प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र (1 रुपयात विमा): याद्या झाल्या जाहीर, आता करा हे काम

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. सरकारने शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून काढण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये पिक विमा मिळणार आहे. हा विमा कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ? अर्ज कसा करायचा? यादी कुठे पहायची ? सर्व माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचावा.

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यात 2016 पासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात चालू असलेल्या योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. या नवीन निर्णयानुसार,”सर्वसमावेशक पिक विमा योजना ” पुढील 3 वर्षासाठी (२०२३-२०२४ ते २०२५-२०२६) राज्यात राबवण्यात येणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयात पिक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा रकमेच्या काही प्रमाणात हप्ता भरावा लागत होता. यामध्ये खरीप हंगामासाठी २%, रब्बी हंगामासाठी १.५% आणि नगदी पिकांसाठी (दोन्ही हंगामातील ) ५% एवढा हप्ता भरावा लागायचा. परंतु महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे आत्ता फक्त एक रुपयात अर्ज करता येत आहे हि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र उद्देश

 1. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
 2. शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ, कीटक प्रादुर्भाव यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान होते त्या नुकसानीसाठी आर्थिक मदत करणे हा सरकारचा महत्वाचा उद्देश आहे.

पिके

खरीप हंगामातील खालील १४ पिकांसाठी हा विमा मिळणार आहे.

 1. भात
 2. बाजरी
 3. भुईमुग
 4. ज्वारी
 5. नाचणी
 6. उडीद
 7. मुग
 8. मका
 9. तूर
 10. कारले
 11. सोयाबीन
 12. कापूस
 13. तीळ
 14. कांदा

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र कागदपत्रे

 1. पिकपेरणी स्वयं घोषणापत्र
 2. आधार कार्ड सलंग्न बँक पासबुक
 3. सातबारा उतारा
 4. आधार कार्ड
 5. मोबाईल नंबर
 6. सामाईक खातेदार असल्यास संमती पत्र

पीकविमा यादी पात्रता

सलग २१ दिवसापेक्षा जास्त दिवस ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही ते ठिकाण या योजनेस पात्र आहेत. पिक विमा समितीने सर्वेक्षणात उत्पनामध्ये घट झाली आहे असा अहवाल दिल्यास २५% आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना मिळते .

खरीप पिक विमा योजना 2023 महाराष्ट्र लाभार्थी यादी

सरकारने आता जे लाभार्थी या योजनेस पात्र झाले आहेत त्यांच्या याद्या official website वर जाहीर केल्या आहेत. Official Website ला भेट देण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे कि नाही याची खात्री करावी.

वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गावच्या तलाठी कार्यालयास हि भेट देऊ शकता.

Summary

प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शासनाने सुरु केलेली योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे जे आर्थिक नुकसान झाले असेल किवा पुढील तीन वर्षात होईल त्यासाठी शासन मदत करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागेल. तसेच शेतकरी बंधावामध्ये शेती करण्यात रुची हि वाढेल.

महत्वाच्या लिंक्स

 1. Official Website : Click Here
 2. To Know More : Click Here

Posts You May Like

 1. आयुष्यमान भारत योजना : Click Here
 2. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्कॉलरशीप 2023 : Click Here
 3. कांदा चाळ अनुदान योजना 2023 : Click Here

Leave a Reply