Education and Sports Department: Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या, वर्ग/अतिरिक्त शाखा तसेच शाळा/तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळणार अनुदान

Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools

Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ नोव्हेंबर २०२३ रोजी एक GR प्रसिद्ध केला आहे. त्या GR नुसार ज्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अश्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools

Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools

मंत्रीमंडळाची १३/१२/२०२२ रोजी बैठक झाली होती या बैठकीमध्ये ज्या शाळांनी त्रुटींची पूर्तता केली आहे त्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या, वर्ग/अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र करण्याचा, तसेच ज्या शाळांना याअगोदर २०% / ४०% अनुदान दिले आहे त्या शाळांना अतिरिक्त २०% अनुदान देण्याचा, यासोबतच अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा/तुकड्या, वर्ग/अतिरिक्त शाखा यांना २०% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शासनाने दि. २४/०४/२०२३ रोजी परिपत्रक काढले होते त्यानुसार लवकरात लवकर अनुदानाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. याव्यतिरिक्त खाजगी/अंशतः अनुदानीत शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना शालेय आयडी देण्याबाबतच्या निकषामध्ये शासन परिपत्रक दि. २६/०९/२०२३ नुसार सूट देण्यात आलेली आहे.

संदर्भीय शासननिर्णय/परिपत्रक/पत्रातील सर्व अटी व शर्तीनुसार तपासणी करून अंमलबजावणी करण्यात यावी व अनुदानासाठी पात्र असणाऱ्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी याना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीमध्ये दि. ३१/१२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी. अशी कार्यवाही करत असताना कोणत्या शिक्षकावर/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

तसेच पुढील प्रत्येक वर्षी सप्टेंबर पर्यंत आधार संचमान्यता पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये संच्यामान्यतेनुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा/तुकड्यावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. अश्या प्रकारे आदेश शासनाने या GR मार्फत दिलेले आहेत.

महत्त्वाच्या लिंक्स

Grant For Primary Secondary and Higher Secondary Schools GR : Click Here

Posts You May Like

Sukanya Samriddhi Yojana : Click Here

Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana : Click Here

Leave a Reply