Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना, Pune University

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023 : पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून वेगवेगळ्या स्कॉलरशीप दिल्या जातात. या स्कॉलरशीप पैकी एक स्कॉलरशीप म्हणजे Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023. ही पुणे विद्यापीठाची अर्थसहाय्य योजना आहे. या योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून नियम व अटीनुसार अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त २० व पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यास रुपये ३०००/- अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचावा .

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता असून देखील फक्त आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना” सुरु केलेली आहे. ही योजना विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींसाठीही लागू असणार आहे.

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023

Lokshahir Annabhau Sathe Scholarship 2023 नियम व अटी

 1. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त २० व अव्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त १० विद्यार्थ्यांना सदर योजनेसाठी पात्र राहतील.
 2. पात्र विद्यार्थ्यास पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रु. ३०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
 3. विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न रु. २,५०,००० /- पेक्षा जास्त नसावे. यासाठी संबंधित तहसीलदाराचा दाखला आवश्यक राहील.
 4. विद्यार्थ्याने मागील लगतच्या परीक्षेत किमान ६५% गुण संपादित केलेले असावेत.
 5. विद्यार्थ्याने महाविद्यालयात नियमित प्रवेश घेतलेला असावा.
 6. विद्यार्थ्याची नियमित अभ्यासक्रमात किमान ७५% उपस्थिती आवश्यक असेल. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक आहे.
 7. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा.
 8. विद्यार्थ्याने या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही.
 9. विद्यार्थ्यास गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
 10. विद्यार्थी भारतीय नागरिक असावा.त्यासाठी नागरिकत्वाचा साक्षांकित दाखला जोडणे आवशयक राहील.
 11. विद्यार्थ्याने त्याच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. जसे बँकेचे नाव, पत्ता,खाते क्रमांक, (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
 12. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यहे विद्यापीठाचे मान्यताप्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यताप्राप्त असावेत.
 13. सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थ्यास संपूर्ण अभ्यासक्रमात एकदाच प्राप्त होईल.
 14. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थिनीस सदर योजना लागू होणार नाही. याबाबतचे संबंधित विद्यार्थ्याने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील.

PMC Annabhau Sathe Scholarship कागदपत्रे

 1. मागील वर्षीच Marksheet
 2. जातीचा दाखला
 3. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
 4. ७५% हजेरी असलेला प्राचार्यांचा दाखला
 5. नागरिकत्वाचा दाखला
 6. शासनाच्या योजनेचा लाभ घेत नसलेले हमीपत्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स

 1. Official Website : Click Here
 2. Pune University : Click Here
 3. To Know More : Click Here

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना कोणासाठी आहे?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेंतर्गत किती अर्थसहाय्य मिळणार आहे?

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेंतर्गत ३०००/- रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

 1. मागील वर्षीच Marksheet
 2. जातीचा दाखला
 3. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
 4. ७५% हजेरी असलेला प्राचार्यांचा दाखला
 5. नागरिकत्वाचा दाखला
 6. शासनाच्या योजनेचा लाभ घेत नसलेले हमीपत्र

Leave a Reply