How to Apply Online For Ayushyaman Bharat Card : आयुष्यमान भारत कार्ड काढ्यासाठी ऑनलाईन असा अर्ज करावा?

How to Apply Online For Ayushyaman Bharat Card

How to Apply Online For Ayushyaman Bharat Card

देशातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याच्या सर्व चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी शासन सतत प्रयत्न करत असते. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना सुरु केली आहे. हि योजना २३ सप्टेंबर मध्ये सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात भरती केल्यानंतर पुढील 15 दिवसांचा खर्च सरकारमार्फत उचलला जातो. या योजनेची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा?, पात्रता काय?, आयुष्यमान कार्ड कुठे काढून मिळेल? याची सर्व माहिती तुमच्यापर्यंत या लेखातून पोहचवली जाईल.

आयुष्यमान भारत योजना उद्दिष्ट:

या योजनेचे उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना विमा प्रदान करणे. यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाखापर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येईल. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागत नाही.

योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीचे वय हे १८ वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे. हि योजना सरकारने गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटातील लोकांसाठी सुरु केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले नागरिक या योजनेला पात्र असतील. या योजनेस पात्र व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊ शकते.

कागदपत्रे :

 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. मोबाईल नंबर

How to Apply Online For Ayushyaman Bharat Card?

 • Ayushyaman Bharat card ला अर्ज करण्यासाठी official website ला भेट द्यावी.
 • यानंतर तुमच्यासमोर खालील पेज ओपन होईल. तिथे beneficiary या टॅब वर क्लिक करावे. तुमचा मोबाईल नंबर टाका. Auth Mode या टॅब मध्ये Mobile_OTP निवडावा. तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या नंबर वर OTP येईल. OTP टाकून Captch टाका आणि LOGIN वर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्यासमोर खालील पेज ओपन होईल. तिथे State, Scheme, District, Search By निवडा. तुमचा आधार नंबर टाका आणि Search वर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्या समोर खाली दिल्याप्रमाणे पेज ओपन होईल. तिथे तुमच्या कुटुंबाची सर्व माहिती येईल. परंतु त्यासाठी तुमचे रेशन कार्ड ऑनलाईन असणे गरजेचे आहे. सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. जर माहिती मध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड मध्ये बदल करू शकता. माहिती जर बरोबर असेल तर नावापुढे दिलेल्या Action या कॉलम मधील कार्ड च्या आइकॉन वर क्लिक करा.
 • यानंतर खाली दिल्याप्रमाणे पेज ओपन होईल. Verify वर क्लिक करा.
 • यानंतर तुमच्या पुढे अश्या प्रकारचे पेज ओपन होईल. तिथे चेक बॉक्स वर क्लिक करावे आणि allow वर क्लिक करावे.
 • यानंतर authentication mode मध्ये Adhar OTP निवडा. तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल आणि सोबतच Beneficiary’s Mobile OTP येईल. दोन्हीही OTP टाकून authenticate करावे.
 • यानंतर खाली दिल्याप्रमाणे पेज ओपन होईल. इथे E-KYC करणे गरजेचे आहे. E-KYC Adhar OTP, Finger Print, IRIS Scan ने करता येईल. यापैकी तुम्ही कोणताही एक ऑप्शन निवडा. आधार ओटीपी निवडला तर तुमचा आधार नंबर automatic येईल. Verify वर क्लिक करा.
 • यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आणि ऑपरेटर मोबाईल नंबर वर OTP येईल. दोन्हीही OTP टाकावे आणि NEXT टॅब वर क्लिक करावे.
 • यानंतर तुमच्या समोर खालील पेज ओपन होईल. तिथे तुमची सर्व माहिती चेक करुन घ्या. तुम्हाला लाइव्ह फोटो ही capture करायचा आहे.
 • यानंतर त्याच पेज वरील खाली दिलेली माहिती भरुन घ्यावी आणि submit बटण वर क्लिक करावे.
 • त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कार्ड चा स्टेट्स दिसेल. Approve झाल्यांनतर download या आइकॉन वर क्लिक करुन तुमचे कार्ड डाऊनलोड करुन घ्या.
 • तुमचे आयुष्यमानभारत कार्ड खाली दिल्याप्रमाणे असेल. त्यावर फोटो, नाव, जन्म वर्ष, गाव/वार्ड, तालुका/शहर, जिल्हा, लिंग, स्टेट, ID नंबर, रेशन कार्ड नंबर ही सर्व माहिती असेल.

महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट : Click Here

Posts You May Like

Leave a Reply