महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा लेक लाडकी योजना 2023 (Ladaki Lek Scheme) : मुलीला मिळणार ९८ हजार रुपये

लेक लाडकी योजना 2023

लेक लाडकी योजना 2023 || लेक लाडकी योजना 2023 महाराष्ट्र || महाराष्ट्र योजना 2023 || लेक लाडकी योजना 2023 माहिती || लेक लाडकी योजना 2023 आवश्यक कागदपत्रे ||

Lek Ladaki Scheme 2023 || Lek Ladaki Scheme 2023 Maharashtra || Lek Ladaki Yojana 2023 Maharshtra || Lek Ladaki Yojana 2023 || Lek Ladaki Yojana Information || Lek Ladaki Scheme 2023 important documents

महाराष्ट्र राज्याचा 2023 चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. 9 मार्च रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या . या घोषणापैकी महत्वाची घोषणा म्हणजे महाराष्ट्राच्या लेकींसाठी सुरु केली जाणारी “ लेक लाडकी योजना ”. या योजनेची माहिती आज आपण पाहणार आहोत.

लेक लाडकी योजना 2023 उद्दिष्ट :

मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, आपल्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार प्राप्त व्हावा, याकरिता महाराष्ट्र शासनाने हि योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये मुलीच्या वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जवळपास ९८ हजार रुपयांची मदत शासनाकडून देण्यात येणार आहे.

योजनेंतर्गत मिळणारे लाभ :

राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलीना मिळणार आहे. यामध्ये मुलीना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर ठराविक रक्कम दिली जाणार आहे.

       लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार, इयत्ता पाहिलमध्ये 4 हजार रुपये, इयत्ता सहावीत ६ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये, आणि १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.

महत्वाची कागदपत्रे:

 1. मुलीचे आधारकार्ड
 2. बँक खाते, पासबुक किंवा तिच्या आई-वडिलांचे बँक खाते, पासबुक
 3. उत्पन्न प्रमाणपत्र
 4. रहिवासी प्रमाणपत्र
 5. कुटुंबाचे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड
 6. पासपोर्ट साईज फोटो
 7. मोबाईल नंबर

महत्वाच्या लिंक्स :

 1. महाराष्ट्र सरकार Official Website : Click Here
 2. To Know More : Click Here

Posts You May Like :

 1. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३ : Click Here
 2. पॉली हाऊस शेडनेट योजना : Click Here
 3. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Click Here
 4. कांदा अनुदान 2023 : Click Here

Leave a Reply