क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 (Savitribai Phule Scolarship 2023) : जाणून घ्या संपूर्ण माहिती

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 || सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 || क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना 2023 || सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 ऑनलाईन अर्ज || सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 अंतिम तारिख || सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 महाराष्ट्र || क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 महाराष्ट्र || Savitribai Phule Scolarship 2023 || Savitribai Phule Scolarship 2023 महाराष्ट्र || Savitribai Phule Scolarship 2023 Maharashtra || Savitribai Phule Scolarship 2023 online application || Krantijyoti Savitribai Phule Scolarship 2023 Information

महाराष्ट्र शासन महिलांसाठी तसेच मुलींसाठी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. त्यातीलच हि एक योजना आहे ती म्हणजे ” सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना “. या स्कॉलरशीप च्या माध्यमातून शासन गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचवा .

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 :

शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालये / विद्यापीठ विभागामध्ये अव्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना ” सुरु केलेली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले 1

नियम व अटी :

 1. महाविद्यालये/विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त १० व अव्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त ०२ विद्यार्थिनी सदर योजनेसाठी पात्र राहतील.
 2. पात्र विद्यार्थिनीस रुपये ५०००/- अर्थसहाय्य देण्यात येईल.
 3. विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,००० / पेक्षा जास्त नसावे यासाठी संबंधित तहसीलदाराचा दाखला आवश्यक राहील.
 4. सदर अर्थसहाय्य विद्यार्थिनीस एकदाच देण्यात येईल.
 5. विद्यार्थिनीस मागील लगतच्या परीक्षेत किमान ५०% गुण मिळालेले असावेत. ५०% जास्त गुण असतील तर गुणानुक्रमे विचार करण्यात येईल.
 6. विद्यार्थिनीने नियमित (Regular) प्रवेश घेतलेला असावा.
 7. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला नसावा.
 8. विद्यार्थिनीची किमान उपस्थिती ७५% असावी. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
 9. विद्यार्थिनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्वीकारता येणार नाही.
 10. विद्यार्थिनीस गैरशिस्त/नैतिकता/परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
 11. अर्थसहाय्यासाठीविद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, समाजसेवा, कला इ. विचारात घेण्यात येईल.
 12. विद्यार्थिनीने तिच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
 13. शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थिनीस सदर योजना लागू होणार नाही.

कागदपत्रे :

 1. मागील वर्षीच Marksheet
 2. उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)
 3. बँक पासबुक झेरॉक्स

महत्वाच्या लिंक्स :

india pune university 1
 1. Official Website : Click Here
 2. Pune University : Click Here
 3. To know more : www.mahajobs.org.in

Posts You May Like :

 1. लेक लाडकी योजना 2023 : Click Here
 2. कांदा चाळ अनुदान योजना 2023 : Click Here
 3. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना  : Click Here

Leave a Reply