कांदा अनुदान 2023 (Kanda Anudan) अनुदानाची यादी झाली जाहीर !!!

कांदा अनुदान 2023

कांदा अनुदान 2023 || कांदा अनुदान || कांदा अनुदान गावांची यादी || अनुदान यादी || कांदा अनुदान GR 2023

Kanda Anudan 2023 || Kanda Anudan || Kanda Anudam Village List || Anudan List || Kanda Anudan GR 2023 || kanda anudan 2023 maharshtra || kanda anudan 2023 yadi || kanda anudan 2023 maharshtra pdf || kanda anudan 2023 gr pdf

कांदा अनुदान 2023 :

महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांदा बाजारभावात खूप घसरण झाली होती. यामुळे विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी यांनी अनुदानाची जोरदार मागणी केली होती. हि मागणी लक्षात शेत “ कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना” यासाठी डॉ. सुनिल पवार, माजी पणन संचालक याच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

या समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी, व्यापारी, अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, तज्ञ, शास्रज्ञ यांच्या भेटी घेऊन तसेच माहिती घेऊन एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल त्यांनी ०९/०३/२०२३ रोजी सदर केला. या अहवालात त्यांनी बऱ्याच शिफारशी केल्या. त्यामध्ये त्यांनी अशी अशी शिफारस केली की अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्या म्हणजेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी.

कांदा अनुदान 2023 शासन निर्णय :

डॉ. सुनिल पवार, माजी पणन संचालक याच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्या आलेल्या समितीने केलेल्या शिफारशिना अनुसरून शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला:

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दि. ०१/०२/२०२३ ते दि. ३०/०३/२०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याच शासनाने निर्णय घेतला आहे.

कांदा अनुदान 2023 शर्ती व अटी :

 1. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.
 2. जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दि. ०१/०२/२०२३ ते दि. ३१/०३/२०२३ या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेत खरीप कांदा खरेदीकरिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्राकडे विक्री करतील त्यांच्यासाठी हि योजना लागू राहील.
 3. संबंधित योजना हि मुंबई कृषी उत्पन्न समिती, मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व बाजार समित्यासाठी लागु असेल.
 4. पराजयातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी हि योजना लागू नसेल.
 5. मिळालेले अनुदान हे थेट बँक हस्तांतरण द्वारे शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल.
 6. सदर अनुदान ICICI बँकेमार्फत अदा करण्यात यावे.
 7. कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळवण्यासाठी कांदा विक्री पट्टी/पावती, ७/१२ चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.
 8. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समिती राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था याचेकडे सदर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महारष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सदर करावीत. त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरीत करण्यात येईल.
 9. ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलांच्या व अन्य कुटुंबियांच्या नवे आहे व ७/१२ उताऱ्यावर पिक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त ७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर ७/१२ उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल.

कांदा अनुदान 2023 अंमलबजावणी :

फेब्रुवारी 2023 मध्ये कांद्याला खूपच कमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागल होते. त्यासाठी शासनाने मदत म्हणून अनुदांची घोषणा केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय:

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दि. ०१/०२/२०२३ ते दि. ३०/०३/२०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या तसेच या संदर्भात शासनपत्र दि.२०/०४/२०२३ ते २९/०५/२०२३ अन्वये दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसारपात्र शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी रु. ५५०/- इतकी रक्कम सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आली असून या रकमेपैकी रु. ४६५.९९ कोटी इतकी रक्कम वितरी करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे.

कांदा अनुदान 2023 अंमलबजावणीची संपूर्ण माहिती :

 1. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी पात्र प्रस्तावांची छाननी करून ती यादी पणन संचाकाल, महारष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर केली आहे. तसेच पणन संचालक, महारष्ट्र यांनी तपासून अंतिम केलेल्या यादी नुसार पणन विभागामार्फत सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केले जाईल. सादर अनुदान वितरीत करण्यासाठी सहसचिव, पणन यांच्या नावे ICICI बँकेमध्ये एक चालू खाते उघडण्यात आले आहे.
 2. मंजूर झालेल्या निधीतून खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यात येणार आहे:
  • रु. १०.०० कोटी पेक्षा कमी अनुदानाची रक्कम असलेल्या १३ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास संपूर्ण अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
  • रु १०.०० कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या १० जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यास ५३.९४१७ % या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
  • या योजनेखाली वित्त विभागाने उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित पात्र ल्लाभार्थ्यास अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येईल.
 3. या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा करण्याकरिता Dr. सुग्रीव धपाटे, सहसचिव (पणन) सहकार व वस्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
 4. पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा/चावडीचे येथे वाचन करावे/ग्रामपंचायतीच्या फलकावर यादी प्रसिद्ध करावी.
 5. सदर शासन निर्णय महारष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

कांदा अनुदान 2023 गावांची यादी :

 1. रु. १०.०० कोटी पेक्षा कमी अनुदानाची रक्कम असलेल्या १३ जिल्ह्यांची यादी : या १३ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
  • नागपूर
  • रायगड
  • सांगली
  • सातारा
  • ठाणे
  • अमरावती
  • बुलढाणा
  • चंद्रपूर
  • वर्धा
  • लातूर
  • यवतमाळ
  • अकोला
  • वाशीम
 2. रु. १०.०० कोटी जास्त अनुदानाची रक्कम असलेल्या १० जिल्ह्यांची यादी : या १० जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना ५३.९४१७% अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
  • नाशिक
  • उस्मानाबाद
  • पुणे
  • सोलापूर
  • अहमदनगर
  • औरंगाबाद
  • धुळे
  • जळगाव
  • कोल्हापूर
  • बीड

कांदा अनुदान 2023 महत्वाच्या PDFs :

Post You May Like :

 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : Click Here
 • पॉली हाऊस शेडनेट सबसिडी महाराष्ट्र 2023 : Click Here
 • माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2023 : Click Here

Leave a Reply