Bharat Atta : दिवाळीपूर्वी मोदी सरकारची नवी योजना, सर्वसामान्यांना दिली भेट “भारत आटा” लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि बाकी सर्व माहिती

Bharat Atta

Bharat Atta : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आज आपण एका अत्यंत खास योजनेची माहिती पाहणार आहोत. केंद्र सरकारने “भारत आटा” या नावाने देशभरात गव्हाच्या पिठाची विक्री सुरु केलेली आहे आणि या पिठाची विक्री सरकार अत्यंत कमी दरात करणार आहे. ही विक्री नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून करणार आहे.

Bharat Atta माहिती

ऐन दिवाळीच्या सणाला केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी एक खास योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत आटा’ या नावाने एक ब्रँड देशभरात लॉन्च केला आहे. या गव्हाच्या पिठाची २७.५० रुपये किलो दराने विक्री सुरू केली आहे. नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील ८०० मोबाईल व्हॅन आणि २,००० हून अधिक दुकानांमधून ‘भारत आटा’ची विक्री केली जाणार आहे.

सध्या बाजारामध्ये मिळणारे गव्हाचे पीठ हे ३६-७० रुपये प्रति किलोप्रमाणे मिळत आहे. या योजनेअंतर्गत सारख्याच दर्जाचे पीठ मिळणार आहे आणि त्याची किंमत ही कमी असणार आहे.

Bharat Atta मिळाला हिरवा कंदील

सरकारने फेब्रुवारी मध्ये किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर काही दुकानांमध्ये सहकारी संस्थांमार्फत १८,००० टन पिठाची २९.५० रुपये प्रति किलो या दराने विक्री केली होती. सरकारने या पिठावर अनेक चाचण्या घेतल्या आहेत. त्यात यश आल्याने आता हे पीठ सर्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे.

“भारत आटा” या गव्हाच्या पिठाची विक्री करण्यासाठी ८०० मोबाईल व्हॅन आणि २००० दुकानांमधून केली जाणार आहे.

“भारत आटा” सोबतच “भारत डाळ” ही लॉन्च केळी गेलेली आहे आणि त्या डाळीची किंमत ही ६० रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे. तसेच कांद्याची किंमत २५ रुपये प्रति किलो प्रमाणे आहे.

Bharat Atta कुठे विकत घेऊ शकता?

“भारत आटा” या गव्हाच्या पिठाची विक्री करण्यासाठी ८०० मोबाईल व्हॅन आणि २००० दुकानांमधून या पिठाची विक्री केली जाणार आहे. गव्हाचे पीठ तुम्ही नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या सर्व फिजिकल आणि मोबाईल आउटलेट मधून खरेदी करू शकता. पुढील काही दिवसात या योजनेचा विस्तार सर्व ठिकाणी केला जाणार आहे म्हणजे सरकारी तसेच जे किराणा दुकाने आहेत त्या दुकानापर्यंत पोहचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

Posts You May Like

  • Shravanbal Seva Rajya Nivrutivetan Yojana : Click Here
  • Online Application for New Ration Card: Click Here

Leave a Reply