Maharashtra Krushi Sevak Bharti Syllabus 2023: महाराष्ट्र कृषी सेवक भरती २०२३ अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

Krushi Sevak Bharti Syllabus

Maharashtra Krushi Sevak Bharti Syllabus : महाराष्ट्र कृषी विभागाने नुकतीच कृषी सेवक या पदासाठी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. अर्ज १४ सप्टेंबर २०२३ ते 3 ऑक्टोबर २०२३ या दरम्यान आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचे आहेत. कृषी सेवक पदभरती अमरावती विभाग, छत्रपती संभाजी नगर विभाग, कोल्हापूर विभाग, लातूर विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, ठाणे विभाग, पुणे विभाग या विभागांमध्ये होणार आहे. परीक्षार्थींना Krushi Sevak Bharti Syllabus माहित असणे गरजेच आहे. आज आपण या लेखामध्ये Maharashtra Krushi Sevak Bharti Syllabus 2023 विषयी माहिती पाहणार आहोत. हा लेख काळजीपूर्वक वाचावा.

Maharashtra Krushi Sevak Bharti परीक्षा स्वरूप

Krushi Sevak Bharti Syllabus

कृषी सेवक या पदासाठी पाच विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. ते विषयांची नावे, प्रश्नसंख्या, आणि गुण खालील टेबल मध्ये सविस्तर देण्यात आलेले आहेत.

Capture
विषय प्रश्न संख्या गुण
मराठी२०२०
इंग्रजी२०२०
सामान्य ज्ञान२०२०
बौद्धिक चाचणी२०२०
कृषी विषय ६०१२०
एकूण१४०२००

वरती दिल्याप्रमाणे २०० गुणांसाठी १४० प्रश्न विचारले जाणार आहेत. कृषी या विषयाला सर्वात जास्त गुण (१२०)आहेत, हे उमेदवाराने लक्ष्यात घ्यावे.

Maharashtra Krushi Sevak Bharti Syllabus 2023

Krushi Sevak Bharti Syllabus

Krushi Sevak Bharti Syllabus : कृषी सेवक पदासाठीचा Krushi Sevak Bharti Syllabus हा विषयानुसार खाली देण्यात आलेला आहे. कृषी सेवक या पदासाठी जी परीक्षा घेण्यात येणार आहे त्या परीक्षेमध्ये एकूण पाच विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहे ते पाच विषय म्हणजेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, कृषी विषय. या विषयांचा detail मध्ये अभ्यासक्रम खाली देण्यात आला आहे.

Krushi Sevak Bharti Syllabus मराठी :

 • शब्दांच्या जाती (८)
 • लिंग
 • वचन
 • समास
 • विभक्ती
 • काळ
 • प्रयोग
 • समानार्थी शब्द
 • विरुद्धार्थी शब्द
 • शब्दसमूहाबद्दल एक शब्द
 • अलंकार
 • वाक्प्रचार
 • म्हणी
 • वाक्याचे प्रकार
 • उताऱ्यावरील प्रश्न

Krushi Sevak Bharti Syllabus इंग्रजी :

 • Parts of Speech
 • Spot The error
 • Change the Voice
 • Direct-Indirect Speech
 • Articles
 • Synonyms
 • Antonyms
 • Misspelled Words
 • Idioms and Phrases
 • One Word Substitution
 • Improvement of Sentences
 • Compehension Passage

Krushi Sevak Bharti Syllabus सामान्य ज्ञान

 • आधुनिक भारताचा इतिहास
 • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
 • महाराष्ट्रातील समाज सुधारक 
 • आंतरराष्ट्रीय संघटना
 • भारतातील प्रथम व्यक्ती
 • भारतीय राज्यघटना
 • चालू घडामोडी
 • अर्थव्यवस्था
 • सामान्य विज्ञान
 • हवामान इत्यादी स्थानिक बाबी

Krushi Sevak Bharti Syllabus अंकगणित 

 • काळ काम वेग उदाहरणे
 • सरासरी
 • नफा तोटा
 • शेकडेवारी
 • भागीदारी
 • सरळ व्याज चक्रवाढ व्याज 
 • वयवारी
 • गुणोत्तर व प्रमाण
 • लसावी व मसावी
 • क्षेत्रफळ
 • दशांश आणि अपूर्णांक

Krushi Sevak Bharti Syllabus बौद्धिक चाचणी

 • अंक मालिका
 • अक्षर मालिका
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे
 • समसंबंध
 • आकृती
 • वाक्यावरून
 • वेन आकृती
 • नातेसंबंध
 • दिशा
 • दिनदर्शिका
 • घड्याळ
 • आकृत्यांवरील प्रश्न

