दुष्काळाच्या स्थितीमुळे राज्याच्या ग्रामीण भागात अन्न, रोजगार आणि पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे दुष्काळाचा ग्रामीण जनतेवर होणारा धोका आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अकुशल मजुरांना काम देऊन कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या आहेत आणि राज्यातील भीषण दुष्काळाच्या काळात ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व जंगल, माती आणि पाणी चे व्‍यवस्‍थापन इत्‍यादी.

वरील सर्व बाबी लक्षात घेता, राज्याच्या विधानसभेने महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 पारित करुन तो संपूर्ण राज्यात लागू केला. या कायद्यांतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आणि संपूर्ण राज्यात दोन वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या.

सन 2005 च्‍या दरम्यान, भारताच्या संसदेने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो) पारित करुन तो संपूर्ण भारतासाठी लागू केला.

या कायद्याच्या कलम 28 नुसार “ज्या राज्यात कायदा अस्तित्वात आहे किंवा ग्रामीण कुटुंबांना या कायद्याच्या तरतुदींशी सुसंगत अकुशल अंगमेहनतीच्या कामासाठी रोजगाराची हमी प्रदान करण्यासाठी अधिनियमित केले आहे, ज्या अंतर्गत कुटुंबाना रोजगाराचा हक्क प्रदान केला आहे. या कायद्यांतर्गत जी हमी देण्यात आली आहे त्यापेक्षा कमी दर्जाची नाहीत, अशी राज्य सरकारकडे या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा पर्याय असेल

त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सन 2006 मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

तथापि, 2014 मध्ये, महाराष्ट्र राज्य विधानसभेने मनरेगा कायदा 2005 नंतर राज्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 कायद्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या, अशा प्रकारे योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती बदलली आणि राज्यात प्रभावी उपरोक्त सुधारित कायदा अंमलात आला.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (2005) (मनरेगा 2005 कायदा)

MGNREGA Yojana 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, 2005 (मगांराग्रारोहयो) 7 सप्टेंबर 2005 रोजी अधिसूचित करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार केलेल्या योजनेला राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र असे म्हणतात. ज्या कुटुंबातील प्रौढ सदस्य अकुशल अंगमेहनीतीचे काम करण्यासाठी स्वेच्छेने तयार होतात अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देण्‍याची हमी, हे मनरेगाचे प्रमुख उददेश आहे.

MGNREGA Yojana 2023 उद्दिष्टे

 • मागणीनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान 100 दिवस अकुशल हाताला काम उपलब्ध करून देणे, परिणामी विहित गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण करणे.
 • गरिबांच्या उपजीविकेच्या साधनांचा आधार मजबूत करणे.
 • सक्रियपणे सामाजिक समावेश सुनिश्चित करणे.
 • पंचायती राज संस्थांचे बळकटीकरण
 • मजुरीच्या रोजगाराच्या संधींची हमी देऊन ग्रामीण भारतातील सर्वात असुरक्षित लोकांसाठी सामाजिक संरक्षण.
 • टिकाऊ मालमत्तेची निर्मिती करण्यासाठी मजुरीच्या रोजगाराच्या संधी निर्माण करून ग्रामीण गरिबांच्या उपजीविकेची सुरक्षा वाढवणे
 • ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनरुज्जीवन करणे.
 • एक टिकाऊ आणि उत्पादक ग्रामीण मत्ता तयार करणे.

MGNREGA Yojana 2023 महाराष्ट्रात रोजगार हमी योजना

MGNREGA Yojana 2023 : सध्या राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, 1977 (6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित) लागू आहे आणि या कायद्याअंतर्गत खालील दोन योजना चालू आहेत.

 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना -महाराष्ट्र (मगांराग्रारोहयो) या योजनेंतर्गत, केंद्र सरकार प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते आणि मजुरी खर्चासाठी प्रति कुटुंब 100 दिवस निधी देते. महाराष्ट्र सरकार प्रत्येक कुटुंबाच्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार उचलते.
 • महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम,1977 च्या कलम (12) (ई) नुसार, वैयक्तिक लाभ योजना अनुदान म्हणून प्रतिपूर्ती आधारावर लागू केल्या जातात.
 • याशिवाय राज्य शासनाचा निधी राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत प्रगतीपथावर असलेली कुशल कामे पूर्ण करण्यासाठी व राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या भरपाईसाठी वापरला जातो.

