Jalsampada Vibhag Bharti 2023 : जलसंपदा विभागात ४ हजार ४९७ पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Jalsampada Vibhag Bharti 2023

Jalsampada Vibhag Bharti 2023 : जलसंपदा विभागाअंतर्गत गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत सात परिमंडलातील खालील १४ संवर्गातील एकूण ४४९७ पदांच्या सरळसेवा करिता पात्र उमेदवाराकडून विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दि. ०३/११/२०२३ ते २४/११/२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निशित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

Jalsampada Vibhag Bharti 2023 Overview

परीक्षेचे नाव जलसंपदा विभाग गट ब व गट क सरळसेवा भरती
एकूण जागा ४४९७
अर्ज करण्याची तारीख सुरुवात ०३/११/२०२३
अर्ज करण्याची तारीख शेवट २४/११/२०२३
परीक्षेचा दिनांक व कालावधी अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करुन देण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in

Jalsampada Vibhag Bharti 2023 पदे

 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
 •  निम्न श्रेणी लघुलेखक
 •  कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
 •  भूवैज्ञानिक सहाय्यक
 •  आरेखक 
 • सहाय्यक आरेखक
 •  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
 •  प्रयोगशाळा सहाय्यक
 •  अनुरेखक
 •  दप्तर कारकून
 •  मोजणीदार
 •  कालवा निरीक्षक
 •  सहाय्यक भांडारपाल
 •  कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक

Jalsampada Vibhag Bharti 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकज्यांनी भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भशास्त्र या विषयांमधील किंवा कृषी (मृदा शास्त्र/कृषी रसायनशास्त्र) या विषयांमधील पदव्युत्तर पदवी किमान ६०% टक्के गुणासह) धारण केली आहे.
निम्न श्रेणी लघुलेखक१. ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
२. जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट या पात्रतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकज्यांनी भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भशास्त्र या विषयांमधील किंवा कृषी (मृदा शास्त्र/कृषी रसायनशास्त्र) या विषयांमधील पदव्युत्तर पदवी किमान ६०% टक्के गुणासह) धारण केली आहे.
भूवैज्ञानिक सहाय्यकज्यांनी भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित भूगर्भशास्त्र पदवी किंवा पदवी उत्तर मधील द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे किंवा भारतीय खणीकर्म धनबाद येथील भूगर्भशास्त्र उपयोजित भूगर्भशास्त्र पदविका किंवा शासनमान्य इतर समकक्ष पात्रता उपरोक्त नमूद पात्रता प्राप्त केल्या नंतर भूगर्दीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
आरेखक१. ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी /विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी धारण केले आहे किंवा
२. ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी /विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे आणि शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये सहाय्यक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव धारण केला आहे
सहाय्यक आरेखक ज्यांनी स्थापत्य /यांत्रिकी /विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका धारण केली आहे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकज्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि खालील परीक्षा उत्तीर्ण केली आहे:
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य यांत्रिकी पदविका किंवा तिला समक्ष पात्रता धारण केली आहे
प्रयोगशाळा सहाय्यकज्यांनी भौतिकशास्त्र /रसायनशास्त्र /भूगर्भशास्त्र या विषयांमधील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली आहे किंवा ज्यांनी कृषी क्षेत्रातील पदवी धारण केली आहे
अनुरेखक१. ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि २. ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला आहे किंवा शासन मान्यता प्राप्त कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केली आहे.
दप्तर कारकून१. ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच २. टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार१. ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच २. टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षकज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल१. ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच २. टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रतिमिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक१. ज्यांनी भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/गणित/इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे किंवा
२. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे.
३. कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य देण्यात येईल.

Jalsampada Vibhag Bharti 2023 वयोमार्यदा

खुला वर्ग १८-३८
मागासवर्गीय/खेळाडू १८-४३
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य/दिव्यांग १८-४५
पदवीधर अंशकालीन १८-५५

Jalsampada Vibhag Bharti 2023 अभ्यासक्रम

Jalsampada Vibhag Bharti 2023 अभ्यासक्रम pdf : Click Here

महत्त्वाच्या लिंक्स

Posts You May Like

 • How to Apply Online For Ayushyaman Bharat Card : Click Here

Leave a Reply