कांदा चाळ अनुदान योजना 2023 महाराष्ट्र: सरकार देणार 100% अनुदान (Kanda Chal Anudan 2023)

कांदा चाळ अनुदान योजना 2023

कांदा चाळ अनुदान योजना 2023 || कांदा चाळ अनुदान योजना || कांदा चाळ अनुदान योजना 2023 महराष्ट्र || कांदा चाळ अनुदान ऑनलाईन ||

Kanda Chal Anudan Yojana 2023 Maharashtra || Kanda Chal Anudan || Kanda Chal Anudan Yojana 2023 Online Application || Kanda Chal Anudan 2023 Maharashtra || Kanda Chal Anudan 2023 || Kanda Chal Subsidy 2023 || Onion Storage Subsidy 2023

महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या कांद्याची साठवणूक व्यवस्थित रित्या करणे हि तितकेच गरजेचे असते. सामान्य शेतकरी कांद्याची साठवणूक पारंपारिक पद्धतीने करतात जसे की कांदा शेतजमिनीवर पसरवून किंवा स्थानिक रित्या तयार केलेल्या चाळीमध्ये कांद्याची साठवणूक करवून. पारंपारिक पद्धतीने साठवणूक केल्याने कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हि नुकसान टळावी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कांदा चाळ योजना सुरु केली आहे. याच योजनेचे संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.  हि योजना कोणाला लागू आहे, कोणती कागदपत्रे गरजेची आहेत, पात्रता काय आहे, किती अनुदान दिले जाईल याची सर्व माहिती या लेखामध्ये पाहूयात.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 तपशील :

कांदा अनुदान योजना २०२३ हि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महारष्ट्र शासनाने सुरु केलेली योजना आहे. पारंपारिक पद्धतीने केलेल्या साठवणुकीमुळे कांद्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होते. याचबरोबर कांद्याची प्रत आणि टिकावूपणा यावर हि परिणाम होवू शकतो. यासाठी आधुनिक कांदा चाळ गरजेची आहे. अशीच कांदा चाळ उभारण्यासाठी शासन २०२३ पासून १००% अनुदान देणार आहे. आत्तापर्यंत कांदा चाळ उभारणीला शासन रुपये ८७,५००/- अनुदान दिले जात होते. या अनुदाना व्यतिरिक्त अजून रुपये १,६०,३६७/- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून भर घातली जाणार आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 उद्दिष्ट :

 1. कांद्याचे होणारे नुकसान कमी करणे.
 2. हंगामामध्ये आवक वाढते आणि भाव कोसळतात. हंगामा व्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा निर्माण होतो आणि भाव वाढतात यासाठी कांद्याची साठवणूक गरजेची आहे. हि साठवणूक करण्यासाठी कांदा चाल असणे गाजेची आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 पात्रता :

 1. जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची असणे गरजेचे आहे.
 2. ७/१२ उतारा नोंद असणे गरजेचे आहे.
 3. अर्जदाराकडे कांद्याचे पिक असणे गरजेचे आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2023 लाभ कोण घेवू शकते ?

 1. सहकारी पणन संघ
 2. शेतकऱ्यांचे गट
 3. स्वयं सहाय्यता गट
 4. कांदा उत्पादक
 5. शेतकरी महिला गट
 6. शेतकऱ्याचे उत्पादक संघ
 7. नोंदणीकृत शेती संबंधी संस्था
 8. शेतकरी सहकारी संस्था

कांदा चाळ अनुदान योजना 2023 साठी लागणारी कागदपत्रे :

 1. ७/१२ उतारा
 2. ८ अ उतारा
 3. आधार कार्ड
 4. आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुक
 5. अनुसूचित जाती किंवा जमाती शेतकऱ्यासाठी जात प्रमाणपत्र

कांदा चाळ अनुदान योजना 2023 अर्ज कुठे करावा ?

 1. कांदा अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
 2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावे.
 3. या संकेतस्थळावर जावून अर्जदाराने “Registration” करावे.
 4. Registration करताना आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावे.
 5. तुमचा अर्ज पात्र झाल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या क्षेत्राची पाहणी करून जातील.
 6. यानंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर Jio Tagging करण्यात येईल.
 7. यानंतर तुम्ही काम पर्ण केले आहे की नाही याची पाहणी केली जाईल.
 8. काम पूर्ण झाले असेल तर अनुदान तुमच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स :

 1. कांदा चाल अनुदान योजना २०२३ अर्ज : Click Here
 2. महारष्ट्र सरकार Website : Click Here
 3. To know more : www.mahajobs.org.in

Posts You May Like :

 1. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Click Here
 2. कांदा अनुदान २०२३ : Click Here
 3. पॉली हाऊस शेडनेट सबसिडी महाराष्ट्र २०२३ : Click Here
 4. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र २०२३ : Click Here

Leave a Reply