MGNREGA Yojana 2023 वैशिष्ट्ये

MGNREGA Yojana 2023
 • केंद्र सरकार ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला प्रति कुटुंब 100 दिवसांच्या रोजगाराची हमी देते. महाराष्ट्र सरकार 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांच्या अकुशल रोजगाराची हमी देते.
 • ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड मिळण्याचा हक्क आहे. ज्यामध्ये घरातील सर्व प्रौढ सदस्यांची नावे आणि छायाचित्रे असतात. जेणेकरून ते कामाची मागणी करू शकतील आणि काम मिळवू शकतील. जॉब कार्ड हे एक प्रमुख दस्तऐवज आहे. ज्यामध्ये संबंधित कुटुंबाने केलेल्या कामाचे आणि मिळालेल्या मजूरी इ.चे तपशील नोंदवते.
 • नोंदणीकृत कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्य ज्याचे नाव जॉबकार्डमध्ये आहे त्यांना ग्रामपंचायतीमधील योजनेअंतर्गत अकुशल कामासाठी काम मागणीचा अर्ज करण्यास पात्र आहे. आणि काम मागणी किंवा अर्ज केल्याच्या पंधरा दिवसांच्या आत संबंधित मजुराला काम प्रदान केले जाईल.
 • मजुराने काम मागणी केल्यानंतर 15 दिवसाचे काम काम उपलब्ध करून न दिल्यास संबंधित मजुराला मग्रारोहयो च्या नियमांनुसार बेरोजगारी भत्ता मिळण्याचा हक्क आहे.
 • ग्रामसभेच्या शिफारशींनुसार एखाद्या योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील कामाची माहिती करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक प्रौढ सदस्याला ग्रामसभेत सहभागी होण्याचा आणि त्यांच्या ग्राम पंचायतीसाठी मनरेगा अंतर्गत घेण्यात येणारी कामे आणि प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार आहे.
 • मजूराला तिच्या/त्याच्या निवासस्थानापासून 5 किलोमीटरच्या आत काम देणे आवश्यक आहे. तसेच तालुक्यात काम निश्चितपणे दिले पाहिजे. एखाद्या मजूराला त्याच्या राहत्या घरापासून ५ किलोमीटरच्या पलीकडे कामाचे वाटप केले असल्यास, मजूराला प्रवास भत्ता मिळण्याचा अधिकार आहे.
 • योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि इतर अंमलबजावणी यंत्रणांनी हाती घेतलेल्या सर्व कामांसाठी, कुशल आणि अर्धकुशल जिल्हा स्तरावर 40 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
 • कामाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा द्वारे अंमलात आणलेली कामे अंगमेहनतीने केली जातील आणि अकुशल मजुरांना विस्थापीत करणारी यंत्रसामुग्री वापरली जाणार नाहीत.
 • महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 262 कामे अनुज्ञेय आहेत.
 • खर्चाच्या दृष्टीने जिल्ह्यात हाती घ्यायच्या कामांपैकी किमान 60% कामे ही जमीन, पाणी आणि झाडे यांच्या विकासाद्वारे शेती आणि शेतीशी थेट जोडलेल्या उत्पादक मत्तांच्या निर्मितीसाठी असतील. उपजीविकेच्या विकासावर भर देऊन,
 • वैयक्तिक लाभार्थ्यांच्या अभिसरण नियोजन प्रक्रियेत प्राधान्य दिलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल.

MGNREGA Yojana 2023 कोणाला प्राधान्य मिळेल?

 • अनुसूचित जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या जमाती
 • अधिसूचित जमाती
 • दारिद्र्यरेषेखालील इतर कुटुंबे
 • महिलां कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब
 • शारीरिकदृष्ट्या अपंग प्रमुख कुटुंब
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी
 • IAY / PMAY अंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी
 • वरील सर्व लाभार्थी संपल्यानंतर अल्प किंवा अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या जमिनींवर कृषी कर्जमाफीमध्ये परिभाषित केल्यानुसार आणि कर्जमुक्ती योजना, 2008 या अटीच्या आधारे लाभार्थीने त्यांच्या जमिनीवर किंवा घराच्या जागेवर हाती घेतलेल्या कामावर कुटुंबातील किमान एक सदस्य काम करण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे.