Krushi Sevak Bharti Syllabus कृषी

 • जमिनीचे प्राकृतिक व भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, जमिनीची घडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान किंवा उष्णतामान, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामू विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, मातीतील कलील, आघात, प्रतिबंधक योग्यता इत्यादी
 • जमिनीचे जैविक गुणधर्म, सूक्ष्मजीव जंतू व त्यांचे उत्पादन क्षमतेशी असलेले संबंध, जमिनीतील उपलब्ध अन्यद्रव्य व त्यांच्या उपलब्धतेवर होणारा परिणाम, वनस्पती साठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्ये, मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यांचे कार्य व त्यांच्या कमतरतेची लक्षणे
 • जमिनीतील पाण्याचे प्रकार आणि महत्त्व, पाण्याचे कार्य, जमिनीतील प्रवेश व हालचाल, जमिनीतील पाणी धरून ठेवणे, जमिनीतील पाणी स्थिर पदे, जमिनीचे पाण्याचे नुकसान आणि पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा, मित्रा पद्धती, अतिरिक्त पाण्याची पिकावर व जमिनीवर होणारे परिणाम
 • जमिनीची मशागत, तिचे प्रकार, अवजारे व त्यांचे उपयोग, मी ची मशागत व तिचे फुले, मशागतीचे उद्देश, कामाचे प्रकार व त्यासाठी लागणारी अवजारे
 • माती परीक्षण आणि महत्त्व
 • जमीन व्यवस्थापन, जमिनीची धूप, धूप होण्याची कारणे, धुतीचे निरनिराळे प्रकार व नुकसान, धूप थांबविण्याचे उपाय,
 • भूमी व जलसंधारणाच्या पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षणाच्या पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धती, भूमी सुधारणा व संरक्षणाचे निर्णय शासकीय योजना.
 • सेंद्रिय खते प्रकार व त्यांचे गुणधर्म, शेणखत बनविण्याच्या पद्धती, कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती, जैविक खते.
 • रासायनिक खतांचा प्रकार व त्यांचा होणारा वापर, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी निरनिराळ्या उपयोजना, रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा समतोल वापर, खते देण्याच्या पद्धती, खते घालताना घ्यावयाची काळजी.
 • कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था – पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतीमधील सहभाग (पाणी आडवा पाणी जिरवा) पाणलोट क्षेत्राच्या पिकासाठी सामाजिक वनीकरण, मृदा संधारण विभाग फलोद्यान विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग.
 • जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध – पाणी देण्याच्या पद्धती तुषार, ठिबक व बायऑल सिंचन पद्धती
 • पीक संवर्धन-
 • पीक संवर्धन, पिकांचे वर्गीकरण, हवामान आणि हंगाम
 • बियाणे, बियाणांचे गुणधर्म, बियांच्या उगवणीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
 • पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी आणि हवामान.
 • तृणवर्गीय पिके, कडधान्य वर्गीय पिके, गळीत धान्य, हिरवळ खतांची पिके
 • रोग नियंत्रणाची, कीड नियंत्रणाची सर्वसाधारण तत्वे
 • जैविक कीड /रोग नियंत्रण, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण
 • कीटकनाशके व बुरशी नाशकांचा अभ्यास
 • साठवलेल्या धान्यातील किडी व त्यांचे नियंत्रण
 • बीजोत्पादन तंत्र प्रमाणीकरण, विलगीकरण, संकर कार्यक्रम, बीजोत्पादनाचे टप्पे
 • पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग
 • निरनिराळ्या पीक पद्धती
 • पिकांचे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन म्हणजे काय?
 • महत्व – विहिरीतील पाणी मोजणे व विहिरीची क्षमता काढणे, पिकांना पाण्याचे वेळा ठरविण्याचे निकष, पाणी देण्याच्या पद्धतीचा अभ्यास
 • आळंबी – माहिती आणि उत्पादनाचे तंत्र, खाण्यायोग्य आळंबीचा अभ्यास व वर्गीकरण आळंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे साहित्य बाबी विषयी माहिती, आळंबीची काढणी आणि विक्री, प्रक्रिया आणि टिकवणे
 • रेशीम उत्पादनाची ओळख
 • उद्यानविद्या – रोपवाटिका आणि फळबाग व्यवस्थापन
