Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key : तलाठी भरती 2023 उत्तरतालिका झाली जाहीर, त्वरित पहा

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबर २०२३ या तारखेला संपली आहे. या परीक्षेसाठी १० लाख ४१ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजारउमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली आहे. सर्व उमदेवार निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.. भूमी अभिलेख विभागाकडून २७/०९/२०२३ ला उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे.

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key

उत्तरातालिका महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरातालिका तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता आणि डाउनलोड करून घेऊ शकता तसेच तुमच्या काही हरकती असतील तर आक्षेप नोंदवण्यासाठी २८/०९/२०२३ ते ०८/१०/२०२३ दरम्यान TCS कंपनीकडून लिंक खुली करून देण्यात येणार आहे. तसेच TCS कंपनीकडून आक्षेप/हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप/हरकत करिता रक्कम रु.१००/- इतकी फी आकारण्यात येणार आहे.

उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key

तलाठी भरती तपशील

परीक्षेचे नावमहाराष्ट्र तलाठी भरती २०२३
एकूण पदे४४६६
परीक्षा तारीख१७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३
उत्तरतालिका प्रसिद्ध२७/०९/२०२३
आक्षेप/हरकत सादर करण्याचा कालावधी२८/०९/२०२३ ते ०८/१०/२०२३
Official WebsiteClick Here

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key कुठे व कसा डाउनलोड करावा?

Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key पाहण्यासाठी वरती दिलेल्या लिंक चा वापर करू शकता. उत्तरतालिका पाहण्यासाठी उमेदवाराला login ID आणि पासवर्ड ची गरज भासणार आहे.

उत्तरतालिका डाऊनलोड कशी करावी ?

उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स चा वापर करावा लागणार आहे.

  • महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. Official Website इथे क्लिक करा.
  • नंतर Registration NumberPassword टाकावा व LOGIN वर क्लिक करावे.
  • यानंतर CANDIDATE RESPONSE वर क्लिक करावे.
  • यानंतर To download your Answer Key for Assessment . Click here to generate it. असा मेसेज दिसेल त्यातील here या शब्दावर क्लिक करावे.
  • यानंतर तुमच्या समोर answer key open होईल.
  • अश्या प्रकारे तुम्ही उत्तरतालिका पाहू शकता.

आक्षेप/हरकत नोंदवण्यासाठी खालील पद्धत वापरावी.

  • तुमच्यासमोर open असलेल्या पेज वर OBJECTION FORM असा बटन असेल त्यावर क्लिक करावे.
  • यानंतर Click Here to Raise Objection वर क्लिक करून फॉर्म भरून submit करावा.
Maharashtra Talathi Exam 2023 Answer Key

महत्वाच्या लिंक्स

  • महाभूमी अधिकृत वेबसाईट : Click Here
  • To Know More : Click Here

Leave a Reply