महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 (Maharashtra Krushi Sevak Bharti) : 2300+ जागांची भरती

Maharashtra Krushi Sevak Bharti

Maharashtra Krushi Sevak Bharti : महाराष्ट्र कृषी विभागाने कृषी सेवक हि पदे भरण्याची जाहिरात नुकतीच काढलेली आहे. महाराष्ट्र कृषी विभाग जवळ जवळ 2300+ महाराष्ट्र कृषी सेवक ची पदे भरणार आहे. हि भरती अमरावती विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, कोल्हापूर विभाग, लातूर विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, ठाणे विभाग, पुणे विभाग या विभागांमध्ये होणार आहे. जे उमेदवार पात्र असतील त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागवण्यात येणार आहेत. या पदाकरिता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन – क्र. मकसी – १००७/प्र.क्र.३६/का.३६, दिनांक १० जुलै २००८ नुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवार हि अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र कृषी सेवक परीक्षा तपशील

विभागाचे नावमहाराष्ट्र शासन कृषी विभाग
परीक्षेचे नाव महाराष्ट्र कृषी सेवक/सहाय्यक
परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख (सुरुवात)14 सप्टेंबर २०२३
परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख (शेवट)3 ऑक्टोबर २०२३
परीक्षा फॉर्म भरण्याची पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
परीक्षा पद्धत ऑनलाईन (Computer Based Online Examination)
वेतन१६०००/-
Official Websitewww.krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra विभागानुसार जागा

खाली दिल्याप्रमाणे विभागानुसार जागा उपलब्ध आहेत :

अमरावती विभाग227
छत्रपती संभाजी नगर विभाग196
कोल्हापूर विभाग250
लातूर विभाग170
नागपूर विभाग448
नाशिक विभाग336
पुणे विभाग118
ठाणे विभाग294

Maharashtra Krushi Sevak Bharti पात्रता

Krushi Sevak Bharti
 1. संविधानिक विद्यापीठाची कृषी विषयातील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता
 2. निवड झालेल्या उमेदवारांची कृषी सेवक पदी प्रथमतः वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल. त्यांचे काम समाधानकारक असेल तर पुढील २ वर्षासाठी दर वर्षी पुनर्नियुक्त करण्यात येईल. याप्रमाणे कृषी सेवक पदी नियुक्तीचा प्रत्यक्ष कामाचा कालावधी वर्षाचा राहील. वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यास उमेदवारास पदांच्या उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार नियमित पदावर नियुक्त केले जाईल.

Maharashtra Krushi Sevak Bharti वयोमर्यादा

Maharashtra Krushi Sevak Bharti
 1. खुला वर्ग : किमान १९ वर्षे, कमाल ३८ वर्षे
 2. मागासवर्गीय : किमान १९ वर्षे, कमाल ४३ वर्षे
 3. दिव्यांग/विकलांग माजी सैनिक/भूकंपग्रस्त/प्रकल्पग्रस्त : किमान १९ वर्षे, कमाल ४५ वर्षे
 4. प्राविण्य प्राप्त खेळाडू/अनाथ : किमान १९ वर्षे, कमाल ४३ वर्षे
 5. माजी सैनिक : सैनिक सेवेचा कालावधी + ३ वर्षे
 6. अंशकालीन उमेदवार : ५५ वर्षापर्यंत शिथिलता

अर्ज कसा करावा?

 1. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
 2. नवीन उमेदवार असाल तर नवीन Registration करा.
 3. Registration केल्यानंतर तुम्हाला login ID आणि password मिळेल. त्याचा वापर करून login करा.
 4. Login केल्यानंतर तुमच्या समोर येणाऱ्या फॉर्म वर सर्व माहिती व्यवस्थित भरा.
 5. यानंतर फॉर्म submit करा.
 6. Submit केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.
 7. परीक्षा शुल्क भरल्यानंतर फॉर्म ची आणि फी भरलेली पावतीची प्रिंट काढून ठेवावी.

Maharashtra Krushi Sevak Bharti वेतन

महाराष्ट्र कृषी सेवक/सहाय्यक या पदाकरिता १६०००/- हे निश्चित वेतन देण्यात येणार आहे.

परीक्षा शुल्क

 1. अमागास : १०००/- रु.
 2. मागास/इतर : ९००/- रु.

महाराष्ट्र कृषी सेवक निवडीची पद्धत

 1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
 2. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
 3. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी ४५ % गुण मिळवणे आवश्यक आहे.
 4. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ असेल.
 5. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील.
 6. परीक्षेचा दर्जा SSC अभ्यासक्रमावर आधारित असेल तसेच कृषी विषयाच्या परीक्षेचा दर्जा कृषी पदविका दर्जाचा राहील.
 7. प्रश्नांची काठीण्य पातळी ५०:३०:२० अशी अनुक्रमे सोपे, माध्यमांनी कठीण याप्रमाणे असेल.
Screenshot 2023 09 11 221410

Syllabus पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Maharashtra Krushi Sevak Bharti PDFs

नाशिक Download PDF
ठाणेDownload PDF
छत्रपती संभाजी नगरDownload PDF
पुणेDownload PDF
नागपूरDownload PDF
लातूरDownload PDF
कोल्हापूरDownload PDF
अमरावतीDownload PDF

महत्वाच्या लिंक्स

Official Website : Click Here

To Know More : Click Here

Summary

महाराष्ट्राचा कृषी विभाग १४ सप्टेंबर २०२३ पासून कृषी सेवक या पदासाठी अर्ज मागवायला सुरुवात करणार आहे. वरती दिलेल्या official website वरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर २०२३ आहे. वरील लेखामध्ये या भरती विषयी सविस्तर माहिती पुरविण्यात आली आहे.

Posts You May Like

 1. Maths and Reasoning Practice Test : https://mahajobs.org.in/mathematics-and-reasoning-practice-test-01/
 2. Nagarparishad Class-C Exam : https://mahajobs.org.in/maharashtra-nagarparishad-exam-2023/
 3. ZP Recruitment 2023 : https://mahajobs.org.in/maharashtra-zp-recruitment-2023/

Leave a Reply