 • महाराष्ट्राची हवामानानुसार पडलेले विभाग
 • फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबी, पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, जमिनीची निवड, योग्य जातीची निवड, पाणीपुरवठा, बाजारपेठ इ.
 • फळबाग लागवड व व्यवस्थापन पाणी /खते देण्याची पद्धत
 • सेंद्रिय खतांचा निर्यातक्षम फळांचे निर्मितीमध्ये महत्त्व
 • अंतर मशागत आणि पाण्याचा निचरा करण्याची पद्धती
 • ताणाचा बंदोबस्त
 • बहार धरणे पद्धती – छाटणी आणि वहण देण्याचे उद्देश व पद्धती
 • फुल धारणेच्या सवयी आणि फुलधारणेवर होणारे परिणाम, हवामान, रासायनिक द्रव्य व व्यवस्था
 • फळांची गळ, विरळणी, पक्वता, काढणी अवस्था ओळखणे, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक व विक्री व्यवस्था
 • कोरडवाहू फळ पिकांची व्यवस्थापन
 • महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या समशीतोष्ण व उष्णकटिबंधातील आणि फळ झाडांची लागवड
 • फळपिका वरील रोग व किडी यांचे नियंत्रण
 • शासनाच्या फळबाग लागवडीच्या योजना
 • रोपवाटिका व्यवस्थापन भाजीपाला व फुलझाडे यांच्या अभिवृद्धीचे प्रकार बियापासून शाकीय अभिवृत्ती – पद्धती, फायदे व तोटे
 • मातृ वृक्षाचे महत्त्व व निगा
 • हरितगृह, तुषारगृह यांचे आधुनिक शेतीतील महत्त्व, प्रकार व आकार व उभारणी 
 • उद्यान विद्या – भाजीपाल्यांचे वर्गीकरण, प्रमुख भाजीपाल्यांचे लागवड, पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या, शेंगवर्गीय भाज्या, मूगवर्गीय भाज्या, कंदवर्गीय भाज्या आणि कोबी वर्गीय भाज्या, बहुवर्षीय भाज्या
 • फुलशेती महत्त्व व लागवडीस असलेला वाव, पुष्प उत्पादनात राबविल्या जात असलेल्या खास बाबी
 • फुलशेती, पुष्प फुलांच्या पिकाच्या अभिवृद्धीच्या पद्धती, महत्त्वाच्या फुल झाडांची लागवड, फळे आणि भाजीपाला टिकवण्याच्या पद्धती
 • कृषी विस्तार विस्ताराची मूलतत्त्वे, वैयक्तिक संपर्क, शेतावर व घरी भेट, दूरध्वनीवरील चर्चा, वैयक्तिक चर्चा, कार्यालयीन भेट, समूह संपर्क, शेतकरी मेळावे, कृषी दिन प्रदर्शन, रेडिओ, दूरदर्शन सभा, शेतीविषयक माहिती, घडी पत्रिका, परिपत्रक पुस्तिका, भित्तिपत्रक तक्ते, बातमी नमुने, छायाचित्रे, दृकश्राव्य, साधने, रेडिओ, दूरदर्शन, चलचित्रपट, स्लाईड शो, व्हिडिओ कॅसेट, नाटक, तमाशा, कीर्तन
 • संगणक – रचना, कार्य, उपयोग, माहिती साठविणे, माहितीचे देवाण-घेवाण, विस्तार कार्य, गुन्हा कर्तव्य व प्रकार
 • कार्यक्रमाचे नियोजन तत्वे, पायऱ्या, फायदे, विकास नियोजन माहिती, उद्देश, लाभार्थी प्रशासन आणि फायदे तोटे
 • कोरडवाहू क्षेत्र विकास योजना, निर्धारित लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, आदिवासी क्षेत्र विकास, कार्यक्रम डोंगरी क्षेत्र विकास, कार्यक्रम एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, एकात्मिक बळविकास योजना, फळबाग विकास योजना, बौद्ध पीक योजना, एकात्मिक कडधान्य सुधार योजना, एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, एकात्मिक चारा विकास योजना, जवाहर रोजगार योजना, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम, कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाची शेती विषयक कायदे, बी बियाणे कायदा, रासायनिक खत नियंत्रण कायदा, कीटनाशक कायदा जंगल कायदा, तुकडे बंदी व तुकडे तोड कायदा, कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन, कृषी व्यवसाय वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व, कृषी व्यवसायात पतपुरवठ्याची भूमिका, कृषी पतपुरवठा पुरवणाऱ्या संस्था, कृषी पथक प्रस्ताव, कृषी व्यवसाय विश्लेषण, कृषी विपणन,,शेतमाल विक्री व्याप्ती आणि महत्त्व
 • शेतमालाच्या बाजाराचे प्रकार, शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम व संस्था शेतमाल विक्रीच्या समस्या

महत्वाच्या लिंक्स :

सविस्तर जाहिरातीसाठी व अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा.

Posts You May Like :

Leave a Reply