“माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३ : शासन देणार ५०,०००/- रुपये”

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३ || माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी संपूर्ण माहिती || माझी कन्या भाग्यश्री योजनेची पात्रता || माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागू असलेल्या अटी याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्याने १ जानेवारी २०१४ पासून राज्यातील मुलींसाठी सुकन्या योजना सुरु केली. हि योजना सुरु करण्यामागील उद्देश म्हणजे मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका हत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे हा होता. हि योजना दारिद्र रेषेखाली जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी कुटुंबातील २ अपत्यांपर्यंत लागू करण्यात आली होती. या योजनेचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०१४ रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. अंमलबजावणी हि आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांच्याकडून करण्यात आली.

केंद्र सरकारने २२ जानेवारी २०१५ पासून बेटी बचावो बेटी पाढाओ या योजनेला सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश बालक लिंग गुणोत्तर वाढवणे हा होता. हा उद्देश सध्या करण्यासाठी राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने हि योजना महाराष्ट्रातील १० जिल्ह्यामध्ये लागू केली त्यामध्ये बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, वाशीम, कोल्हापूर, धाराशिव(उस्मानाबाद), सांगली आणि जालना हे १० जिल्हे होते. लिंग निवडीला प्रतिबंध करणे, मुलींच्या जीविताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे, मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे अशा अतिमहत्वकांक्षी उद्दिष्टे असलेल्या योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेली सुकन्या योजना विलीन करून माझी कन्या भाग्यश्री हि नवीन योजना राबविण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी :-

माझी कन्या भाग्यश्री हि योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली. हि योजना दारिद्र रेषेखालील सर्व कुटुंबात जन्मलेल्या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्र रेषेवरील कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी या योजनेचा काही लाभ देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल करून हि योजना १ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आली.

माझी कन्या भाग्यश्री शासन निर्णय :-

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन आणि खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री” हि योजना या शासनाने निर्णयान्वये अधिक्रमित करून “माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना” दि. १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख (सात लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी लागू करण्यात येत आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे निकष :-

या योजनेचे खालीलप्रमाणे महत्वाचे दोन निकष आहेत.

 1. एका मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रियाकेली असेल तर शासन मुलीच्या नवे रुपये ५०,०००/- बँकेत ठेव म्हणून गुंतवेल आणि या रक्कमेवर ६ वर्षासाठी असलेले फक्त व्याज मुलीच्या ६ व्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करून ६ वर्षासाठी होणारे व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करून ६ वर्षासाठी होणारे व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल. शासन रुपये ५०,०००/- हि रक्कम मात्याने किंवा पित्याने कुंटुंब नियोजन शस्रक्रिया केल्यानंतरच मुलीच्या नावे जमा करेल.
 2. दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया केली असेल तर शासन पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी रुपये २५,०००/- रक्कम बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवेल आणि या रक्कमेवर ६ वर्षासाठी होणारे व्याज मुलीला ६ व्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये २५ ,०००/- गुंतवणूक करून ६ वर्षासाठी होणारे व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल. पुन्हा मुद्दल रुपये २५ ,०००/- गुंतवणूक करून ६ वर्षासाठी होणारे व्याज आणि मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल. शासन प्रत्येकी  रुपये २५,०००/- हि रक्कम मात्याने किंवा पित्याने कुंटुंब नियोजन शस्रक्रिया केल्यानंतरच मुलीच्या नावे जमा करेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी :-

या योजनेच्या अटी खालीलप्रमाणे असतील.

 1. मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजनाची शस्रक्रियाकेल्याचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
 2. माझी कन्या भाग्यश्री सुधारितयोजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतर जन्मलेल्या मुलीना लागू होईल.
 3. हि योजना १ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आली असल्यामुळे ज्या कुटुंबाना दि. १ ऑगस्ट २०१७ पूर्वी एक मुलगी आहे व दि. १ ऑगस्ट २०१७ नंतर दुसर्या मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या कुटुंबातील मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्रक्रिया केल्याचा दाखला जमा केल्यास फक्त दुसऱ्या मुलीला रुपये २५,०००/- दिले जातील.
 4. पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी असेल किवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व  दुसरे अपत्य मुलगा असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 5. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 6. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचा जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
 7. मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील १६ व्या वर्षी देय असणारे व्याज मिळण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे व इ. १० वी परीक्षा उतीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक असेल.
 8. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली या योजनेस पात्र असतील.
 9. बालगृहातील अनाथ मुलीना हि योजना लागू असेल. दत्तक पालकांनी मुलांचे अकाउंट उघडून हा लाभ त्या मुलीना मिळवून द्यावा. मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी लागू होतील.
 10. विहित मुदतीपूर्वी मुलीचा विवाह झाल्यास(१८ वर्षा पूर्वी), किंवा दहावी पूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नाही. मुलीच्या नवे बँकेत जमा केलेली रक्कम शासनाच्या नावे बँकेत जमा केली जाईल. परंतु नैसर्गिक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास रक्कम मुदत संपल्यानंतर मुलीच्या पालकांना देण्यात येईल.
 11. दि. १ जानेवारी २०१४ ते दि. ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुकन्या योजना व दि. १ एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत जुनी माझी कन्या भाग्यश्री योजना चालू होती. जर या कालावधीत संबंधित लाभार्थ्याने अर्ज केला असेल व आजच्या निकषानुसार पत्र ठरत असेल तर त्यास या योजनेचा लाभ मिळेल. मात्र दि. १ ऑगस्ट २०१७ पासून सुधरी माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये नमूद केलेले लाभ मंजूर करण्यात यावेत.
 12. वार्षिक उत्पन रुपये ७.५० लाख पर्यंत असल्याचे स्थानिक तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे गरजेचे आहे.
 13. मुद्दलावर जो दर दिला जायील तो दर त्या वेळी बँकेमार्फत लाऊ असलेल्या दरानुसार असेल.
 14. एका मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने १ वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्रक्रिया करून अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण/नागरी यांच्याकडे सदर करणे गरजेचे आहे. तसेच दोन मुलीनंतर ६ महिन्याच्या आत कुटुंबनियोजन केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

माझी भाग्यश्री कन्या योजना महाराष्ट्र 2023 ची कागदपत्रे

 1. अर्जदाराचे आधार कार्ड
 2. उत्पन्न प्रमाणपत्र
 3. पत्ता पुरावा
 4. मोबाइल नंबर
 5. पासपोर्ट आकाराचा फोटो
 6. आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

माझी भाग्यश्री कन्या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 1. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन PDF डाऊनलोड करावी.
 2. त्यामधील फॉर्म भरून तसेच सर्व महत्वाची कागदपत्रे जोडून फॉर्म महिला व बाल विकास कार्यालयात जमा करावा.

महत्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र शासन संकेतस्थळ : https://www.maharashtra.gov.in/

यासारख्या योजनांच्या माहितीसाठी भेट द्या : www.mahajobs.org.in

Mazi kanya bhagyashree yojana form pdf : https://drive.google.com/drive/folders/1AGCHjZskT_U8ucRjtHKLLxTq6ex617to?usp=drive_link

Leave a Reply