MGNREGA Yojana 2023 इतर महत्वाच्या बाबी

MGNREGA Yojana 2023 योजनेमध्ये मजुरांसाठी काही महत्वाच्या बाबी आहेत ज्या मजुरांच्या हिताच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे :

 • कामाच्या ठिकाणी सुरक्षित पिण्याचे पाणी, लहान मुलांसाठी सावली आणि विश्रांतीचा कालावधी, प्राथमिक उपचार पेटी, किरकोळ दुखापतींवर आपत्कालीन उपचारासाठी पुरेशा साहित्यासह सुविधा.
 • मजुरास 15 दिवसांच्या आत मजुरी प्राप्त होण्याचा अधिकार आहे आणि 15 दिवसाच्या आत मजुरी प्राप्त न झाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या 16 दिवसानंतर विलंब झाल्यास प्रतिदिन वेतनाच्या 0.05% दराने विलंब आकार मिळण्याचा अधिकार मजूराला आहे.
 • तक्रार निवारण प्राधिकारी – ज्यामुळे मजूर/नागरिकांना तक्रार नोंदवता येते आणि त्याबाबतच्या प्रतिसादाचा शोध घेता येतो. तक्रारदाराला तक्रार नोंदवण्यासाठी Online / Offline द्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा केले आहे. त्यामध्ये लेखी तक्रारी, टोल फ्री हेल्प लाइन क्रमांक आणि ऑनलाइन तक्रार नोंदणी पोर्टल आणि मोबाइल अँप्लिकेशन समाविष्ट आहेत.

MGNREGA Yojana 2023 जॉब कार्ड

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा योजनेअंतर्गत अर्जदार जेव्हा स्थानिक ग्रामपंचायतीकडे नोंदणी करतो तेव्हा त्याला एक ओळखपत्र दिले जाते त्या ओळखपत्रास मनरेगा जॉब कार्ड असं म्हटलं जातं. हे जॉब कार्ड म्हणजे त्या व्यक्तीसाठी एक ओळखपत्र असते. या कार्डमध्ये नोंदणीकृत व्यक्तीशी संबंधित सर्व माहिती ठेवली जाते. ज्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव, नरेगा नोंदणी क्रमांक, कुटुंबाचा तपशील इत्यादी माहिती त्या कार्डमध्ये ठेवली जाते. म्हणजेच हे जॉब कार्ड या योजने अंतर्गत व्यक्तीच्या पात्रतेचा पुरावा असतो. या जॉब कार्ड च्या आधारे नोंदणीकृत व्यक्तीला भारत सरकारकडून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. ज्या व्यक्तीला मनरेगा योजने अंतर्गत रोजगार मिळवून घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडे हे कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे.

MGNREGA Yojana 2023 जॉब कार्ड फायदे

 • मनरेगा जॉब कार्डचा मुख्य फायदा म्हणजे प्रौढ व्यक्तीला कामाचे शोधात एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकावे लागत नाही सरकार स्वतःच या जॉब कार्डधारकांना शंभर दिवसासाठीचा रोजगार मिळवून देते.
 •  जॉब कार्ड धारकांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीसाठी नवीन जॉब कार्ड तयार केले जाते.
 •  जॉब कार्ड च्या मदतीने देशातील अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे व त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे म्हणजेच हे जॉब कार्ड देशातील अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.
 •  या जॉब कार्ड मुळे अनेक नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे.

MGNREGA Yojana 2023 जॉब कार्ड कसे व कुठे काढायचे ?

MGNREGA Yojana 2023

MGNREGA Yojana 2023 : ज्या व्यक्तीला मनरेगा योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे त्या व्यक्तीने जॉब कार्ड काढणे खूप गरजेचे आहे. जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा ही याची पद्धत खाली दिलेली आहे.

 • जॉब कार्ड काढण्यासाठी अर्जदार पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. अधिकृत वेबसाईट
 •  वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल, त्या होम पेजवर डेटा एन्ट्री चा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व राज्याची यादी येईल. या यादीमधून तुम्ही तुमचे राज्य निवडावे.
 •  राज्य निवडल्यानंतर तुमच्यासमोर जे पेज ओपन होईल तिथे लॉगिन फॉर्म मिळेल. त्या फॉर्ममध्ये अर्जदाराने आर्थिक वर्ष, रोल, युजर आयडी, पासवर्ड सुरक्षा कोड प्रविष्ट करणे गरजेचे आहे आणि हे सर्व त्यामध्ये भरल्यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.
 •  यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे रजिस्ट्रेशन अँड जॉब कार्ड पर्यायावर क्लिक करणे गरजेचे आहे.
 • यानंतर तुमच्यासमोर वेब पेज ओपन होईल, तिथे बीपीएल डेटा पर्यावर क्लिक करा. आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी जसे की अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, घर क्रमांक, वर्ग, जिल्हा इत्यादी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. यानंतर तुम्ही सेव्ह पर्यायावर क्लिक करू शकता.
 • तुमचा फॉर्म सेव्ह झाल्यानंतर तुमच्यासमोर जे पेज ओपन होईल तिथे तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल. नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर अर्जदार त्याचा पासपोर्ट फोटो अपलोड करो करू शकतो.
 • अशा प्रकारे तुम्ही जॉब कार्ड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

MGNREGA Yojana 2023 जॉब कार्ड ऑनलाइन पाहण्याची पद्धत 

MGNREGA Yojana 2023
 • मनरेगा जॉब कार्ड यादीमध्ये नाव पाहण्यासाठी अर्जदारास प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
 •  वेबसाईटला भेट दिल्यानंतर वेबसाईटवर अर्जदाराने लॉगिन करावे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यापुढे एक वेब पेज ओपन होईल, त्यावेळी पेजवर तुम्हाला जनरेट रिपोर्ट समोर दिलेल्या जॉब कार्ड च्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुमच्यासमोर सर्व राज्यांची यादी येईल त्यातून तुम्ही तुमचे राज्य निवडावे.
 •  यानंतर जे वेब पेज ओपन होईल, तिथे आर्थिक वर्ष, जिल्हा, ब्लॉक, पंचायत निवडावी आणि प्रोसेस या पर्यायावर क्लिक करावे.
 •  यानंतर जॉब कार्ड किंवा रजिस्ट्रेशन असलेल्या विभागात जॉब कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे.
 •  यानंतर तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक आणि अर्जदाराच्या नावांची यादी मिळेल.
 •  या यादीमध्ये अर्जदाराला त्याच्या जॉब कार्ड क्रमांकावर क्लिक करावे लागेल.
 •  यानंतर जॉब कार्डशी संबंधित सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल ते जॉब कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटही काढून घेऊ शकता.
 •  अशा प्रकारे अर्जदारास त्याचे मनरेगा योजनेसाठी असलेले जॉब कार्ड मिळू शकेल. 

MGNREGA Yojana 2023 कामाचे पैसे कसे जमा होतील?

MGNREGA Yojana 2023 : जर तुमच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असेल आणि त्या द्वारे तुम्हाला रोजगार मिळत असेल तर त्या कामाचे पैसे कसे व कुठे जमा केले जातात हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. MGNREGA Yojana 2023 योजनेमध्ये काम केलेल्या मजुरांना खालीलप्रमाणे दिले जातात.

 • मजुराने केलेल्या कामाची रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
 • यासाठी त्या व्यक्तीकडे बँक खाते असणे गरजेचे आहे. संबंधित व्यक्तीने किंत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडून घेणे आवश्यक आहे. कार्डधारक मनरेगा जॉब कार्ड दाखवून खे उघडून घेऊ शकतो.
 • ज्या ठिकाणी बँक सेवा उपलब्ध नाही त्या भागांमध्ये ग्रामप्रमुख रोखीने पेमेंट करतो.

MGNREGA Yojana 2023 महत्वाच्या लिंक्स

Posts You May Like

Leave a Reply